Top 7 Best Blogging Tools in Marathi | प्रत्येक ब्लॉगरने युज करावे असे महत्वपूर्ण ब्लॉगिंग टूल्स

Best Blogging Tools in Marathi: मित्रांनो, तुम्ही पण योग्य ब्लॉगिंग टूल्सच्या शोधात आहात का? कारण ब्लॉगिंग टूल्सचा युज करून आपण आपल्या कामाची Quality तसेच सर्च इंजिन रँकिंगमध्ये देखील सुधारणा करू शकतो.

मी माझ्या गेल्या 3 वर्षाच्या ब्लॉगिंग प्रवासामध्ये अनेक Blogging Tools चा युज केला. मी नवनवीन गोष्टी एक्सप्लोर केल्या त्यानंतर माझ्या लक्षात आलं कि, जास्त टूल्स युज करण्यापेक्षा कमी टूलचा युज करून चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Top 7 Best Blogging Tools विषयी सांगणार आहे. जे स्वतः मी माझ्या ब्लॉगिंगच्या कामात युज करते. कृपया त्यासाठी शेवट्पर्यंत हा लेख वाचा. 

ज्या ब्लॉगिंग टूल्स विषयी मी Information शेअर करणार आहे ते आयडियाज, प्लांनिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला हेल्प करतात. तुम्हाला फक्त योग्य पद्धतीने ब्लॉगिंग टूल्सचा युज करता यायला हवा.

Best Blogging Tools in Marathi

#1 WordPress

तुम्ही सर्वांनी वर्डप्रेसचे नाव नक्की ऐकले असेल. नवीन ब्लॉगर साठी वर्डप्रेस अतिशय Flexible प्लॅटफॉर्म आहे. परंतु, जर तुम्हाला हे टूल युज करायचं असेल तर तुम्हाला थोडी फार इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. एकदा का तुम्हाला या टूलची सवय झाली तर तुम्ही तुमचा ब्लॉग नेहमी WordPress वरच बनवाल. इथे तुम्हाला थीम्स, प्लगिन इत्यादी महत्वपूर्ण ब्लॉगिंगशी संबंधित गोष्टी एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात.

Best Blogging Tools in Marathi
Image Sorce: WordPress

वर्डप्रेसची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • ड्रॅग-ड्रॉप ब्लॉक एडिटर: या फीचर्स मुळे वर्डप्रेस वापरण्यास सोपे आहे. जेणेकरून तुम्ही तुमची पोस्ट किंवा पेज कमी वेळात तयार करू शकता. 
  • 80,000 पेक्षा जास्त प्लगइन्स आणि थीम: तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचे ब्लॉग पूर्णपणे कस्टमाइझ करू शकता.
  • SEO टूल: Rankmath/Yoast SEO सारख्या प्लगइन्स तुमच्या ब्लॉगला Google च्या टॉप पेजवर आणण्यास मदत करतात. 

वर्डप्रेसचा युज कसा करायचा या संबंधित माहिती Youtube तसेच Google वर तुम्हाला मिळून जाईल.

तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने फ्रंट-एंड आणि बॅक-एंड दोन्ही बाजूंवर तुमचा ब्लॉग पूर्णपणे कस्टमाईज करू शकता.

जर तुमच्याकडे खरोखर वर्डप्रेस वेबसाइटची डिझाइन आणि देखभाल करण्यासाठी वेळ, पैसा आणि अनुभव असेल तर तुम्ही एकदा नक्की युज करू शकता. 

#2 Grammarly

तुमच्या ब्लॉग पोस्टची ड्राफ्ट फाईल तयार करा किंवा तो कन्टेन्ट कॉपी करून Grammarly च्या एडिटरमध्ये पेस्ट करा. तुम्ही Grammarly चे Google Chrome ब्राउजर एक्सटेन्शन इनस्टॉल करून देखील युज करू शकता. या टूलचा युज केल्यामुळे तुम्ही Google Docs, LinkedIn आणि इतर ठिकाणी लिहिताना सजेशन मिळवू शकता.

Best Blogging Tools in Marathi
Image Source: Grammarly

मी स्वतः माझ्या क्रोममध्ये Grammarly चे एक्सटेन्शन इन्स्टॉल केले आहे. खरोखर कन्टेन्ट लिहीत असतांना मला या टूलची हेल्प होते. मला माझ्या बऱ्याच चुका समजतात. जर तुम्हाला पण माझ्या सारखं नेहमी कन्टेन्ट लिहण्याचे काम असेल तर तुम्ही नक्की युज करू शकता.

Grammarly प्रमुख वैशिष्ट्ये:

  • स्पेलिंग आणि ग्रामर चेक करणे 
  • लिहिण्यास मदत करणारा कन्टेन्ट तयार करण्याची क्षमता या टूलमध्ये आहे. 

#3 Canva

Canva हे ब्रँडेड इमेजस आणि टेम्पलेट्स तयार करण्यासाठी एक बेस्ट टूल  आहे. खरं तर, इमेज टेम्पलेट्स युज करणे खूप सोपा ऑप्शन आहे. 

Best Blogging Tools in Marathi
Image Sorce: Canva

कॅनवा हे फ्री आहे, परंतु अधिक टेम्पलेट्स आणि अतिरिक्त फीचर्स साठी तुम्ही त्यांच्या पेड प्लान्सकडे अपग्रेड देखील करू शकता. कॅनवाच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी लोगो देखील बनवू शकता.

Canva प्रमुख वैशिष्ट्ये:

  • कोणत्याही प्रकारचं डिझाईनिंग स्किल नसतांना तुम्ही इमेजेस एडिट करू शकता. 
  • हजारो page templates, elements, icons, तुम्ही युज करू शकता. 

#4 Google Analytics

Google Analytics हे गूगल च टूल आहे. या टूलच्या  मदतीने आपण आपली वेबसाइटची कामगिरी ट्रॅक आणि विश्लेषण करू शकतो. ही वेबवर सर्वाधिक वापरली जाणारी वेब विश्लेषण टूल आहे.

बरेचसे ब्लॉगर फक्त काही मिनिटांत बेसिक सेट अप करू शकतात. परंतु, विश्लेषणासाठी तुमच्या वेब मेट्रिक्सचे तुकडे करण्याच्या आणि त्यांचे विश्लेषण करण्याच्या अनेक शक्यता आहेत.

गूगल ऍनालिटिक्स खालील महत्त्वाच्या कंटेन्टचे कामगिरी मेट्रिक्स ट्रॅक करू शकतो:

Best Blogging Tools in Marathi
Image Sorce: Google Analytics
  • Organic Traffic: सर्च इंजिनाद्वारे तुमच्या ब्लॉग पोस्ट शोधणारे किती लोक
  • User Engagement: युजर इगेजमेंट म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या वेब पेजवर किती वेळ घालवते.
  • Conversions: तुमच्या वेबसाइटला भेट दिल्यानंतर वाचक इच्छित प्रोसेस (जसे तुमच्या न्यूजलेटरसाठी साइन अप करणे) इत्यादी.

#5 Google Search Console

Google Search Console हा वेबसाइट मालकांसाठी (Website Owner) आणि ब्लॉगर (Blogger)  साठी एक फ्री वेब सर्विस आहे. ज्याद्वारे ते Google च्या सर्च रिजल्टमध्ये त्यांच्या वेबसाइटची कामगिरी (Performance) पाहू आणि सुधारू शकतात.

Google Analytics तुमच्या ब्लॉगवर जे घडते त्या गोष्टी मोजते तर Google Search Console Google च्या सर्च इंजिन रिजल्ट पेजमध्ये (Search Engine Result Pages – SERPs) काय होते ते मोजते. विशिष्ट कीवर्डसाठी त्यांचे ब्लॉग पोस्ट कसे Rank करतात हे पाहण्यासाठी ब्लॉगरसाठी हे उपयुक्त माहिती प्रदान करते.

Google Search Console चा फायदा समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. 

Best Blogging Tools in Marathi
Google Search Console

गृहीत धरा की तुम्ही “content marketing framework” या कीवर्डला टार्गेट  करून एक ब्लॉग पोस्ट प्रकाशित केली आहे.

ब्लॉग पोस्ट प्रकाशित केल्यानंतर Google तुमची पोस्ट (Index) करण्याची वाट पाहिल्यानंतर, Google Search Console मध्ये जा आणि डाव्या बाजूच्या साइडबारवरील Performance टॅबवर क्लिक करा.

वरील चार्टच्या फिल्टर्समध्ये “Content Marketing Framework” ही (query) शोध. तुम्हाला कालांतराने तुमच्या कंटेन्टची सरासरी रँकिंग स्थिती दिसून येईल.

