How to Keyword Research For Marathi Blog | मराठी ब्लॉगसाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे?

How to Keyword Research For Marathi Blog: कीवर्ड रिसर्च हा SEO (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या मराठी ब्लॉग किंवा वेबसाईट वर गुगल, बिंग अशा सर्च इंजिनमधून अधिकाधिक ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवण्यासाठी कीवर्ड्सचा योग्य वापर आवश्यक आहे. यासाठी कीवर्ड रिसर्चची मदत घेतली जाते.

कीवर्ड रिसर्च म्हणजे आपल्या ब्लॉगसाठी किंवा वेबसाइटसाठी योग्य कीवर्ड्स शोधून काढणे, ज्यामुळे गुगलवर आपले पेज लवकर रँक होईल. “How to Keyword Research For Marathi Blog” यासारख्या कीवर्ड्सचा वापर करून बेस्ट कंटेंट तयार करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण बेस्ट कन्टेन्टनच आपला ब्लॉग गुगलवर टॉपच्या स्थानी आणू शकतो.

यासाठी नेहमी लक्षात ठेवा की कीवर्ड्स स्टफिंग म्हणजेच जास्त प्रमाणात कीवर्ड्सचा वापर करणे टाळावे, कारण त्यामुळे गुगल आपले पेज डाउन करू शकते. योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी, आणि कंटेंटशी सुसंगत असलेले कीवर्ड्स वापरल्यास, तुमच्या ब्लॉगची रँकिंग सुधारेल आणि अधिक वाचक तुमच्या ब्लॉगवर येतील.

SEO कीवर्ड रिसर्च प्रक्रियेतील महत्त्वाचे मेट्रिक्स

1. Monthly Search Volume

कोणत्याही कीवर्डचा समावेश आपल्या ब्लॉगमध्ये करण्यापूर्वी, त्याची Monthly Search Volume किती आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

जर आपण कमी Search Volume असलेले कीवर्ड वापरत असाल, तर आपल्याला मिळणारा ऑर्गॅनिक ट्रॅफिक आणि कमाईही कमी होईल. त्यामुळे, नेहमी High Search Volume असलेल्या कीवर्डवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरते.

2. Actual Traffic/Clicks

जेव्हा एखाद्या कीवर्डसाठी लोक गुगलवर सर्च करता, तेव्हा त्यांचा आपल्या वेबसाईटवर येणं गरजेचं नाही. काही सर्च क्वेरीजसाठी गुगल स्वतःच युजरला उत्तर देतो, त्यामुळे लोक आपल्या साइटवर जात नाहीत.

उदाहरणार्थ, ‘आजची तारीख’ सर्च केल्यास गुगल त्याचं उत्तर सर्च रिझल्ट पेजवरच देतो. त्यामुळे या कीवर्डसाठी, प्रतिमाह १०० ते १००० शोधसंख्या असली तरी, प्रत्यक्ष ट्रॅफिक कमीच राहतो. कारण लोकांना त्यांचं उत्तर तिथेच मिळतं आणि त्यांना आपल्या साइटवर येण्याची गरज भासत नाही.

आजची तारीख
आजची तारीख

तुमच्या ब्लॉगसाठी योग्य कीवर्ड शोधण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स 

  • High Search Volume असलेले कीवर्ड निवडा: असे कीवर्ड वापरा ज्यांची Search Volume जास्त आहे, म्हणजे तुम्हाला जास्त ट्रॅफिक मिळेल.
Google Keyword Planner
Google Keyword Planner
  • सर्च वॉल्यूम आणि ट्रॅफिक लक्षात ठेवा: फक्त High Search Volume असलेल्या कीवर्डवर लक्ष केंद्रित करू नका, तर त्यांची प्रत्यक्ष ट्रॅफिक कशी आहे हे देखील चेक करा.
  • गुगलच्या सर्च रिजल्ट्सवर लक्ष ठेवा: तुम्ही वापरत असलेल्या कीवर्डसाठी गुगल कशा प्रकारचे रिजल्ट दर्शवितो, ते पाहा. यामुळे तुम्हाला कळेल की सर्च करणाऱ्या युजरला तुमच्या ब्लॉगवर येण्याची गरज भासेल का.

अशा प्रकारे योग्य कीवर्ड निवडून तुम्ही आपल्या ब्लॉगच्या दर्जात सुधारणा करू शकता आणि गुगलवर चांगली रँकिंग देखील मिळवू शकता. 

3. Keywords Search Trend

Keywords Search Trend
Keywords Search Trend

जेव्हा आपण मराठी ब्लॉगसाठी कीवर्ड रिसर्च करता, तेव्हा कीवर्ड रिसर्च टूल्स तुम्हाला Monthly Search Number देतात, पण ही संख्या १२ महिन्यांच्या सरासरीवर आधारित असते. काही महिन्यांत Search Numbers कमी असू शकते, तर काही महिन्यांत जास्त.

उदाहरणार्थ, ‘दिवाळी भेटवस्तू’ या कीवर्डसाठी ऑक्टोबर मध्ये Search Volume इतर महिन्यांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे, Search Volume चा आलेख पाहून तुम्ही योग्य कीवर्ड निवडू शकता, ज्यामुळे तुमच्या ब्लॉगचा ट्रॅफिक वाढेल.

4. Keyword SEO Difficulty

कीवर्ड एसईओ डिफिकल्टी म्हणजे, एखाद्या कीवर्डसाठी गुगलच्या सर्च रिझल्ट पेजवर टॉपवर स्थान मिळवण्यासाठी किती स्पर्धा आहे.

SEO टूल्स सर्च रिझल्टमध्ये पहिल्या १० साइट्सची ऑथॉरिटी, बॅकलिंक्स, आणि कंटेंटची क्वालिटी तपासून या स्पर्धेची गणना करतात.

जर कीवर्ड डिफिकल्टी कमी असेल, तर तुम्हाला त्या कीवर्डसाठी रँक होण्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे, योग्य कीवर्ड निवडण्यासाठी या मेट्रिक्सचा विचार करणे महत्वाचे आहे.

5. CPC

सीपीसी म्हणजे प्रत्येक क्लिकसाठी तुम्हाला दिली जाणारी रक्कम. गुगलच्या जाहिरात क्षेत्रात सीपीसी मानक म्हणून वापरला जातो.

ज्या क्षेत्रात जास्त स्पर्धा असते, तिथे सीपीसी जास्त असतो, जसे की विमा किंवा क्रेडिट कार्ड्स. उलट, कमी स्पर्धा असलेल्या क्षेत्रात सीपीसी कमी असतो, जसे की मनोरंजन किंवा बागकाम.

तुमच्या बिझनेसचे मार्केटिंग कुठे करताय, त्यानुसार सीपीसी दर बदलतो. गुगल अडसेन्सवरून तुम्हाला मिळणाऱ्या जाहिरातींमुळे तुमच्या साइटचा Revenue वाढवता येतो.

त्यामुळे, ज्या विषयांमध्ये आणि देशांमध्ये जास्त सीपीसी आहे, त्यानुसार कीवर्ड्स निवडणे फायदेशीर ठरते. पण लक्षात ठेवा, की प्रत्येकवेळी दर्शविलेला सीपीसी दर मिळेलच असे नाही.

तुम्ही अधिक कमाईसाठी ज्या कंपन्या जास्त जाहिरात करायला तयार आहेत, त्यांच्या साठी Affiliate Marketer म्हणून काम करणे फायदेशीर ठरू शकते.

6. SERP Features

गुगलच्या सर्च इंजिन रिझल्ट पेजवर पारंपरिक ऑर्गॅनिक सर्च रिझल्ट्सबरोबरच इतर काही रिझल्ट्सदेखील असतात, ज्यांना SERP वैशिष्ट्ये म्हणतात.

यामध्ये विविध प्रकारचे रिजल्ट्स समाविष्ट आहेत, जसे:

  • फिचर्ड स्निपेट (Featured Snippet): हे गुगलच्या टॉप स्थानी दर्शवले जाणारे थोडक्यात उत्तर असते.
  • रिव्ह्यूज (Reviews): प्रॉडक्ट किंवा सर्विसेसच्या Reviews ची माहिती.
  • साईट लिंक्स (Site Links): मुख्य पानाच्या खालील अतिरिक्त लिंक्स.
  • इमेज पॅक्स (Image Packs): संबंधित इमेज संच.
  • लोकल पॅक (Local Pack): स्थानिक व्यवसायांची माहिती.
  • कॅरोसेल (Carousel): विविध प्रकारच्या कंटेनचे स्लाइड शो.
  • व्हिडिओ कॅरोसेल (Video Carousel): संबंधित व्हिडिओंचा संग्रह.
  • पीपल ऑल्सो आस्क (People Also Ask): इतर लोकांनी विचारलेले प्रश्न.
  • एफएक्यू (FAQ): वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
  • नॉलेज पॅनेल (Knowledge Panel): विशेष माहितीचा पॅनेल.
  • शॉपिंग ॲड्स (Shopping Ads): प्रॉडक्ट दर्शवणाऱ्या जाहिराती.

जर तुम्ही कोणत्या कीवर्डसाठी SERP वैशिष्ट्यांचा अभ्यास केला, तर तुम्हाला समजेल की तुमच्या एसईओ कॅम्पेन त्या कीवर्डचा वापर करायचा की नाही. तसेच, तुम्हाला हे देखील कळेल की पारंपरिक ऑर्गॅनिक सर्च रिझल्ट्समध्ये टॉप रँकिंग मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल, आणि कोणत्या SERP वैशिष्ट्यांसाठी तुमची वेबसाईट रँक करणे फायदेशीर असेल.

अशा प्रकारे, SERP वैशिष्ट्यांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या कीवर्ड रिसर्चला अधिक प्रभावी बनवू शकता, ज्यामुळे तुमच्या ब्लॉगची गुगलवर रँकिंग वाढेल!

How to Keyword Research For Marathi Blog | मराठी ब्लॉगसाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे?

आपल्या वेबसाईटवर कमाईसाठी आपण कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर करणार आहात, जसे की जाहिराती, अफिलिएट मार्केटिंग, वस्तू व सेवांची विक्री, प्रायोजकता इत्यादी, त्यानुसार योग्य कीवर्ड निवडणे आवश्यक आहे.

1. आपला विषय निश्चित करणे

कीवर्ड रिसर्च करण्यापूर्वी, तुमचा ब्लॉग कोणत्या विषयावर असणार आहे ते ठरवा. उदाहरणार्थ, क्रीडा, प्रवास, अन्नपदार्थ, राजकारण, शिक्षण, मनोरंजन, तंत्रज्ञान इत्यादी.

2. सीड कीवर्ड्स शोधणे

विषय ठरल्यावर, त्या विषयावर लोकप्रिय आणि वारंवार वापरले जाणारे शब्द शोधा. हे सीड कीवर्ड्स साधारणतः कमी लांबीचे आणि जास्त प्रतिमाह Searches असणारे असतात. तुमच्या विषयाबद्दल गूगल ट्रेंड्स, ट्विटर ट्रेंड्स, आणि लोकप्रिय सोशल मीडियाचा वापर करून चांगले सीड कीवर्ड्स शोधा.

3. बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवणे

आपल्या ब्लॉगच्या कमाईच्या स्टॅटेजी नुसार कीवर्ड्स निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्ही जाहिरातींवर आधारित कमाई करत असाल, तर जास्त प्रतिमाह सर्चेस आणि सीपीसी असलेले कीवर्ड्स उत्तम असतील. अफिलिएट मार्केटिंगसाठी व्यावसायिक हेतू असलेले, कमी ते मध्यम स्पर्धा असलेले कीवर्ड्स अधिक फायदेशीर ठरतात.

4. सीड कीवर्ड संबंधित ब्रॉड कीवर्ड्स शोधणे

आता तुमच्या सीड कीवर्डसंबंधित ब्रॉड कीवर्ड्स शोधा. उदाहरणार्थ, तुमचा सीड कीवर्ड ‘फूड’ असल्यास, ‘स्वयंपाकघरातील उपकरणे’ किंवा ‘रेसिपी’ सारखे ब्रॉड कीवर्ड शोधा.

5. लॉंग टेल कीवर्ड्स शोधणे

ब्रॉड कीवर्ड्स निश्चित झाल्यावर, मिड-टेल आणि लॉंग टेल कीवर्ड्स शोधा. लॉंग टेल कीवर्ड्समध्ये स्पर्धा कमी असते, त्यामुळे हे कीवर्ड्स तुमच्या ब्लॉगसाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, ‘स्मार्टफोन’ हा शॉर्ट-टेल कीवर्ड असल्यास, ‘बेस्ट स्मार्टफोन ५०००० मध्ये’ हा एक उत्तम लॉंग-टेल कीवर्ड होऊ शकतो.

आता कीवर्ड रिसर्च टूल्सचा वापर करून या लॉंग टेल कीवर्ड्सची यादी तयार करा. यामुळे तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी योग्य कीवर्ड्स मिळतील आणि तुमच्या एसईओ स्ट्रॅटेजी मध्ये चांगली रँकिंग मिळवता येईल.

6. महत्त्वाचे कीवर्ड मेट्रिक्स चेक करणे 

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करताना, तुमच्या निवडलेल्या कीवर्ड्सची प्रतिमाह शोधसंख्या, स्पर्धा, सीपीसी (किंमत प्रति क्लिक) इत्यादी मेट्रिक्स चेक करने खूप महत्त्वाचे आहे. हे तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजी नुसार योग्य कीवर्ड निवडण्यात मदत करेल.

यासाठी तुम्ही विविध फ्री किंवा प्रीमियम कीवर्ड रिसर्च टूल्स वापरू शकता, जसे की Google Keyword Planner, Keyword Tool, SemRush, and Aherfs.

7. SEO स्पर्धक वेबसाईटचे कीवर्ड ॲनालिसिस

आपल्या विषयाला सुसंगत आणि कमी स्पर्धा असणारे कीवर्ड्स मिळवणे खूप फायदेशीर ठरते. यासाठी, तुम्ही तुमच्या स्पर्धक वेबसाईटचे ऑरगॅनिक कीवर्ड ॲनालिसिस करू शकता. SemRush किंवा AChRfs सारख्या टूल्सचा वापर करून, तुम्ही स्पर्धकाचे डोमेन सर्च करून त्यांच्या रँकिंग केलेल्या कीवर्ड्स शोधू शकता.

यामुळे तुम्हाला त्यांच्या यशस्वी कीवर्ड्सच्या संदर्भात विचार करता येईल आणि तुम्ही त्यांना तुमच्या SEO स्ट्रॅटेजी मध्ये समाविष्ट करू शकता.

सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे वर्गीकरण

तुम्ही शोधलेल्या कीवर्ड्सचे सर्च इंटेंटनुसार वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. उदा.:

  • इन्फर्मेशनल कीवर्ड: “पिझ्झा कसा बनवावा”
  • नेव्हिगेशनल कीवर्ड: “रोटी मेकर”
  • कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड: “प्रेस्टिज वि. बजाज सँडविच मेकर”
  • ट्रान्झॅक्शनल कीवर्ड: “रोटी मेकर किंमत”

सर्च इंटेंटनुसार योग्य कीवर्ड्स निवडल्यास तुम्हाला अधिक ट्रॅफिक मिळेल.

8. मॅन्युअल रिसर्च

कीवर्ड रिसर्च टूल्सवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. मॅन्युअल रिसर्च करून तुम्ही खालील गोष्टी चेक करू शकता:

  • तुमच्या कीवर्ड्ससाठी एकूण सर्च रिझल्ट्सची संख्या.
  • सर्च ऑपरेटर्सचा वापर करून किती रिझल्ट्स मिळतात.
  • ऑटोकंप्लिट आणि रिलेटेड कीवर्ड्स.
  • SERP वैशिष्ट्ये जसे इमेज पॅक आणि व्हिडिओ पॅक.
  • स्पर्धक वेबसाईटची ऑथॉरिटी आणि क्वालिटी.
  • नवीन/अनोळखी कीवर्ड्स
  • जास्त प्रतिमाह शोधसंख्या असलेल्या कीवर्ड्सची निवड करणे चांगले असले तरी नवीन कीवर्ड्स देखील महत्त्वाचे आहेत. क्वोरा, सोशल  मीडिया, आणि ट्रेंडींग सर्चेसच्या माध्यमातून नवीन कीवर्ड्स शोधा.

9. सर्च कन्सोल

आपले कीवर्ड्स गुगल सर्च कन्सोलमध्ये देखील पाहता येतात. कमी स्पर्धा असणाऱ्या कीवर्ड्सवर काम करत असल्यास, तुम्ही काही कालावधीनंतर त्यांना रँक होते पाहू शकता. तसेच, तुमच्या वेबसाईट वर रँक झालेल्या इतर कीवर्ड्सची यादी चेक करून त्यांना टार्गेट करणे उपयुक्त ठरते.

याप्रकारे योग्य कीवर्ड रिसर्च करून तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी क्वालिटी कन्टेन्ट तयार करू शकता, ज्यामुळे गुगलमध्ये चांगली रँकिंग देखील मिळवता येईल.

जर तुम्हाला खरोखर How to Keyword Research For Marathi Blog आजची माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर कृपया मला कमेंट करून नक्की सांगा. जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच प्रकारची महत्वपूर्ण ब्लॉगिंग संबंधित माहिती आणत राहीन. धन्यवाद. 

अधिक वाचा: Best Marathi Blog Name Ideas 2024 | तुमच्या ब्लॉगसाठी योग्य नाव निवडण्याच्या 10 सोप्या टिप्स

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment