मित्रांनो, मी जेव्हा माझ्या ब्लॉगिंग प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हा मला असंख्य प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातलीच एक मोठी समस्या माझ्यासाठी ब्लॉगसाठी Logo कसा बनवायचा हि होती. कारण मला डिझाईनिंगच विशेष असं नॉलेज नव्हतं. त्यामुळे मी फारच Confuse झाली होती. शेवटी मी यावर खूप रिसर्च केला आणि मला माझ्या समस्याच समाधान झालं.
जसा माझ्यासाठी Logo बनवणं हे खूप Hard Task होत. तसंच ब्लॉगिंग करण्याऱ्या प्रत्येक ब्लॉगरचा हा सेम प्रॉब्लेम असतो. त्यामुळे आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे कि, तुमच्या वर्डप्रेस ब्लॉग किंवा वेबसाइटसाठी तुम्ही स्वतःचा ब्लॉग Logo कशा प्रकारे बनवू शकता ते हि पूर्णपणे फ्री मध्ये. चला तर मग जाणून घेऊया 5 Tips on How to Create Blog Logo in Marathi !
सर्वात आधी आपण जेव्हा वर्डप्रेसवर ब्लॉग तयार करण्यास सुरुवात करतो, तेव्हा आवश्यक असलेला पहिला मुख्य डिझाइन घटक म्हणजे तुमचा ब्लॉग Logo हा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर असं म्हटल जात कि, First Impression is Last Impression !
तुमचा Logo तुमच्या ब्लॉगच्या ब्रँडचा खूप महत्वपूर्ण भाग असतो. बहुतेक वेबसाइट डिझाईन्ससाठी, Logo तुमच्या वेबसाइटच्या प्रत्येक पेजच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात शो केला जातो.
पण, तुम्हाला एका डिझायनरला Hire करण्याची किंवा तुमच्या Logo मध्ये बराच वेळ Time invest करण्याची आता गरज नाही आहे.
कारण आता Canva सारख्या Free टूल्स आणि काही सोप्या डिझाइन techniques ची Help घेऊन तुम्ही फक्त 15 मिनिटांत तुमचा ब्रँड दर्शवणारा प्रोफेशनल Logo तयार करू शकता.
Techinical गोष्टींमध्ये जाण्याअगोदर मी तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही अतिशय सोप्या रीतीने तयार करू शकता अशा तीन प्रकारच्या Logo बद्दल सविस्तरपणे सांगणार आहे.
Three Basic Types of Logos
मित्रांनो, Logo डिझाइनचे तीन बेसिक प्रकार आहेत: Brandmarks, Lettermarks/Wordmarks and Combinations (लेटरमार्क/वर्डमार्क, ब्रँडमार्क आणि कॉम्बिनेशन).
Brandmarks (ब्रँडमार्क)
ब्रँडमार्क विषयी सांगायचं झालं तर बहुतेक लोक या Logo च्या प्रकाराविषयी विचार करतात तेव्हा त्यांच्या डोक्यासमोर येते. जसे की, नाईकचा “swoosh” किंवा टार्गेटचा “bullseye” Logo.
कंपन्या अनेकदा केवळ Logo द्वारे ओळखल्या जाण्यापूर्वी त्यांचे नाव आणि Logo एकत्र दर्शवून सुरुवात करतात.
फेमस ब्रँडमार्कची उदाहरणे आपण पाहूया:
- Nike Swoosh
- Apple
- Pepsi
- Starbucks Mermaid
- Twitter Bird
- Target
Lettermarks/Wordmarks (लेटरमार्क/वर्डमार्क)
दुसरा प्रकार आहे लेटरमार्क आणि वर्डमार्क. Logo मध्ये कोणतेही ग्राफिकल elements नसतात, त्याऐवजी त्यांच्या Logo साठी शब्द किंवा अक्षरांवर अवलंबून असतात.
फक्त Letter चा युज करून Logo युनिक दिसण्यासाठी अनेकदा या Logo मध्ये खास फॉन्ट किंवा Letter च्या डिझाइनचा समावेश केला जातो.
फेमस लेटरमार्क/वर्डमार्कची उदाहरणे आपण पाहूया:
- Coca-Cola
- Fed-Ex
- CNN
- ESPN
- Netflix
- McDonald’s
- Disney
Combined/Hybrid (संयुक्त/मिश्र स्टाईल)
तिसरा आणि शेवटचा प्रकार काही ब्रँड्स त्यांचे ब्रँडमार्क आणि Logo मार्क एकत्रित करतात.
Combined/Hybrid स्टाईल वापरणार्या फेमस Logo ची काही सामान्य उदाहरणांमध्ये समाविष्ट आहेत.
- UPS
- Burger King
- NFL
- Lay’s
- Mastercard
ब्लॉगसाठी Logo कसा बनवावा
या आर्टिकल मध्ये आपण प्रामुख्याने लेटरमार्क/वर्डमार्क Logo वर फोकस करणार आहोत.
कारण वर्डमार्क आणि लेटरमार्क Logo हे फ्री डिझाइन टूल्स जसे की कॅनवा वापरून तयार करणे सोपे Logo स्टाईल मध्ये येते.
ऑनलाईन काही फ्री Logo जनरेटर आहेत जे तुमच्या Logo मध्ये क्लिप-आर्ट समाविष्ट करण्याची Permission देतात, परंतु अशा प्रकारचे Logo शेवटी चिप आणि हौशी दिसतात.
कारण या क्लिपआर्ट स्टाईलच्या Logo डिझाइनच्या बेसिक नियमांना फॉलो करत नाहीत.
तरी पण, Canva मध्ये Logo कसा तयार करायचा ते हे जाणून घेण्यापूर्वी, प्रोफेशनल दिसणारा Logo तयार करत आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही बेसिक डिझाइन नियम जाणून घेतलेले चांगले.
5 Tips on How to Create Blog Logo in Marathi
सर्वप्रथम, तुम्ही Overthinking करणं stop करा. Logo चा मुख्य उद्देश म्हणजे तुमच्या ब्रँडची ओळख लवकरात लवकर सांगणे आहे, कलाकृती तयार करणे अजिबात नाही.
त्यासाठी तुम्हाला Nike, Coca-Cola किंवा Starbucks शी स्पर्धा करण्याची गरज नाही – तुम्हाला फक्त तुमच्या ब्रँडशी जुळणारे आणि तुमच्या वेबसाइटच्या युजर्सला तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटबद्दल काय आहे ते लवकरात लवकर कळवणारे काहीतरी तयार करणे आवश्यक आहे.
Logo तयार करताना लक्षात ठेवायची पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते Simple ठेवा.
Testing च्या उद्देशाने तुम्ही versatile Logo डिझाइन करण्यात तुमची मदत करण्यासाठी काही बेस्ट डिझाइन पद्धती येथे सांगितल्या आहेत.
Tips #1: तुमचा Logo हा ब्लॅक आणि व्हाइट या दोन कॉम्बिनेशन मध्ये चांगला दिसतो का याची एकदा खात्री करा.
आज जरी आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी पण अजून बऱ्याच ठिकाणी आपला Logo कायम कंप्युटर किंवा स्मार्ट फोनच्या स्क्रीनद्वारे अनुभवला जाईल असे नसते. आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया.
उदाहरणार्थ, जसे तुम्ही उभारलेल्या जर्नल्स किंवा बिझनेस कार्ड, शिवण केलेले शर्ट, कॉफी मग्स, अशा वेळी अनेकदा प्रिंटर फक्त मोनोक्रोम प्रकारच्या Logo लाच Aceept करते.
यामुळे ड्रॉप-शॅडो आणि ग्रॅडिएंट्स सारख्या Elements चा जास्त वापर करू नका.
हे घटक काढून टाकल्यावर पण तुमचा Logo हा युजरला अर्थपूर्ण वाटायला हवा.
Tips #2: Logo ची Size महत्वाचा नसते. तुमचा Logo मोठा असो किंवा लहान, पण तो Readable हवा.
Logo हा कधी हि खूप लहान Size पाहिले जात नाही. हा एक चुकीचा गैरसमज आहे.
खरं तर, वर्डप्रेसनुसार 180px by 60px इतकालहान Logo आकार असायला हवा.
Tips #3: तुमचा Logo डिझाइन कालातीत बनवा
बरेच जण आयकॉन्स, इमेजरी आणि डिझाइन ट्रेंड्स युज करतात. परंतु Long Time साठी या गोष्टी उपयुक्त नाही आहेत.
उदाहरणार्थ, आज CD किंवा ९० च्या दशकातील कॉम्पुटरचा मॉनिटर किंवा फ्लिप फोन किती जुने दिसतात याचा विचार करा? या Elements चा युज करून जर कोणताही Logo आज बनवला तर तो लगेच जुना दिसतो.
याचा अर्थ असा की आजची टेक्नॉलॉजी आपण जी पाहतो ती कदाचित 10 वर्षां नंतर जुनी दिसायला लागेल – म्हणून तुमच्या Logo मध्ये स्मार्टफोन किंवा लॅपटॉपचा आयकॉन समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू नका.
तसेच, अतिरेकी ग्रॅडिएंट्स, 3d इफेक्ट्स डिझाइन ट्रेंड्स 5-10 वर्षांपूर्वी फेमस होते परंतु आज ते जुने दिसू लागले आहेत.
Tips #4: स्केलबिलिटी वर फोकस करा
तुमच्या Logo ला विविध शेप आणि साईझ मध्ये बसवणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या वेबसाइटसाठी रुंद Wide फॉरमॅट आयताकार
(rectangular) Logo बेस्ट आहे, परंतु तुम्ही जर सोशल मीडिया प्रोफाइल नीट बघितले असतील तर ते चौकोनी असतात.
म्हणून, तुम्ही तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटसाठी Logo तयार करताना तुमच्या Logo चे विविध Shape /Size फॉरमॅटमध्ये बनवून चेक करू शकता.
अशा प्रकारचे Logo डिझाइन थोडे कठीण असता.
Tips #5: तुमच्या ब्रँडच्या कलरच्या नियमांना फॉलो करा
तुमच्या कलर तुमच्या ब्रँडच्या कलर प्लेटशी जुळत असल्याची खात्री करा.
तसेच, डोळ्यांना त्रास होणारे अतिशय डार्क कलर टाळा.
Using Canva to Create Your Logo
Logo बनवण्यासाठी पहिली स्टेप, तुम्हांला Canva.com च्या ऑफिसिअल वेबसाईटला ओपन करायचं आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईट वर आले असाल तर Account तयार करा. आजच्या लेखात मी Logo बनवण्याची जी प्रोसेस सांगणार आहे ती Canva च्या फ्री प्लॅन द्वारे तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला Paid Plan घेण्याची काही आवश्यकता नाही.
आता, नेक्स्ट स्टेप “Create a Design” हा आहे. मी कस्टम साईझ आणि 700px x 250px चा कॅनव्हास साईझचा युज करा.
मी ही large measurements सजेस्ट करते. कारण फ्री Canva तुम्हाला साईझ बदलण्याची जास्त परवानगी देत नाही, त्यामुळे तुम्ही Logo ची गरज असलेल्यापेक्षा मोठे बनवू शकता आणि नंतर फ्री ऑनलाइन सॉफ्टवेअर वापरून ते कमी करू शकता.
बरेच जण Canva वर जे premade templates असतात त्याचा युज करतात मात्र तुम्ही अजिबात तस करू नका.
जर तुम्हाला Professional Logo बनवून हवा असेल तर तुम्ही माझ्या टीमशी Contact करू शकता. आम्ही कमीतकमी किंमतीत तुमच्या ब्लॉगसाठी Brand Logo तयार करून देऊ.
मित्रांनो, जर ब्लॉग Logo बनवत असतांना Canva वर तुम्हाला तुमच्या आवडीचे किंवा तुमच्या Niche संबंधित आयकॉन मिळत नसल्यास तुम्ही खालील वेबसाईट वरून आयकॉन घेऊ शकता.
जर तुम्हाला आजच आर्टिकल हेल्पफुल वाटलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही इंस्टाग्रामला @bloggervinita पेजला विचारू शकता. धन्यवाद.
अधिक वाचा: What is SEO in Marathi | SEO म्हणजे काय?