#6 Google Trends

बहुतांश ब्लॉगर गूगल ट्रेंड्सच्या सोबत किवर्ड प्लानर (Keyword Planner) युज करतात कारण किवर्ड प्लानरद्वारे ओळखले गेलेले कोणतेही किवर्ड गूगल ट्रेंड्समध्ये चालवता येतात.

Best Blogging Tools in Marathi
Image Sorce: Google Trends
गूगल ट्रेंड्सची मुख्य वैशिष्ट्ये (Key features):
  • किवर्ड ट्रेंड्स पहा: एखाद्या विशिष्ट कालावधीत किवर्डच्या लोकप्रियतेमध्ये होणारे बदल आपण पाहू शकतो.
  • सर्च व्हॉल्युम कसे बदलते ते पहा: एखाद्या किवर्डची सर्च व्हॉल्युम वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी कशी वाढते किंवा कमी होते ते पहा.
  • विशिष्ट प्रदेशातील किवर्ड कामगिरी: एखादा किवर्ड विशिष्ट प्रदेशात किती लोकप्रिय आहे ते पहा.
  • संबंधित विषयांमधून आणि क्वेरी मधून कंटेंट आयडीयाज मिळवा: तुमचा किवर्डशी संबंधित असलेल्या विषयांवर आणि सर्च वरून नवीन ब्लॉग पोस्टसाठी आयडिया मिळवा.

मी स्वतः Google Trends युज करते. 

#7 Keyword Planner

तुमच्या ब्लॉगसाठी Keyword Planner हा एक फ्री आणि सोपा पर्याय आहे. 

Best Blogging Tools in Marathi
Image Sorce: Keyword Planner

हे टूल विशेषत: Ad साठी डिझाइन केलेले असले तरी, अनेक ब्लॉगर त्यांच्या कन्टेन्ट साठी देखील Keyword Planner वापरतात. उदाहरणार्थ, Backlinko चे संस्थापक Brian Dean यांनी या टूलच्या मदतीने त्यांच्या साइटची ऑर्गॅनिक ट्रॅफिक जवळपास ३ लाख व्हिजिटर्स पर्यंत वाढवली.

Keyword Planner ची मुख्य वैशिष्ट्ये (Key features):

  • किवर्ड रिसर्च (Keyword Research): तुमच्या ब्लॉग पोस्टसाठी योग्य किवर्ड शोधण्यासाठी मदत करते.
  • कन्टेन्ट प्लांनिंग (Content planning): तुमच्या किवर्डवर आधारित कन्टेन्ट तयार करण्यासाठी मदत करते.
  • देश किंवा प्रदेशातील किवर्ड आणि सर्च वोल्युम तुम्ही चेक करू शकता. 
  • Keyword Planner वापरण्यासाठी Google Ads Account आवश्यक आहे, परंतु ते पूर्णपणे फ्री आहे. तुमचे Ads Account सेटअप करा आणि नंतर कोणत्याही Ad चालू नका करा. 

How to Choose the Right Blog Tools for You

ब्लॉगिंग SEO करण्यासाठी असो, वाचकसंख्या वाढवण्यासाठी असो किंवा न्यूजलेटरसाठी सबस्क्राइबर मिळवण्यासाठी असो, योग्य टूल्सचा युज केल्यामुळे फायदा होतो. 

मग योग्य टूल कसं सिलेक्ट करायचं?

या स्टेप्सचा वापर करून तुम्ही Best Blogging Tools in Marathi युज करू शकता. 

उद्दिष्ट (Purpose): सर्वात आधी हे लक्षात आणा कि, टूलने कोणत्या समस्या सोडवायची आहे. जसे Google Search Console सारख्या टूल्स तुम्ही आधीपासून पोस्ट केलेल्या कंटेनच्या यशस्वितेचे विश्लेषण करण्यास मदत करतील.

योग्य Blogging Tools तुमच्या प्रक्रिया सुव्यवस्थित करू शकतात, कार्यक्षमता वाढवू शकतात आणि तुमच्या ब्लॉग कंटेन्टची गुणवत्ता देखील वाढवू शकतात.

अशाच महत्वपूर्ण ब्लॉगिंग संबंधित माहितीसाठी आपल्या Bloggervinita या ब्लॉगला फॉलो करा. मी नवनवीन ब्लॉगिंग शी रिलेटेड महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आणत असते. तसेच तुमच्या ब्लॉगर मित्राला हि पोस्ट नक्की शेअर करा. धन्यवाद. 

WhatsApp Channel Follow Me
Telegram Channel Follow Me
Instagram Page Follow Me

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment