How to Add Social Share Button to Blog in Marathi: ब्लॉगमध्ये सोशल शेअर बटण कसे जोडावे

नमस्कार ब्लॉगर मित्रांनो, तुम्हाला वर्डप्रेस आणि ब्लॉगर वेबसाइट किंवा ब्लॉगवर सोशल शेअर बटण कसे जोडायचे हे जाणून घ्यायचे आहे का? जर होय, तर तुम्ही योग्य ब्लॉगवर पोहोचला आहात.

ब्लॉग पोस्टमध्ये सोशल शेअर बटण जोडण्यासाठी, मी ब्लॉगर आणि वर्डप्रेस Users साठी एक संपूर्ण सविस्तर अशी  माहिती आजच्या लेखात तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तुम्ही या माहितीला फॉल्लो करून खूपच सोप्या पद्धतीने तुमच्या ब्लॉगमध्ये सोशल शेअर बटण जोडू शकता. 

ब्लॉगिंगशी संबंधित अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी, आमच्या Bloggervinita ब्लॉगला  तुम्ही भेट देऊ शकता आणि तुमचं ब्लॉगिंग मधले नॉलेज अजून चांगल्या रीतीने एक्सप्लोर करू शकता.

Social Share Button वापरण्याचे काय फायदे आहेत?

मित्रांनो, जर आपण आपल्या वेबसाइटच्या किंवा ब्लॉगच्या पोस्टमध्ये सोशल मीडिया शेअर बटण लावले, तर जर कोणत्या ही वाचकाला ती पोस्ट आवडली तर तो आपल्या ब्लॉगवरील ती पोस्ट त्या बटनावर क्लिक करून शेअर करू शकतो. 

यामुळे आमच्या ब्लॉगवर भरपूर ट्रॅफिक येईल आणि social शेअरमुळे, आपली पोस्ट Google मध्ये देखील लवकर रँक करेल.

आता मी तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर सोशल शेअर बटण कसे जोडायचे ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे कृपया हा  लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.  

ब्लॉगर आणि वर्डप्रेस ब्लॉगमध्ये सोशल शेअर बटण कसे जोडावे

सर्वप्रथम, मी तुम्हाला ब्लॉगर Users साठी शेअरिंग बटण कसे इंस्टॉल करायचे ते सांगेन कारण त्यासाठी काही कोडिंगची आवश्यकता आहे आणि यासाठी थोडा जास्त वेळ लागेल, त्यानंतर मी तुम्हाला वर्डप्रेस वापरकर्त्यांसाठी शेअरिंग बटण कसे इंस्टॉल करायचे ते सांगेन.

ब्लॉगरच्या सर्व पोस्टमध्ये सोशल शेअर बटण कसे लावायचे?

सर्व प्रथम, blogger.com वेबसाइटवर जा आणि तुमचा ईमेल आयडी टाईप करा आणि डॅशबोर्डवर या. थीमवर क्लिक करा आणि HTML Editor उघडा.

HTML कोडमध्ये कुठेही क्लिक करा, Ctrl + F बटण दाबा आणि <data:post.body> शोधा.

आता खाली दिलेला कोड कॉपी करा.

<div class=’addthis_toolbox addthis_default_style ‘>  <a class=’addthis_button_tweet’/>  <a class=’addthis_button_google_plusone’ g:plusone:size=’inline’/>  <a class=’addthis_button_facebook_like’ fb:like:layout=’button_count’/>  <a class=’addthis_button_facebook_send’/>  <a class=’addthis_button_stumbleupon_badge’/>  </div>  <script src=’//s7.addthis.com/js/300/addthis_widget.js’ type=’text/javascript’/>

कोड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

खाली कॉपी केलेला कोड पेस्ट करा. <data:post.body> 

आता तुमच्या Blogger च्या सर्व पोस्टमध्ये सोशल शेअर बटण Add केले गेले आहे परंतु ते तुमच्या पोस्टच्या खाली दाखवले जाईल आणि तुम्हाला तुमच्या पोस्टच्या सुरुवातीला ते दाखवायचे असेल तर वर कोड पेस्ट करा.

कोड पेस्ट केल्यानंतर, save template वर क्लिक करा.

टीप – ब्लॉग च्या HTML कोडमध्ये चार ते पाच ठिकाणे आहेत. जर एकाच्या खाली कोड टाकल्यास, ब्लॉग पोस्टच्या खाली सोशल शेअर बटण दिसत नसेल तर खालील कोड इतर टेम्पलेट वर लागू करा आणि सेव्ह करा आणि तुमचे सोशल शेअर बटण दिसायला सुरुवात होईल.

How to add social share button in blog not working?

मित्रांनो, जर तुम्ही इतके सर्व प्रयन्त करून पण तुमचे काम पूर्ण होत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करेल. 

वर्डप्रेस पोस्टमध्ये सोशल शेअर बटण कसे लावायचे?

वर्डप्रेस वेबसाइटवर सोशल शेअर बटण जोडण्यासाठी आपण प्लगइन वापरू.

  • सर्वप्रथम तुमच्या वर्डप्रेस डॅशबोर्डवर जा.
  • Select plugin >> add new plugin वर क्लिक करा.
  • आता शोध बारमध्ये AddToAny प्लगइन Install करा आणि ते Activate करा.

मित्रांनो, फायनली तुमचे काम पूर्ण झाले आहे, तुमच्या सर्व वर्डप्रेस ब्लॉग पोस्टमध्ये सोशल शेअर बटण जोडले गेले आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कस्टमाइझ देखील करू शकता.

निष्कर्ष

आजच्या पोस्टमध्ये, मी तुम्हाला ब्लॉगर आणि वर्डप्रेस ब्लॉगमध्ये सोशल शेअर बटण कसे जोडायचे ते सांगितले.
ही पोस्ट वाचल्यानंतर, मला आशा आहे की तुम्ही तुमच्या ब्लॉगर आणि वर्डप्रेस वेबसाइटवर एक चांगला सोशल शेअर आयकॉन जोडला असेल.

जर तुम्हाला काही अडचण आल्यास, कृपया कॉमेंट करून मला कळवा, मी नक्कीच तुम्हाला मदत करेल.

जर तुम्हाला पण हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया खाली दिलेल्या सोशल हँडलवर हा लेख तुमच्या जास्तीतजास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.

अधिक वाचा: How to Increase AdSense CTR: AdSense CTR कसा वाढवायचा

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment