ब्लॉगचं नाव Attractive असणं का महत्त्वाचं आहे? ब्लॉगचं नाव तुमच्या वाचकांना त्वरित कनेक्ट करायला हेल्प करतं, तुमचा ब्रँड तयार करतो, आणि पहिला इम्प्रेशन चांगला पडतो. म्हणूनच, Attractive ब्लॉग नेम महत्त्वाचं आहे. हे वाचकांचं लक्ष आकर्षित करून घेतं, म्हणून तुमचं नाव असं असावं की ते लगेच लक्षात राहील.
आजच्या या आर्टिकल Best Marathi Blog Name Ideas 2024 मध्ये तुम्हाला खालील काही महत्वपूर्ण पॉइंट्स पाहवयास मिळतील:
- ब्लॉगचं नाव निवडण्याचे टिप्स
- ब्लॉग नेमचे उदाहरण
- फ्री ब्लॉग नेम जनरेटर्स
Best Marathi Blog Name Ideas 2024: 10 टिप्स
1. नाव लक्षात राहणारं असावं
आज खूप डोमेन्स आधीच रजिस्टर झालेत, त्यामुळे युनिक आणि आकर्षित नाव निवडणं गरजेचं आहे. असं नाव वाचकांचं अटेंशन वेधून घेईल. एकदा नाव ठरवल्यावर, तुमचे Friends, Family कडून Feedback घ्या आणि त्यांना नाव कसं वाटलं ते विचारा.
तुमचं ब्लॉग नाव बोलून पाहा, ते Pronounce करायला सोपं आहे का, हे बघा. साधं, उच्चारायला आणि स्पेल करायला सोपं नाव चांगलं लक्षात राहतं.
2. नाव दीर्घकाळ टिकणारं असावं
तुमचं नाव असं असावं की ते वेळेनुसार बदलणार नाही किंवा जुनं होणार नाही. नाव निवडताना असा विचार करा, “हे नाव ५ किंवा १० वर्षांनीसुद्धा Relevant असेल का?” कारण ते अतिशय गरजेचे आहे.
3. नाव Catchy आणि Unique असावं
लोकांना लक्षात राहणारं नाव हवं असतं. Catchy नाव लोकांच्या मनात कायम राहातं आणि त्यांना तुमचा ब्लॉग परत Visit करायला देखील सोपं जातं.
उदाहरण म्हणून Amezon किंवा Spotify घ्या. ही नावं छोटी, Pronounce करायला सोपी आणि वेगळी आहेत, त्यामुळे ती लोकांच्या लक्षात राहतात.
4. अंक आणि हायफन टाळा
ब्लॉगचं नाव निवडताना Numbers (उदा. 7) आणि Hyphens (उदा. my-blog) वापरणं Avoid करा. असं केल्याने लोकांकडून स्पेलिंगमधल्या चुका होण्याचे प्रमाण जास्त असते.
5. स्वतःचं नाव वापरा
जर तुमचं नाव वेगळं असेल, तर तुम्ही ते ब्लॉगसाठी वापरू शकता. खूप लोक Personal Branding साठी स्वतःचं नाव Domain म्हणून वापरतात. जसे माझं bloggervinita.com
स्वतःचं नाव वापरण्याचे फायदे
- वाचकांशी पर्सनल कनेक्ट होतो.
- Credibility वाढते, खासकरून जर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये Expert असाल
- स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे दिसता.
- पर्सनल ब्रान्ड तयार करण्यासाठी बेस्ट ऑप्शन.
6. नाव शक्य तितकं छोटं ठेवा
Amazon, eBay, Google, Facebook, Instagram, WhatsApp – या सर्व ब्रँड्समध्ये एक गोष्ट कॉमन आहे. सगळ्यांचे नावं एका शब्दाचं आहे!
उदाहरण म्हणून, तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट द्यायला प्राधान्य द्याल – StartLosingWeightWithSam.com किंवा GetFitSam.com?
लांबलचक नावं लक्षात ठेवायला खूपच अवघड असतात आणि युजर्सकडून टायपिंगच्या चुका होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे नवीन वाचकांना तुमच्या ब्लॉगला भेट देणं कठीण होऊ शकतं.
.com, .net, .org अशा लोकप्रिय डोमेन एक्स्टेंशन्स वापरण्याचा विचार करा. Hyphens वापरणं टाळा आणि नाव छोटं ठेवा जेणेकरून टायपिंगसाठी सोपं जाईल.
7. ब्लॉगचं वर्णन करणारा नाव निवडा
ब्लॉगचं नाव असं असावं जे लगेच तुमच्या ब्लॉगचा मुख्य विषय व्यक्त करतं. उदाहरणार्थ, एका ब्लॉगिंग ब्लॉगचं नाव “BloggerVinita” किंवा “Bloggingwithnitin” असू शकतं.
8. संबंधित Keywords वापरण्याचा प्रयत्न करा
ब्लॉगचं नाव SEO साठी Optimize करण्यासाठी त्यात Relevant Keywords टाकणं फायदेशीर ठरू शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही फिटनेसवर ब्लॉग चालू करणार असाल तर तुम्ही Keywords मध्ये खालील शब्द वापरू शकता:
- Fitness
- Workout
- Exercise
- Active
- Cardio
- Running
- Cycling
- Diet
- Training
हे शब्द एकत्र करून तुम्ही एक वेगळं नाव तयार करू शकता. उदाहरणार्थ, “Fitness” आणि “Training” एकत्र करून “Fitness Training” नाव तयार केलं जाऊ शकतं.
Keywords सर्च करण्यासाठी तुम्ही Semrush, Ubersuggest किंवा Google Keyword Planner सारखी टूल्स वापरू शकता.
9. Trademark infringement टाळा
कधी कधी योग्य ब्लॉग नाव निवडणं कठीण असतं. जर तुम्ही एखादं नाव अचानकपणे निवडलं जे दुसऱ्या कंपनीचं Trademarked आहे, तर ते कंपनी तुम्हाला Trademark Infringement बद्दल कोर्टात देखील खेचू शकते. त्यामुळे मित्रांनो रिस्क अजिबात घेऊ नका.
असं केल्यामुळे तुम्हाला तुमचं Domain नाव भविष्यात चेंज करावं लागू शकतं आणि कदाचित Damages सुद्धा भरावे लागू शकतात. म्हणूनच नाव निवडताना Trademark Infringement टाळणं महत्त्वाचं आहे.
नाव फायनल करण्यापूर्वी ते Trademarked, Copyrighted किंवा इतर कुठल्या कंपनीकडून वापरलं जातंय का याची खात्री करा.
नेहमी मी तुम्हाला सांगत असते कि, खूप साऱ्या चुका मी ब्लॉगिंग मध्ये केल्या आहेत खूप म्हणजे खूपच त्यातली महत्वपूर्ण एक चूक म्हणजे चुकीचे डोमेन नेम निवडणे. मी भविष्यात नक्कीच तुमच्यासाठी 1 Casestudy आणेल. मात्र मला त्या एका चुकीमुळे खूप काही नवीन शिकायला मिळालं त्याचा आनंद पण तितकाच महत्वपूर्ण आहे माझ्यासाठी तरी.
10. नाव उपलब्ध आहे का ते चेक करा
तुमचं ब्लॉग नाव Available आहे का ते शेवटी चेक करा. Namecheap, Hostinger, GoDaddy यांसारख्या Domain Registration Tools वापरून तुम्ही ते पटकन Verify करू शकता.
तुमचं नाव Available असेल तर ते लगेच खरेदी करा, कारण पुढच्यावेळी ते उपलब्ध नसेल! अहो म्हणजे दिवसेंदिवस ब्लॉगिंग मध्ये स्पर्धा हि वाढत आहे असं.
Bonus Tip: तुमचं Domain असं Hosting Service कडून रजिस्टर करा जिथे Website Building, Web Hosting आणि Email Accounts सारख्या Additional Services देखील मिळतात, जेणेकरून ब्लॉग सेटअप करणं अजून सोपं जाईल. महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला Website Desinging येत नसेल तर तुम्ही माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता.
बेस्ट ब्लॉग नाव (Niche Pramane) 2024 साठी
तुम्हाला तुमच्या नवीन ब्लॉगसाठी आकर्षक नाव हवंय का? या वेगवेगळ्या Niche साठी काही ब्लॉग नावांचे सुचवलेले पर्याय पाहा, जे तुमच्या ब्लॉगसाठी योग्य असतील.
महत्त्वाचे खाली दिलेली अनेक ब्लॉग नावे विविध Domain Extensions सह उपलब्ध असू शकतात. त्यांचा वापर तुम्ही प्रेरणा म्हणून करा आणि इतर शब्दांची त्यात भर घालून त्यांना अजून युनिक बनवा.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला “Fin Lit” हे नाव आवडले तर तुम्ही “Daily,” “Tips,” किंवा “Insights” सारखे शब्द जोडून नावं तयार करू शकता, जसे की “FinLit Daily,” “FinLit Tips,” किंवा “FinLit Insights.”
1. Finance Blog Names
Finance Blogs मुख्यतः आर्थिक यशासाठी उपयुक्त स्ट्रॅटेजी कव्हर करतात. या Niche मध्ये तुम्ही Budgeting, Investing, आणि Tax Optimization सारखे विषय एक्सप्लोर करू शकता.
Finance ब्लॉगसाठी काही नावांचे पर्याय:
- Fin Lit (Financial Literacy ची संक्षिप्त रूप)
- Fund Nest
- Cash Craft
- Debt Defyer
- Invest Intel
- Money Maven
- Rich Flow
- Capital Mesh
- Finance Wrap
- Asset Blend
2. Food Blog Names
Food Blogs मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या Recipes, Food Trends, आणि Cooking Tips सापडतात. जर तुमचं ब्लॉगिंग Food संबंधित असेल तर ही नावे वापरू शकता:
- Tasty Craze
- Fresh Bite
- Bite Nest
- Food Crafters
- Flavor Me
- Feast Fusion
- Taste Hive
- Food Groove
- Palate Pleaser
- Tempting Tastes
3. Parenting Blog Names
Parenting Blogs मुलांच्या संगोपनाबद्दल उपयुक्त सल्ला देतात. इथे तुम्ही मुलांच्या वाढीशी संबंधित अनेक मुद्दे, पालकत्व शैली, आणि कौटुंबिक उपक्रम कव्हर करू शकता.
Parenting blogs साठी काही नावांचे पर्याय:
- Parento
- Mama Joy
- Parent Quest
- Mom Blend
- Kid Nest
- Fam Vibe
- Joy Nest
- Cuddle Up
- Parent Hive
- Well Womb
4. Lifestyle & Fashion Blog Name Ideas
Lifestyle आणि Fashion Blogs हे नवीन Trends, Outfits, आणि जीवनशैलीबद्दल माहिती देतात. या प्रकारच्या ब्लॉगमध्ये तुम्ही फॅशन, ब्युटी, वेलनेस, होम डेकोर इत्यादी विषय एक्सप्लोर करू शकता.
Lifestyle आणि fashion साठी काही उत्तम नावांचे पर्याय:
- Life Glow
- Trend Wave
- Style Pulse
- Wardrobe X
- True Vitality
- Modista
- Stylo
- Dazzle Me
- Glam Goddess
- Posh Palace
5. Fitness Blog Names
Fitness Blogs मध्ये व्यायामाच्या पद्धती आणि पोषणाबद्दल सल्ले दिले जातात. येथे तुम्ही घरगुती व्यायाम, Gym Routines, आहार, Fitness Challenges यांसारखे विषय कव्हर करू शकता.
Fitness ब्लॉगसाठी काही नावांचे पर्याय:
- Fit Flex
- Flex Core
- Fitness Fusion
- Fit Mind Body
- Active Impact
- Energy Flow
- Gym Pulse
- Lift Wave
- Run Mix
- Power Duo
6. Travel Blog Names
Travel Blogs सहसा प्रवासाच्या अनुभवांची माहिती आणि नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याच्या टिप्स शेअर करतात. इथे तुम्ही प्रवासाच्या टिप्स, बजेटिंग, Backpacking, लोकप्रिय आकर्षणे यासारखे विषय कव्हर करू शकता.
Travel blogs साठी काही उत्तम नावांचे पर्याय:
- Wanderly
- Globe Trek
- Journey Joy
- Omni Wander
- Globe Hopper
- Explore Zen
- Jet Setter
- Fly Path
- Way Finder
- Nomad Works
याच प्रकारे, इतर Niches साठीही नावं तयार करता येतील, तुमच्या ब्लॉगच्या थीमनुसार!
2024 मध्ये वापरायला योग्य 5 फ्री ब्लॉग नाव जनरेटर टूल्स
आपल्या ब्लॉग किंवा बिजनेस वेबसाइटसाठी परफेक्ट डोमेन नाव शोधण्यात अडचण येत असेल, तर 2024 मध्ये वापरायला योग्य काही फ्री ब्लॉग नाव जनरेटर टूल्स आहेत. येथे काही टूल्सची लिस्ट दिली आहे:
1. Hostinger’s Domain Name Search Hostinger
हे एक फ्री डोमेन सर्च टूल आहे. ज्यामुळे आपण झपाट्याने उपलब्ध डोमेन्स शोधू शकता. यासोबतच, Hostinger ची फ्री AI डोमेन जनरेटर टूल वापरून आपल्याला नवीन डोमेन कल्पना मिळवता येतात. फक्त आपल्या वेबसाइट किंवा बिझनेसच्या संक्षिप्त वर्णन द्या आणि हे टूल लगेच उपलब्ध डोमेन्सची लिस्ट सुचवेल.
2. Shopify Business Name Generator
आपल्याला ऑनलाइन स्टोअर सुरू करायचे आहे आणि नाव शोधण्यात अडचण येत आहे का? Shopify च्या बिझनेस नाव जनरेटर टूलचा वापर करा. हे फ्री AI-आधारित टूल आपल्याला विविध बिझनेस नावांच्या कल्पना सुचवते.
3. Namelix
हे एक फ्री टूल आहे जे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून छोट्या आणि आकर्षक नावांची निर्मिती करते. फक्त एक कीवर्ड आणि आपल्या बिझनेचचे किंवा वेबसाइटचे संक्षिप्त वर्णन द्या आणि हे टूल आकर्षक डोमेन्सची लिस्ट आणि लोगो सुचवेल. उदाहरणार्थ, “SEO” कीवर्ड दिल्यावर, टूल डोमेन्ससोबत लोगो सुचवेल. मी स्वतः या टूलचा युज करते. डोमेन नेम सर्चिंग साठी माझे हे फेव्हरेट टूल आहे.
4. Namify
एक लोकप्रिय डोमेन नाव जनरेटर आहे जे नवीन ब्लॉग किंवा कंपनी नावांच्या कल्पनांसाठी फ्री टूल आहे. एक किंवा दोन कीवर्ड द्या आणि हा टूल आपल्याला चांगल्या डोमेन नावांच्या शेकडो कल्पना सुचवेल.
5. Nameboy
एक लोकप्रिय डोमेन नाव जनरेटर आहे जो 1999 मध्ये सुरू झाला. हा टूल फ्री आहे आणि आपल्या ब्लॉगसाठी किंवा कंपनीसाठी नवीन नावांची कल्पना देतो. एक किंवा दोन कीवर्ड द्या आणि हा टूल आपल्याला अनेक चांगल्या डोमेन नावांच्या कल्पना सुचवेल.
ही टूल्स आपल्याला एक चांगले आणि लक्षात राहणारे डोमेन नाव शोधण्यात मदत करतील.
निष्कर्ष
मित्रांनो, सुरुवातीला आपल्या ब्लॉग किंवा बिजनेससाठी परफेक्ट नाव शोधणे अत्यंत कठीण असू नये. आजकाल, आपल्याकडे अनेक फ्री AI Tools आहेत जे आकर्षक नाव शोधण्यात मदत करतात.
डोमेन नाव उपलब्ध असतानाच ते लगेच खरेदी करणे गरजेचे आहे. नाव निवडताना Creativity चा विचार करा.
जर तुम्हाला तुम्हाला तुमच्या ब्लॉग नाव निवडीसाठी काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर बेस्ट डोमेन नेम तुमच्या निश नुसार सिलेक्ट करायला हेल्प करतील. आजचा ब्लॉग जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमचा जो कोणी मित्र किंवा सहकारी जो आता ब्लॉग स्टार्ट करायचा विचार करत आहे त्याला एकदा नक्की हा ब्लॉग शेअर करा. कारण त्याला तुमच्या एका शेअरिंग मुळे हेल्प होईल. धन्यवाद.
अधिक वाचा: How to get Google AdSense Approval in Marathi | Google AdSense Approval कसे करायचे – 2024 मध्ये
FAQ Best Marathi Blog Name Ideas For 2024
1. एक चांगले ब्लॉग नेम काय असावे?
चांगले ब्लॉग नेम सोपे उच्चारण्यास, लक्षात ठेवण्यास आणि टाईप करण्यास सोपे असावे. हे आपल्या ब्लॉगच्या थिम किंवा व्यक्तिगत ब्रँडचे वर्णन करावे.
2. ब्लॉगमध्ये डोमेन नाव काय आहे?
डोमेन नाव म्हणजे आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटचा वेब पत्ता. हे “www.” किंवा “https:// ” नंतर येणारे भाग आहे. उदाहरणार्थ, “www.Bloggervinita.com” या URL मध्ये, “BloggersVinita” हे डोमेन नाव आहे.
3. लाइफस्टाइल ब्लॉगसाठी नाव कसे निवडावे?
आपल्या लाइफस्टाइल ब्लॉगचा विशिष्ट थिम किंवा विषय विचारात घ्या. आपल्या ब्लॉगच्या थिमचे वर्णन करणारे शब्द वापरा.
4. आपल्या ब्लॉगचे नाव स्वतःवर ठेवावे का?
होय, जर आपले नाव किंवा आडनाव खास असेल आणि लक्षात ठेवण्यास आणि टाईप करण्यास सोपे असेल – तर नक्कीच ते डोमेन नाव म्हणून घेऊ शकता.