नमस्कार ब्लॉगिंग कम्युनिटी, तुम्ही डोमेन नेम विकत घेण्याचा विचार करत आहात पण डोमेन कोठून आणि कसे विकत घ्यायचे हे तुम्हाला समजत नाही आहे, तर काळजी करू नका कारण आजच्या लेखात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मराठी मध्ये How to buy a domain from Godaddy in Marathi या विषयी सविस्तर माहिती देणार आहे. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो, जर तुम्ही डोमेन विकत घेत असाल तर तुम्हाला मी सजेस्ट करेल कि, तुम्ही Godaddy वरून आपलं डोमेन Buy करा. आजच्या काळात डोमेन नेम साठी बेस्ट प्लॅटफॉर्म Godaddy हा एकमेव पर्याय आहे.
जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल किंवा ब्लॉगिंग क्षेत्रात तुमचे करियर बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगले डोमेन नेम आणि होस्टिंग खरेदी करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही आमची How to Buy Hosting from Bluehost ही पोस्ट नक्कीच वाचली पाहिजे.
ब्लॉगिंगशी संबंधित संपूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत मिळविण्यासाठी, तुम्ही आमच्या Bloggervinita ला नक्की फॉल्लो करा. आम्ही या ब्लॉगवर ब्लॉगिंग संबंधित संपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगतो.
डोमेन उपलब्ध करून देणारे मार्केट मध्ये सध्या अनेक कंपन्या आहेत पण फारच कमी कंपन्या या चांगली सर्व्हिस देतात. त्यामध्ये Godaddy चे नाव सर्वात टॉप वर आहे. चला तर मग जाणून घेऊया Godaddy कडून डोमेन कसे खरेदी करायचे.
Godaddy कडून डोमेन का खरेदी करायचे?
डोमेन Provide करण्याच्या बाबतीत, Godaddy ही सध्या नंबर Number 1 Domain Name Provider Company आहे. कारण ती डोमेन सर्वात स्वस्त किंमतीत विकते. जे कि नवीन ब्लॉगर्स लोकांच्या बजेट मध्ये असत.
तुमच्या वेबसाइटच्या डोमेनमध्ये कोणतीही Technical Issue उद्भवल्यास, Godaddy चे Support खूप जलद आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ते हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये कॉल सपोर्ट प्रदान करतात.
डोमेन नेम खरेदी करण्यापूर्वी, डोमेन नेम म्हणजे काय हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
डोमेन नेम म्हणजे काय?
डोमेन नेम हे कोणत्याही वेबसाइटचा पत्ता किंवा URL आहे ज्याचा वापर आपण ब्राउझरच्या मदतीने ऍक्सेस करण्यासाठी करतो.
जसे www.bloggervinita.com हे आमचे डोमेन नाव आहे आणि जर कोणी ते Google वर शोधले तर तो आमच्या वेबसाइटवर सहज पोहोचतो.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोणत्याही वेबसाइटवर पोहोचण्यासाठी आपण इंटरनेटवर जो IP पत्ता किंवा डोमेन शोधतो त्याला डोमेन नेम म्हणतात.
ip address हा कोणत्याही डोमेन नावाशी निगडीत असतो, परंतु आम्ही आमच्या वेबसाइटवर ip address द्वारे प्रवेश करत नाही कारण तो लक्षात राहत नाही, म्हणूनच डोमेन नेम सिस्टमचा शोध लावला गेला.
Godaddy कडून डोमेन कसे खरेदी करायचे Step By Step
Godaddy वरून डोमेन नाव खरेदी करण्यापूर्वी, तुमच्याकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे, त्यापैकी एक ईमेल आयडी असावा आणि दुसरा क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड किंवा पेटीएम वॉलेट, upi पेमेंट पर्याय असावा.
चला तर मग आता कोणताही वेळ न घालवता, मी तुम्हाला Godaddy कडून डोमेन कसे खरेदी करायचे ते स्टेप बाय स्टेप सांगते.
- सर्वात आधी Google वर Goadaddy सर्च करा.
- यानंतर Goaddaddy च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- जर तुमच्याकडे आधीपासूनच Godaddy account असेल तर साइन इन वर क्लिक करा.
- जर तुमच्याकडे Godaddy account नसेल तर create my account वर क्लिक करा.
- पहिल्या पर्यायात तुम्ही Facebook सह लॉग इन करू शकता.
- दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही गुगलने लॉग इन करू शकता.
- तिसऱ्या पर्यायामध्ये email id, user name, strong password आणि कोणतीही request pin टाकून account create करा.
- अशा प्रकारे तुमचे Godaddy वर account create होईल.
- आता तुमची क्रेडेन्शियल्स टाकून Godaddy मध्ये लॉग इन करा आणि तुमचे डोमेन नाव शोधा.
- Domain available असल्यास ते add to cart मध्ये जोडा.
Continue to cart वर क्लिक करा. - आता Godaddy येथे काही feature जोडते, जे तुम्ही अनचेक करा किंवा no thanks आणि Continue with these बटण वर क्लिक करा.
- तुम्हाला किती वर्षांसाठी डोमेन खरेदी करायचे आहे ते निवडा.
- तुमच्यासाठी योग्य असलेला पेमेंट पर्याय निवडा. आवश्यक माहिती भरून पेमेंट पूर्ण करा, त्यानंतर तुम्हाला Goaddaddy कडून ईमेल प्राप्त होईल.
अभिनंदन, तुम्ही डोमेन खरेदी केले आहे, आता तुम्ही तुमच्या डोमेनवर काम करून तुमची वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करू शकता. आणि चांगली कमाई देखील करू शकता.
निष्कर्ष
मित्रांनो, मला आशा आहे कि, आजचा लेख तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर तुम्हाला काहीही Domain name विषयी संबंधित जे काही प्रश्न असतील ते तुम्ही खाली कमेंट मध्ये नक्की विचारा. असाच महत्वपूर्ण ब्लॉगिंग इन्फॉरमेशन साठी तुम्ही आमच्या Bloggervinita पेजला फॉलो करू शकता. धन्यवाद.
अधिक वाचा: How to Increase AdSense CTR: AdSense CTR कसा वाढवायचा
FAQ How to buy a domain from Godaddy in Marathi
मला Godaddy वर डोमेन संरक्षण मिळावे का?
तुमच्या GoDaddy डोमेनचे संरक्षण करणे हा तुमची ऑनलाइन Presence व्यवस्थापित करण्याचा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या वेबसाइटचे SSL च्या मदतीने आधीच संरक्षण करू शकता.
Godaddy मध्ये डोमेन सक्रिय करण्यासाठी किती वेळ लागतो?
डोमेनला योग्यरित्या कार्य करण्यास 72 तास लागू शकतात. DNS Connect होण्यासाठी 72 तासाचा अवधी लागू शकतो.