Best 7 Marathi Blogs & Bloggers | 2024 मध्ये तुम्ही Inspiration घेऊ शकता असे बेस्ट 7 मराठी ब्लॉग्स आणि ब्लॉगर 

Best 7 Marathi Blogs & Bloggers: नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना ब्लॉगिंग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! ब्लॉगिंग म्हटलं म्हणजे आजच्या काळात कमाईचे एक उत्कृष्ट साधन असं आपल्याला वाटतं. काही प्रमाणात ते खरं हि आहे. मात्र एका ब्लॉगला यशस्वी होण्यासाठी ब्लॉगरला खूप मेहनत हि घ्यावी लागते. कारण ब्लॉगिंग मध्ये कोणीच आतापर्यंत एका दिवसात किंवा एका रात्रीत यशस्वी झालेले नाही आहे आणि होऊ पण शकत नाही. 

आजच्या लेखात मी तुम्हाला टॉप 7 मराठी ब्लॉग्स आणि ब्लॉगर्स विषयी माहिती शेअर करणार आहे. महत्वाचं म्हणजे सर्व ब्लॉगर हे आपल्या महाराष्ट्राचे आहे. तुमच्या साठी खरोखर हे ब्लॉग्स तसेच ब्लॉगर्स मोटिव्हेशन ठरू शकतील. त्या सोबत सर्वांत महत्वाची गोष्ट अशी कि, तुम्हाला या 7 ब्लॉग मधून खूप महत्वपूर्ण नवीन माहिती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.

Best 7 Marathi Blogs & Bloggers

1) Akshay Raskar

आज ब्लॉग्गिंग क्षेत्रात अक्षय रासकर हे फक्त एक यशस्वी ब्लॉगर नसून एक उत्तम असे मार्गदर्शक देखील आहे. अक्षय रासकर सर हे मागील २ ते ३ वर्षांपासून जास्त सोशल मीडियावर चर्चेत आले. त्याचे कारण हि तसेच आहेत. हल्ली आपण आपल्या आजूबाजूला ऐकतो कि, शेतकऱ्याचा मुलगा IAS झाला डॉक्टर झाला मात्र सरांची कहाणी हि खूपच आगळीवेगळी आणि प्रेरणादायी आहे. सर पण शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे आणि त्यात पण मराठवाड्यासारख्या  दुष्काळग्रस्त भागातून एक सर्वसामान्य माणूस असामान्य कामगिरी ऑनलाईनच्या दुनियेत करत आहे. हि खरोखर मराठी तरुणांसाठी एक अभिमानाची बाब आहे. 

आपल्या मराठी माणसाकडे पाहून असं म्हटलं जात कि, मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो मात्र असे अजिबात नाही आहे. किंबहुना अक्षय रासकर सर याला अपवाद आहे. सर स्वतः तर ब्लॉगिंगच्या माध्यमातून चांगली कमाई तर करत आहे पण त्यासोबतच त्यांनी आपल्या गावातील तरुणांना एकत्र करून त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

सरांचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५० -१०० ब्लॉग आहेत. सरकारी योजना, शेती या विषयांवर ते काम करता. आज डिजिटल क्षेत्रात आपण आपलं एक यशस्वी करिअर करू शकतो. याच उत्तम उदाहरण अक्षय रासकर सर आहेत. मात्र त्यांना हे यश एका दिवसात किंवा एका रात्री मध्ये मिळालेले नाही आहे. तर या मागे त्यांची अनेक वर्षांची मेहनत आहे. 

2) Marathi Corner – Shubham Pawar

https://bloggervinita.com/best-marathi-blogs-bloggers/
Image Credit: Instagram

शुभम पवार हे एक मराठी YouTuber तर आहेत मात्र ते एक उत्कुष्ट ब्लॉगर देखील आहेत. त्यांच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान हि म्हण त्यांच्या व्यक्तिमत्वाला लागू होते. हे जरी खरे आहे कि, त्यांनी खूप कमी कालावधीत खूप काही लोकप्रियता मिळवली. मात्र शुभम सरांची यात कित्येक वर्षांची मेहनत, सातत्य आणि जिद्द आहे. टॉप 7 मराठी ब्लॉग मध्ये मराठी कॉर्नर हा ब्लॉग येतो. या ब्लॉगवर महाराष्ट्रातील महाराष्ट्र सरकारच्या सरकारी योजना, शेतकरी योजना, महाराष्ट्र शासन GR, इत्यादी टॉपिक वर ते मराठी मध्ये ब्लॉग लिहतात. जर तुम्हाला पण Youtube मध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की शुभम सरांच मार्गदर्शन घ्या.

3) Blogger Vinita – Vinita Mali

https://bloggervinita.com/best-marathi-blogs-bloggers/
Image Credit: Instagram

मित्रांनो, तुम्ही जो ब्लॉग आता वाचत आहात तो माझा स्वतःचा म्हणजे ब्लॉगर विनिताचा आहे. या ब्लॉगची सुरुवात १८ ऑगस्ट २०२३ ला करण्यात आली. या ब्लॉगला तयार करण्यामागचा मुख्य उद्देश असा होता कि, आज प्रत्येकाला ब्लॉगिंग क्षेत्रात यायचं तर आहे त्यासाठी बरेच जण धडपड पण करता मात्र त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही. त्यात पण मराठी भाषेमध्ये हवी ती ब्लॉगिंग संबंधित माहिती उपलब्ध नसते.

मी स्वतः जेव्हा ब्लॉगिंग सुरु केली होती तेव्हा मराठी मध्ये त्यातल्या त्यात मला हवे तसे प्लॅटफॉर्म नाही मिळाले. त्याचा परिणाम असा झाला कि, माझा प्रत्येक गोष्ट शिकण्यामागे वेळ गेला. मी माझ्या गेल्या ४ वर्षांमध्ये ब्लॉगिंग प्रवासात ज्या काही चुका केल्या तसेच ब्लॉगिंग संबंधित संपूर्ण माहिती मराठीमध्ये शेअर करण्यासाठी bloggervinita या ब्लॉगची स्थापना करण्यात आली आहे.

या ब्लॉगवर मी कोणतीही माहिती शेअर करण्या अगोदर स्वतः आधी पूर्णपणे रिसर्च करते तेव्हाच तुमच्या सोबत ती शेअर करते. जेव्हा तुम्हा सर्व वाचक वर्गाचे मला सकारात्मक फीडबॅक येतात तेव्हा मला माझ्या कामाचे चीज झाले असे वाटते. एका सर्वसामान्य मुली पासून एक चांगली ब्लॉगर हा माझा प्रवास खरोखर सोपा अजिबात नव्हता. मात्र तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि प्रेमाने मला नेहमी ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी मदत केली आहे.

4) Dnyanshala – Nitin Rathod

ज्ञानशाळा हा एक एजुकेशनल ब्लॉग आहे. मराठी मध्ये प्रत्येक वयोगटातील विद्याथ्याला उपयुक्त असं महत्वपूर्ण नवनवीन शैक्षणिक विषयांवर माहिती जसे कि, बातम्या, करिअर टिप्स, जनरल नॉलेज, Biography, इतिहास, शिष्यवृत्ती पोर्टल, फॅक्ट इत्यादी. नितीन राठोड सर या ब्लॉग वर प्रॉपर रिसर्च करून योग्य अशी माहिती मराठी मुलांपर्यंत पोहचवण्याचा पर्यन्त करता. तसेच त्यांचं इंस्टाग्राम ला ज्ञानशाळा नावाने देखील एक सोशल मीडिया पेज आहे. त्यात ते छान आणि सोप्या स्टेप्स मध्ये प्रत्येक गोष्टीचे बारकावे समजावून सांगतात. 

5) Swachandi – Seema Amrale

मी आता ज्या ब्लॉग तसेच ब्लॉगर विषयी बोलणार आहे. त्या एक महिला ब्लॉगर आहेत. त्यांना महिला ब्लॉगर म्हणण्यापेक्षा एक उत्तम लेखिका तसेच कवयत्री म्हटलेलं कधीही चुकीचे ठरणार नाही. टॉप 7 मराठी ब्लॉग तसेच ब्लॉगरच्या यादीत स्वछंदी हा ब्लॉग घेण्यामागचा माझा मुख्य हेतू असा कि, मी पहिल्यांदा कोणाला तरी निस्वार्थ भावाने आपल्या छंदावर प्रेम करताना पाहिलं आहे. मूळचे सीमा अमराळे मॅम हे पुण्याचे असून ते मागील काही वर्षांपासून ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यात आहेत.

आज ते जरी विदेशात राहत असे तरी १२ वर्षांनंतर देखील त्यांची नाळ हि महाराष्ट्राशी जोडली गेली आहे. आज सगळी कडे सर्व जण पैसा कसा जास्तीत जास्त कमवता येईल किंवा पैश्याच्या मागे वेड्यासारखं धावतांना मी अनेकांना बघितलं आहे. पण सीमा अमराळे मॅमच्या जेव्हा मी कॉन्टॅक्ट मध्ये आली तेव्हा वैयक्तिकपणे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच चेंज झाला. 

आता तुम्ही म्हणत असाल कि, तुमचा कॉन्टॅक्ट सीमा मॅम यांच्याशी कसं काय झाला तर  योगायोग असा झाला कि, त्यांचे Mister शंकर अमराळे यांनी मला लोगो डिझाइनींग साठी इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट केलेला. मी थोडं माझ्या कामात बिझी असल्यामुळे सरांशी माझा कॉन्टॅक्ट तेव्हा शक्य झाला नाही. तरी देखील ५-६ महिन्यांनी सरांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला ब्लॉगिंग कशा पद्धतीने करता, तुमच्या सर्विसेस कोणत्या कोणत्या? कारण ते ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन होते. मात्र लिखाणाच्या बाबतीत खूप छान. 

खरं सांगायचं झालं तर त्यांनी जेव्हा सर्विस घेतल्या तेव्हा सर्व प्रथम तर मी खूपच Upset होती. कारण माझ्या स्वतः साठी interntional Clients ला सर्विस Provide करणे हा पहिला अनुभव राहणार होता. त्यात पण जरी ते मराठी भाषिक असले तर ऑस्ट्रेलिया मध्ये राहत असल्यावर म्हणायचं झालं तर ते फाडफाड इंग्लिश मध्ये बोलणार. माझ्या साठी सर्वात मोठं आव्हान ते होत. तस माझ्या टीमला इंग्लिश मध्ये बोलायला काही प्रॉब्लेम नसला तरी मला As A Freelancer स्वतःला बोलायला खूप भीती वाटायची… 

मात्र पहिल्याच मिटिंग मध्ये मॅमनी माझी भीती दूर केली. खूपच मनमोकळा स्वभाव तसेच ते संपूर्ण पणे माझ्याशी तसेच माझ्या टीमशी शुद्ध मराठी मध्ये बोलले. त्यांच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता. मला सुरुवातीला वाटलं कि, जसे बाकी क्लायंट लोक आपल्या कडे सर्विसेस साठी येतात त्यांचे मुख्य उद्दिष्ट्य हे पैसे कमवणे हे असत . मात्र खरं सांगायचं झालं तर हे ब्लॉगिंग मुळात पैसे कमवण्यासाठी करत नसून आपला छंद जोपासण्यासाठी हे सर्व करत होते.

माझ्या ब्लॉगिंग प्रवासात मी तरी पहिला ब्लॉगर असा बघितला. जो खरोखर जॉब करून घरातले सर्व काम मॅनेज करून आपला छंद जोपासत आहे. आज जरी ते त्यांच्या ब्लॉगवरून पैसे कमवत नसले तरी देखील माझ्यासाठी त्यांचा ब्लॉग तसेच वयाच्या चाळीशी नंतर देखील त्यांची इच्छाशक्ती एकंदरीत एक वेगळा Respect सीमा अमराळे मॅम विषयी आहे आणि तो  कायम राहीन. भले हि त्यांनी ब्लॉगिंग मधून पैसा नाही कमावला परंतु आपली माणसं आपली संस्कृती विदेशात असून देखील जपली.  

माझ्या स्वतः साठी कोणता ब्लॉगर महिन्याला त्याच्या ब्लॉगवरून किंवा कशा पद्धतीने पैसे कमवतो हे महत्वाचं नसतं तर तो ज्या ब्लॉगवर काम करत आहे ते किती डेडिकेशनने त्या कामावर त्याच किती प्रेम आहे ते समजत.

6) MN Nokari – Ravi Gavit

https://bloggervinita.com/best-marathi-blogs-bloggers/
Image Credit: Ravi Gavit

MN नोकरी हा ब्लॉग १२ डिसेंबर 2022 रोजी सुरु झाली. या एका ब्लॉगवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, नवनवीन ज्या काही सरकार भरत्या आहेत पाहावयास मिळतील. सर्वात महत्वाचं म्हणजे या ब्लॉगच मला एक वैशिष्ट्ये फार आवडलं. ते म्हणजे थोडक्यात अचूक माहिती शेअर करणे. रवी सरांना पण ब्लॉगिंग मध्ये खूप चांगला अनुभव आहे. कारण त्यांनी सर्व सामान्य ब्लॉगर प्रमाणे सुरुवात करून MN Nokari ला आज एका ब्रान्डच्या रूपात उभारलं आहे. ब्लॉगिंग क्षेत्रात यशस्वी असून पण ते कधी हि देखावा करत नाही. आज सोशल मीडिया चांगला युज करून त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. 

7) Tech in Marathi – Nandu Patil

https://bloggervinita.com/best-marathi-blogs-bloggers/

मित्रांनो, नंदू पाटील सरांना आपण सर्व जण ओळखतो. कारण सर त्यांच्या टेक व्हिडिओसाठी खूप प्रसिद्ध आहे. ते जरी टेक विडिओ साठी प्रसिद्ध असले तरीही त्यांचा Tech in Marathi हा ब्लॉग मला खरोखर खूप आवडला. कारण हल्ली टेक्नॉलॉजी संबंधित माहिती सगळीकडे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. मात्र या ब्लॉगवर तुम्हाला टेक्नॉलॉजी संबंधित संपूर्ण माहिती एकाच ब्लॉगवर मराठी मध्ये पाहावयास मिळेल. नंदू पाटील हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे मराठी टेक कंटेंट क्रीएटर आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.1 दशलक्ष आणि यूट्यूबवर 1.4 दशलक्षपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स आहेत. खरोखर नंदू पाटील सर आज टेक्नोलॉजी मध्ये उत्कुष्ट कामगिरी करत आहेत. 

मित्रांनो मी जे Top 7 Marathi Blogs & Bloggers विषयी तुम्हाला माहिती शेअर केली आहे. ती मी माझ्या स्वतः अनुभवलेल्या गोष्टींवरून सांगितली आहे. मला वैयक्तिक रित्या त्या लोकांची काम करण्याची पद्धत त्यांची कामाची गुणवत्ता आवडते. महत्वाचं म्हणजे मी या ब्लॉग मध्ये अशा लोकांची पण माहिती सांगितली आहे जे खूपच लोकप्रिय आहेत मात्र काही अशा लोकांविषयी पण सांगितलं आहे जे ब्लॉगिंग क्षेत्रात नवीनच आहेत. पुन्हा एकदा ब्लॉगर दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

आणि हो मित्रांनो, तुम्ही पण आज ब्लॉगर दिनाचा संकल्प घ्या कि, मी पण एक दिवस नक्की यशस्वी होईल. जर मला वैयक्तिक रित्या तुमचा ब्लॉग आवडला तर मी निश्चितीच पुढील ब्लॉगर दिनाच्या दिवशी तुमच्या ब्लॉग आणि तुमच्या विषयी माहिती शेअर करेल. म्हणून कामाला लागा. धन्यवाद.

अधिक वाचा: Top 5 AI Tools For Content Writing in Marathi | मराठी कंटेंट रायटिंग सोपे करणारी 5 जबरदस्त AI Tool

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

2 thoughts on “Best 7 Marathi Blogs & Bloggers | 2024 मध्ये तुम्ही Inspiration घेऊ शकता असे बेस्ट 7 मराठी ब्लॉग्स आणि ब्लॉगर ”

Leave a Comment