What is Keyword in Marathi: जेव्हा आपण गुगल, बिंग किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनवर काहीतरी शोधण्यासाठी एखादा शब्द किंवा शब्दसमूह टाइप करतो किंवा व्हॉइस सर्चसाठी बोलतो, त्याला सर्च क्वेरी म्हणतात.
What is Keyword in Marathi | कीवर्ड म्हणजे काय?
हेच शब्द किंवा शब्दसमूह आपल्या वेबसाइटवरील कन्टेन्ट मध्ये वापरले जातात, आणि यांना SEO भाषेत कीवर्ड्स म्हणतात. कीवर्ड म्हणजे एक शब्द, शब्दसमूह, वाक्य किंवा कधी कधी एक पूर्ण प्रश्न असू शकतो. जरी त्यात अनेक शब्द असले तरी त्याला कीफ्रेज न म्हणता कीवर्डच म्हटले जाते.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) मध्ये कीवर्ड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर आपली वेबसाइट किंवा ब्लॉग सर्च इंजिनवर चांगली रँक करायची असेल, जास्तीत जास्त ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवायचा असेल आणि ऑनलाईन विक्री वाढवायची असेल, तर योग्य कीवर्ड्स निवडून त्यांचा आपल्या कन्टेन्ट मध्ये योग्य वापर करणे आवश्यक आहे.
कुठल्याही वेबसाइटला यशस्वी करायचे असेल तर कीवर्ड्स नीट समजून घेऊन त्यांचा उपयोग करणे खूप महत्वाचे असते.
कीवर्ड स्टफिंग म्हणजे काय? (What is Keyword Stuffing in Marathi)
कीवर्ड स्टफिंग म्हणजे आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगची सर्च इंजिन रँकिंग वाढवण्यासाठी अनावश्यक शब्द (keywords) किंवा संख्या (numbers) वारंवार आणि गरज नसताना वापरणे. हा एक प्रकारचा चुकीचा मार्ग आहे ज्यामुळे रँकिंगवर तात्पुरता फायदा होऊ शकतो, पण दीर्घकाळासाठी तो धोकेदायक असतो.
कीवर्ड स्टफिंगचे काही सामान्य प्रकार
- कीवर्ड्सचा विनाकारण पुनरावृत्तीने वापर – एकाच कीवर्डचा कन्टेन्ट मध्ये पुन्हा पुन्हा उपयोग करणे.
- संदर्भ नसलेले कीवर्ड्स वापरणे – कंटेण्टशी अजिबात संबंध नसलेले कीवर्ड्स घालणे.
- सांख्यिक माहितीचा उपयोग – अनावश्यक क्रमांक किंवा यादी, जसे की फोन नंबर किंवा परीक्षा क्रमांक, विनाकारण समाविष्ट करणे.
- शहर किंवा राज्यांची यादी – एखाद्या ठिकाणासाठी रँकिंग वाढवण्यासाठी त्या ठिकाणांची यादी वारंवार वापरणे.
कीवर्ड स्टफिंगचे परिणाम
- वाचकांना आपला कन्टेन्ट बोरिंग वाटू शकतो, ज्यामुळे वाचकांना कंटाळा येऊ शकतो.
- वाचक तुमच्या वेबसाईटवरून दूर जाऊ शकतात किंवा ब्लॉगला अनफॉलो करू शकतात.
- तुमच्या वेबसाईट ची गुगल रँकिंगवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- काहीजण कीवर्ड्स लपवून ठेवण्यासाठी फॉन्ट आणि पार्श्वभूमीचा एकसारखा रंग वापरतात किंवा मेटा टॅग्ज आणि इमेज alt टेक्स्ट मध्ये जास्त कीवर्ड्स टाकतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.
टिप्स : कीवर्ड डेन्सिटी साधारणतः ०.५% ते २% ठेवावी, म्हणजे कीवर्ड स्टफिंग होणार नाही
आणि तुमची वेबसाइट सुरक्षित राहील.
कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? (What is Keyword Density in Marathi)
कीवर्ड डेन्सिटी म्हणजे एखादा शब्द किंवा शब्दसमूह एकूण कन्टेन्ट मध्ये किती वेळा वापरला गेला याचे प्रमाण. याचे मोजमाप टक्केवारीत केले जाते.
कीवर्ड डेन्सिटीचे सूत्र: कीवर्ड डेन्सिटी = (कीवर्डमधील शब्दसंख्या x कीवर्डची वारंवारता) / एकूण शब्दसंख्या
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) च्या पारंपरिक पद्धतीत, साधारण २% पर्यंत कीवर्ड डेन्सिटी योग्य मानली जाते.
आधुनिक काळात, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) वर आधारित तंत्रज्ञान जसे की नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP) वापरून सर्च इंजिन्स आता केवळ कीवर्ड डेन्सिटीवर अवलंबून राहत नाहीत. याऐवजी, सर्च इंटेंट म्हणजेच युजरचा शोध घेण्याचा हेतू अधिक महत्त्वाचा ठरतो.
त्यामुळे, कीवर्ड डेन्सिटी योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे, परंतु त्यासोबतच तुमचा कन्टेन्ट हा माहितीपूर्ण, उच्च दर्जाचा, युजरला उपयुक्त आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे युजरच्या हेतूची पूर्तता करणारा असावा.
कीवर्ड्सचे प्रकार कोणते? (Types of Keywords in Marathi)
कीवर्ड्स म्हणजे आपली वेबसाईट किंवा ब्लॉग सर्च इंजिनवर योग्य प्रकारे रँक करण्यासाठी वापरलेले महत्त्वाचे शब्द किंवा शब्दसमूह. कीवर्ड्सच्या लांबी, मार्केटिंग प्रक्रियेतील भूमिकेनुसार आणि ऑन-पेज ऑप्टिमायझेशनमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात.
योग्य प्रकारचे कीवर्ड्स वापरल्यामुळे आपल्या कंटेन्टची गुणवत्ता वाढते, तसेच ऑरगॅनिक ट्रॅफिक, लीड्स, आणि विक्री यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
लांबीनुसार कीवर्ड्सचे प्रकार | Types of Keywords By Length
शॉर्ट-टेल कीवर्ड्स (Short-Tail Keywords)
हे एक ते दोन शब्दांचे असतात आणि खूप जास्त शोधले जातात. यामुळे शॉर्ट-टेल कीवर्ड्स वापरल्यास स्पर्धा जास्त असते, त्यामुळे नवीन वेबसाइट्सने यासाठी सुरुवातीला टाळावे.
उदा. smartphone, running shoes.
मिड-टेल कीवर्ड्स (Mid-Tail Keywords)
यामध्ये दोन ते तीन शब्द असतात, जे अधिक माहिती देतात आणि स्पर्धा शॉर्ट-टेल कीवर्ड्सपेक्षा कमी असते. मिड-टेल कीवर्ड्स वापरल्यास योग्य ट्रॅफिक आणि कमी स्पर्धेत चांगला रिझल्ट मिळू शकतो.
उदा. smartphone under 10000, puma running shoes.
लॉंग-टेल कीवर्ड्स (Long-Tail Keywords)
हे चार किंवा अधिक शब्दांचे असतात, ज्यामुळे युजरचा हेतूचा अचूक अंदाज बांधता येतो. लॉंग-टेल कीवर्ड्स वापरल्यास कमी स्पर्धा असते आणि कन्व्हर्जन रेट जास्त असतो.
उदा. best smartphone under 10000 rupees, puma running shoes for women.
मार्केटिंग प्रक्रियेनुसार कीवर्ड्सचे प्रकार
इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स (Informational Keywords)
यांचा वापर करुन लोक एखाद्या गोष्टीबद्दल माहिती शोधतात.
उदा. how to choose running shoes, what is the best smartphone.
ट्रॅन्झॅक्शनल कीवर्ड्स (Transactional Keywords)
हे खरेदीसाठी वापरले जातात. युजरचा हेतू खरेदी किंवा सेवा मिळवण्याचा असतो.
उदा. buy running shoes online, best deals on smartphones.
मार्केटिंग प्रक्रियेतील भूमिकेनुसार कीवर्ड्सचे प्रकार
बाजार श्रेणी कीवर्ड्स (Market Segmentation Keywords)
हे कीवर्ड्स प्रोडक्टच्या प्रकाराशी किंवा बाजार श्रेणीशी संबंधित असतात. युजर प्रोडक्ट किंवा सर्विस बद्दल सामान्य माहिती मिळवण्यासाठी याचा वापर करतात.
उदा. office chair, gaming chair.
ग्राहक श्रेणी कीवर्ड्स (Customer Segmentation Keywords)
हे कीवर्ड्स ग्राहकांच्या वय, लिंग, व्यवसाय, उत्पन्न, खरेदीच्या सवयी यांवर आधारित असतात. योग्य ग्राहक श्रेणीला टार्गेट करण्यासाठी वापरले जातात.
उदा. Blue t-shirts for Boy, Yellow t-shirts for Girl.
उत्पादन कीवर्ड्स (Product Keywords)
हे कीवर्ड्स विशिष्ट ब्रँड किंवा प्रोडक्टशी संबंधित असतात. ब्रँड अवेअरनेस किंवा प्रॉडक्ट पेजसाठी महत्त्वाचे असतात.
उदा. iPhone 16, McChicken burger.
प्रतिस्पर्धी कीवर्ड्स (Competitors Keywords)
हे कीवर्ड्स आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी संबंधित असतात. त्यांचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांच्या प्रोडक्टची आणि सर्व्हिसशी माहिती मिळवून आपली स्ट्रॅटेजी तयार केली जाते.
उदा. Redmi vs Realme smartphones.
भू-लक्ष्यित कीवर्ड्स (Geo Targeted Keywords)
हे कीवर्ड्स भौगोलिक स्थानी संबंधित असतात. स्थानिक व्यवसायांसाठी आणि लोकल SEO साठी उपयुक्त असतात.
उदा. Coffee Shop near me, Priyanka cafe in Jalgaon.
सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे प्रकार
इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स (Informational Keywords)
ज्या कीवर्ड्सचा वापर करून व्यक्ती माहिती शोधतात, त्यांना इन्फॉर्मेशनल कीवर्ड्स म्हणतात.
उदा. who is the home minister of India, coronavirus symptoms.
नेव्हिगेशनल कीवर्ड्स (Navigational Keywords)
हे कीवर्ड्स विशिष्ट वेबसाईट किंवा ब्रँड शोधण्यासाठी वापरले जातात.
उदा. Instagram, PizzaHut, Amazon.
कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स (Commercial Investigation Keywords)
या कीवर्ड्सचा वापर एखादी वस्तू विकत घेण्यापूर्वी तुलना किंवा आढावा घेण्यासाठी केला जातो.
उदा. Redmi vs OnePlus, best fitness band in India.
ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स (Transactional Keywords)
यामध्ये खरेदीसाठी वापरले जाणारे कीवर्ड्स असतात, जसे की विक्री, सूट, कुपन यांचे वापर.
उदा. buy Apple Watch, cheap air fryer on Amazon.
ऑन-पेज ऑप्टिमायझेशननुसार कीवर्ड्सचे प्रकार
प्राथमिक कीवर्ड (Primary Keyword)
प्राथमिक कीवर्ड हा आर्टिकल चा मुख्य शब्द असतो. हा कीवर्ड लेखाच्या टाईटल , URL (परमालिंक), मेटा डिस्क्रिप्शन, सब हेडिंग, आणि कन्टेन्ट मध्ये प्रमुख ठिकाणी वापरला जातो.
साधारणपणे, प्राथमिक कीवर्डची घनता (कीवर्ड डेन्सिटी) 0.5% ते 2% असावी.
उदा. “Online shopping”, “Buying a mobile phone”.
दुय्यम कीवर्ड्स (Secondary Keywords)
हे प्राथमिक कीवर्डशी संबंधित कीवर्ड्स असतात. एका लेखात एकाहून अधिक दुय्यम कीवर्ड्स वापरले जाऊ शकतात.
दुय्यम कीवर्ड्सचा वापर कंटेण्टला विविधता देतो आणि युजरला वेगवेगळी माहिती मिळवण्यास मदत करतो.
उदा. “Best Mobile Phone”, “Online Shopping Offers”.
एलएसआई कीवर्ड्स (LSI Keywords)
LSI कीवर्ड्स म्हणजे संबंधित शब्द किंवा संदर्भ साधणारे शब्द. गुगल या कीवर्ड्सना विचारात घेतो की नाही, हे जरी निश्चित नसले तरी LSI कीवर्ड्सचा वापर लेखाला अधिक अर्थपूर्ण आणि सुसंगत बनवतो.
उदा. “Apple” या शब्दासाठी तंत्रज्ञानाशी संबंधित iPhone, iPad, MacBook किंवा फळांसाठी fruit, red, juice असे शब्द.
सारांश
या लेखात आपण कीवर्ड म्हणजे काय, प्राथमिक, दुय्यम आणि LSI कीवर्ड्स कसे वापरायचे याबद्दल माहिती घेतली. योग्य पद्धतीने कीवर्ड्स वापरल्यास लेखाचा ऑन-पेज SEO देखील सुधारतो आणि अधिक ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला हि माहिती खरोखर उपयुक्त वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.
अधिक वाचा: How to Keyword Research For Marathi Blog | मराठी ब्लॉगसाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे?