प्रत्येक नवीन ब्लॉगरने या Blogging Mistakes Avoid केल्या पाहिजेत

ब्लॉगर मित्रांनो, गेल्या ३ वर्षाच्या माझ्या ब्लॉगिंग प्रवासाविषयी जर सांगायचं झालं तर मी अनेक Blogging Mistakes या केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे चुकातूनच माणूस शिकतो असं आपल्याकडे म्हटलं जात तेही अगदी खरं आहे. मात्र जर आपल्या पेक्षा कोणी आधी त्या गोष्टीनां सामोरं गेलं असेल तर आपण नक्कीच त्या व्यक्तीच्या अनुभवातुन शिकायला हवं. म्हणजे आपला टाईम आणि मेहनत वाचेल. आजच्या लेखात मी तुम्हाला असाच काही महत्वपूर्ण Blogging Mistakes विषयी सांगणार आहे. ज्या तुम्ही तुमच्या ब्लॉगिंग प्रवासात कधीच करायला नको. चुका आणि अपयश हे दोघ यशाची पायरी असतात.

Blogging Mistakes

1डुप्लिकेट कन्टेन्ट पब्लिश करणे
2पब्लिक लेखन शैली टाळा 
3लॉन्ग प्रस्तावना देणे टाळा 
4वाचण्यास अवघड असलेला कन्टेन्ट लिहिणे
5शब्द वाढवण्यासाठी काहीही लिहिणे
6तुमच्या वाचकांच्या Problems चे Solution शोधा 
7सबहेडिंगचा वापर न करणे 
8तुमच्या ब्लॉग पोस्टची Proofread आणि Editing करणे टाळणे
9अपूर्ण किंवा अर्धवट पोस्ट पब्लिश करणे
10Evergreen Content तयार न करणे
11आपल्या ब्लॉगवर फक्त कन्टेन्ट – आधारित माहिती पोस्ट करणे
12तुमच्या वाचकांकडे दुर्लक्ष करणे 
13वाचण्यास अवघड फॉन्ट्स वापरणे
14अतिरिक्त प्लगइन्स वापरणे
15इमेजेस Compressed न करणे
16तुमच्या स्पर्धकांकडे दुर्लक्ष करणे

१. डुप्लिकेट कन्टेन्ट पब्लिश करणे

इतर ठिकाणच्या कंटेनची चोरी केल्याने SEO वर त्याचा वाईट प्रभाव पडतोच, शिवाय डुप्लिकेट कन्टेन्ट आढळल्यास तुमच्या स्वतःच्या SEO वरही परिणाम होतो. तुमच्या ब्लॉगवर जुन्या कंटेंटचा पुनर्वापर केल्याने देखील डुप्लिकेट कन्टेन्ट समस्या निर्माण होऊ शकते याची काळजी घ्या.

२. पब्लिक लेखन शैली टाळा 

बरेचसे नवीन ब्लॉगर अजिबात वैशिष्ट्य नसलेल्या, पब्लिक वाटणाऱ्या पोस्ट तयार करतात. तुमच्या ब्लॉगची ओळख निर्माण करण्यासाठी, तुमचा स्वतःचा आवाज विकसित करा आणि तुम्ही तुमच्या मित्राला बोलत असल्यासारख्या शैलीत ब्लॉग पोस्ट  लिहा. म्हणजे वाचक तुमच्याशी कनेक्ट होतील. 

३. लॉन्ग प्रस्तावना देणे टाळा 

तुमची पोस्ट वाचण्यासाठी वाचक हे आतुर असतात, त्यांना पहिल्या मुद्दयापर्यंत पोहोचण्याआधीच कंटाळा येऊ शकतो, विशेषत: तुमच्या प्रस्तावनेत लक्ष वेधून घेणारा मुद्दा, धक्कादायक आकडेवारी किंवा गुंतवून ठेवणारी गोष्टी नसतील तर वाचक तुमच्या ब्लॉगला सोडून दुसऱ्या ब्लॉगला वाचतील. कारण आजच्या काळात कोणाकडे जास्त वेळ नाही आहे. प्रत्येकाला To – The – Point माहिती हवी असते. त्यामुळे वायफळ गोष्टी टाळा.

4. वाचण्यास अवघड असलेला कन्टेन्ट लिहिणे

सोप्या शब्दांत सांगायचे तर, low-quality कन्टेन्ट असलेला कोणताही ब्लॉग फेल होईल.

मी फक्त व्याकरण आणि शब्दलेखनाबद्दल बोलत नाही आहे. quality तुमच्या ब्लॉगच्या कंटेनच्या वाचनीयता, रचना आणि visuals म्हणजे इमेजेस शी संबंधित आहे. त्यामुळे जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल तर सुरुवातीला सोप्या टॉपिक पासून सुरुवात करा. 

५. शब्द वाढवण्यासाठी काहीही लिहिणे 

पोस्टची शब्द गणना वाढवण्यासाठी काहीही लिहिणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. लॉन्ग पोस्ट तुमच्या SEO ला मदत करतात, परंतु जर तुम्ही त्या विषयाला सोडून दुसरे विषयांवर अधिक शब्दांसाठी जोर देत असाल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या वाचकांना ते कंटाळवाणे वाटेल.

6. तुमच्या वाचकांच्या Problems चे Solution शोधा 

जर तुम्ही एखाद्या उत्पादनांबद्दल ब्लॉग लिहीत असाल तर लिहिताना फक्त त्याच्या वैशिष्ट्यांवर (features) लक्ष केंद्रित करणे चुकीचे आहे. यामुळे तुमचे लेख वाचकांना जाहिराती (promotional) वाटतील. हे लक्षात ठेवा की वाचकांना फक्त इतक्याच गोष्टीची काळजी असते – हा उत्पादन म्हणजे प्रोडक्ट त्यांची समस्या कशी सोडवू शकतो?

तुमच्या ब्लॉगमध्ये उत्पादनाबद्दल लिहिताना, त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देण्याऐवजी, त्या उत्पादनामुळे वाचकांना कसा फायदा होईल यावर भर द्या.  उदाहरणार्थ, “या नवीन स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक कॅमेरा आहे” असे लिहिण्याऐवजी, तुम्ही  “हा स्मार्टफोन तुम्हाला कमी प्रकाशातही सुंदर आणि स्पष्ट फोटो घेण्याची परवानगी देतो” असे लिहिणे अधिक प्रभावी ठरेल.

7. सबहेडिंगचा वापर न करणे 

काही नवीन ब्लॉगर हे सबहेडिंग (subheadings) न वापरता लांब आणि वाचण्यास कठीण असलेला कन्टेन्ट पब्लिश करतात. यामुळे वाचकांना वाचण्याचा अनुभव वाईट होतोच, शिवाय तुमच्या ब्लॉग पोस्ट सर्च इंजिनच्या रिजल्टमध्ये वर येण्याची शक्यताही कमी होते. बोअरिंग टाईप फील येतो. त्यामुळे वाचक नाराज होऊ शकता. 

8. तुमच्या ब्लॉग पोस्टची Proofread आणि Editing करणे टाळणे

Microsoft Word च्या अंतर्गत असलेल्या स्पेलिंग आणि ग्रामर चेकवर अवलंबून राहिल्याने इतर लेखनातील चुका तुमच्या निदर्शनास येणार नाहीत. तुमच्या लेखाचा प्रवाह तपासण्यासाठी तुमचा कंटेन्ट मोठ्याने वाचा आणि Grammarly सारख्या स्वयंचलित proofread टूलचा वापर करून चुका शोधा. ब्लॉगिंग मध्ये सर्वात महत्वाची पायरी आहे.

9. अपूर्ण किंवा अर्धवट पोस्ट पब्लिश करणे

काही ब्लॉगर शॉर्टकट वापरतात आणि अत्यावश्यक माहिती नसलेली पोस्ट पब्लिश करतात, त्यामुळे त्यांचा कन्टेन्ट स्पर्धकांपेक्षा कमी दर्जाचा बनतो. हे तुम्हाला एखादा दीर्घ लिस्टिकल किंवा “अंतिम” मार्गदर्शक लिहिताना जाणवू शकते. त्यामुळे प्रॉपर आणि पूर्ण रिसर्च करूनच ब्लॉग पोस्ट पब्लिश करा. घाई अजिबात करू नका. नाहीतर मग “अति घाई संकटात नेई” अशी गंमत तुमच्या सोबत होईल. 

10. Evergreen Content तयार न करणे

लोकप्रिय ट्रेंड्सबद्दल लिहिल्याने ट्रॅफिकमध्ये वाढ होऊ शकते, परंतु Evergreen Content नसल्यास, तुमचा ट्रॅफिक शेवटी कमी होईल. याचा अर्थ तुमच्या ब्लॉगसाठी तुम्हाला सतत नवीन माहिती देत राहावे लागेल.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Evergreen Content म्हणजे असे लेख जे नेहमीच वाचकांसाठी उपयुक्त असतात. हे तुम्हाला दीर्घकालीन फायदा देऊ शकतात कारण ते तुमच्या ब्लॉगवर सतत ट्रॅफिक आणण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, “फोटोग्राफीसाठी टिप्स” हे (evergreen) विषय आहेत. त्यामुळे Evergreen Content तयार करा.

11. आपल्या ब्लॉगवर फक्त कन्टेन्ट – आधारित माहिती पोस्ट करणे

नवीन ब्लॉगसाठी, फक्त कन्टेन्ट असलेल्या पोस्टवर अवलंबून राहणे आणि तुमच्या टार्गेट वाचकांना आकर्षित करणे खूप कठीण करते. उत्तम लेखन कौशल्य असलेले ब्लॉगर हे साध्य करू शकतात, परंतु ज्यांना विजुअल्स (visuals) वापर करतात त्यांच्या तुलनेने ते तरीही मागे पडू शकतात.

विजुअल्स म्हणजे तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये वापरलेल्या इमेजेस, infographics, व्हिडिओ आणि इतर प्रकारची व्हिजुअल कन्टेन्ट. हा कन्टेन्ट तुमच्या ब्लॉग पोस्ट अधिक आकर्षक आणि आकर्षक बनवते. तसेच, कठीण माहिती सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

12. तुमच्या वाचकांकडे दुर्लक्ष करणे 

ब्लॉग वाचकांचे (community) तयार न केल्याने, तुमचे वाचक तुमच्या ब्रँडबद्दल काळजी करण्यासाठी पुरेसे प्रेरित किंवा सहभागी होणार नाहीत. त्यांचा फीडबॅक ऐकण्यास आणि तुमच्या ब्लॉग सुधारण्याच्या संधी शोधण्याची तुमची क्षमताही कमी होईल.

तुमच्या वाचकांशी संवाद साधणे आणि कम्युनिटी तयार करणे खूप महत्वाचे आहे. हे तुम्हाला तुमच्या वाचकांना जाणून घेण्यास आणि त्यांना काय आवडते आणि न आवडते ते समजून घेण्यास मदत करते. जसे मी Blogger Vinita Community तयार केली आहे. वेळोवेळी मी त्या कम्युनिटी मध्ये तुमचे ओपिनियन घेत असते. असा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या वाचकांशी कनेक्ट होऊ शकता.

13. वाचण्यास अवघड फॉन्ट्स वापरणे

कॉर्सिव्ह फॉन्ट्स (cursive fonts) छान आणि देखाव्याला सुंदर दिसत असले तरी, ते तुमच्या वाचकांचा वाचन अनुभव बिघडवू शकतात. लक्षात ठेवा की वाचनीयता ही SEO आणि रूपांतरण दर (conversion rate) यांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे.

तुमच्या ब्लॉगसाठी नेहमी वाचण्यास सुलभ असलेले फॉन्ट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो.  सॅन्स-सेरिफ फॉन्ट्स (sans-serif fonts) हे ब्लॉगसाठी लोकप्रिय पर्याय आहेत कारण ते स्वच्छ आणि आधुनिक दिसतात. उदाहरणार्थ, Arial, Open Sans, आणि Helvetica हे काही वाचण्यास सुलभ असलेले फॉन्ट्स आहेत. तुम्ही यापैकी तुम्हाला जो चांगला वाटेल तो फॉन्ट्स वापरू शकता. 

14. अतिरिक्त प्लगइन्स वापरणे

वर्डप्रेस प्लगइन्स खूप उपयुक्त आहेत, परंतु त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे हे चुकीचे आहे. ज्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकत नाही अशा वैशिष्ट्यांसह प्लगइन्स इन्स्टॉल करा बाकीचे Deactivate करा.

15. इमेजेस Compressed न करणे

तुमच्या वेबसाइटवर uncompressed, हाय-रेझोलुशन इमेजेस अपलोड केल्याने तुमच्या वेबसाइटच्या लोडिंग स्पीडवर मोठा परिणाम होईल. हे तुमच्या वाचकांचा अनुभव आणि तुमच्या सर्च इंजिन रँकिंग पूर्णपणे खराब करू शकते.

16. तुमच्या स्पर्धकांकडे दुर्लक्ष करणे

तुमच्या सर्वात मोठ्या स्पर्धकांना न ओळखता ब्लॉगिंग करणे म्हणजे यशस्वी होण्यासाठी अंधारात गोळीबार करण्यासारखे आहे. तुम्ही कीवर्ड शोधत असाल किंवा कॉन्टेंट आइडियावर विचार करत असाल, तुमचे स्पर्धक तुम्हाला काय कार्य करते याबद्दल बरेच सांगू शकतात. त्यामुळे तुमचा स्पर्धक काय करत आहे? काय नाही करत आहे यावर लक्ष केंद्रित करा. 

निष्कर्ष

शिकणे हा सुधारणा करण्याचा आणि शेवटी तुमच्या क्षेत्रात टॉपवर पोहोचण्याचा निश्चित मार्ग आहे. इतकेच नाही तर, इतरांच्या चुकांपासून शिकणे हे त्याहूनही चांगले आहे.

वरील चुकांची यादी तुमच्या ब्लॉगिंग रणनीती व्यवस्थित करण्यास मदत करते अशी अपेक्षा आहे. तुमच्याकडे आणखी काही प्रश्न असतील तर, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.

या पोस्टबद्दल तुमचा काही फीडबॅक किंवा सूचना असतील तर मी त्यांचे आवर्जून स्वागत करेल. धन्यवाद. 

अधिक वाचा: How to Buy Hosting from Bluehost in Marathi | Bluehost वरून होस्टिंग कसे खरेदी करावे 

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

2 thoughts on “प्रत्येक नवीन ब्लॉगरने या Blogging Mistakes Avoid केल्या पाहिजेत”

Leave a Comment