जर तुम्ही खरोखर ही पोस्ट 1 जानेवारीला वाचत असाल तर तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं आवश्यक आहे. कारण आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला 7 Best Tips for Blogging Success in 2025 विषयी माहिती सांगणार आहे. कदाचित तुम्ही ब्लॉगिंग सुरू करण्याचा प्रयन्त करत असाल किंवा तुम्ही ब्लॉगिंग सुरु केली असेल, आणि जर तसे असेल तर ही खूप आनंदाची बातमी आहे.
2024 मध्ये मी एक Full Time ब्लॉग रायटर म्हणून 4 वर्षे पूर्ण केली. मी एप्रिल 2020 मध्ये ब्लॉगिंग सुरू केली होती, पण खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ती मुळात ब्लॉगिंगची सुरुवात नव्हती.
महत्वाचं म्हणजे या 4 वर्षांमध्ये मी कधीच ब्रेक घेतला नाही, पण ब्लॉगिंग नेहमीच माझ्यासाठी माझ्या करिअरसाठी एक मोटिव्हेशनच्या रूपात कामात आली.
तर चला, एक मनोरंजक असा डेटा आपण जाणून घेऊया. जो तुम्ही बघून शॉक होणार हे नक्की.
2024 पर्यंत, इंटरनेटवर अंदाजे 600 मिलियन ब्लॉग्स आहेत. यासोबतच दररोज 7.5 मिलियन ब्लॉग पोस्ट्स प्रकाशित होतात.
पण, एक नवीन ब्लॉग तयार करून फक्त सुरुवातीला जोशात काम करणे म्हणजे सर्वात पहिली आणि मोठी चुकी तुम्ही तुमच्या ब्लॉगिंग प्रवासात करत आहेत. आता तर कंटेंटच्या क्वालिटीचा दर्जा खूपच जास्त वाढला आहे आणि इतके चांगले ब्लॉग्स आहेत की त्यांच्याशी स्पर्धा करणे खूप कठीण होईल. तुम्हाला स्पर्धा आवडत असेल, तर ते ठीक आहे. पण, तुम्हाला एक अर्थपूर्ण ब्लॉग तयार करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही बाहेरच्या जगाशी स्पर्धा करू शकाल.
अर्थपूर्ण ब्लॉग म्हणजे काय?
एक अर्थपूर्ण ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह, प्रामाणिक आणि वाचकांना जोडून ठेवणारं लेखन करावं लागतं.
आजकाल अनेक Blog फक्त कंटेंट तयार करण्याच्या फॅक्टरीसारखे झाले आहेत. हो, असे ब्लॉग काही प्रमाणात माहिती देतात, पण त्यांच्याकडे वाचकांसाठी फारसा उपयुक्त असा कन्टेन्ट उपलब्ध नसतो.
जर तुम्ही फक्त ब्लॉग तयार करण्यासाठी किंवा ऐकले आहे म्हणून ब्लॉगिंगला सुरुवात करत असाल की यातून पैसे मिळवता येतात, तर एक गोष्ट Clear सांगते – हा विचार आता फारसा यशस्वी ठरणार नाही.
असं का? तर चला, थोडं मागे जाऊया.
ब्लॉगिंगमधून पैसे मिळवणं म्हणजे जुन्या काळातील गोष्ट वाटते का?
होय, कदाचित 10-12 वर्षांपूर्वी ब्लॉगिंगमधून पैसे कमावणं खूप लोकप्रिय होतं. पण आता तसं अजिबात राहिलेलं नाही.
का नाही?
कारण पैसे कमावण्यासाठी ब्लॉगिंगपेक्षा अनेक चांगले मार्ग आणि प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत.
आजकाल अनेक लोक ब्लॉगिंगला फक्त पैसे मिळवण्यासाठी सुरुवात करतात, पण हे यशस्वी होत नाही. कारण सुरुवातीला त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात, आणि त्या पूर्ण होणं कठीण होतं.
अर्थपूर्ण ब्लॉग तयार करायचा असेल, तर वेळ, स्मार्ट काम आणि प्रचंड संयम लागतं.
आता काही सोप्या टिप्स बघूया, ज्या तुमचा ब्लॉग योग्य प्रकारे तयार करण्यात मदत करतील.
1. प्रामाणिक रहा: तुमचं लिहिलेलं खरं असलं पाहिजे. वाचकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायला आवडतं.
2. क्रिएटिव्ह बना: इतरांच्या ब्लॉगची कॉपी करू नका. स्वतःचे विचार आणि कल्पना मांडण्याचा प्रयत्न करा.
3. क्वालिटी महत्त्वाची आहे: कंटेंटची क्वालिटी High ठेवा. वाचकांना तुमच्या ब्लॉगवर समाधान मिळालं पाहिजे.
2025 मध्ये अर्थपूर्ण ब्लॉग तयार कसा करायचा?
1. तुम्हाला आवडणारा विषय निवडा
ही गोष्ट तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल, पण तरीही अनेक नवीन ब्लॉगर्स असा ब्लॉग सुरू करतात ज्याविषयी त्यांना फारसं काही माहित नसतं. हो, आजही असं होतं.
आजकाल मला बऱ्याच लोकांकडून मेसेजेस येतात, जिथे ते विचारतात की ब्लॉगिंगसाठी Best 10 Profitable Niches in Marathi कोणता आहे. पण इथे मुद्दा फक्त निचचा नाहीये, तुमची आवड महत्त्वाची आहे.
कोणत्याही अनोळखी विषयावर ब्लॉग सुरू करण्यात काहीही चुकीचं नाही. काही जण तर म्हणतात की नफा मिळवता येईल असा निच शोधणं गरजेचं आहे. पण माझ्या अनुभवानुसार, तुमचं ज्ञान कमी आहे किंवा त्या विषयात रस नाही, तर त्याबद्दल सातत्याने लिहिणं खूप कठीण होतं.
गेल्या 4 वर्षांत मी अशा अनेक निचवर ब्लॉग्स तयार केलेत, ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. काही ब्लॉग्स यशस्वी झाले, तर काहींचा मी कंटाळा आला म्हणून त्यांना सोडून दिलं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कदाचित बरेच लोक माझ्या या विचाराशी असहमत असतील पण ही Reality आहे.
ज्या ब्लॉग्सला मी सोडून दिले, त्याचं कारण होतं – तो निच फायदेशीर असला तरी मला त्यात इंटरेस्ट नव्हता.
तुमची आवड हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
मी वारंवार यावर जोर देतेय कारण आवड ही ब्लॉगिंगसाठी नेहमीच महत्त्वाची राहते.
तुम्हाला एखाद्या गोष्टीवर प्रेम असेल तरच तुम्ही त्यात यश मिळवू शकता. तुमचा ब्लॉगिंग निच म्हणजे तीच गोष्ट. तुम्हाला तो विषय खरोखरच आवडायला हवा.
का?
कारण तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या विषयावर लिहिताना तुमचा कन्टेन्ट फक्त तुमच्यासाठीच नाही तर वाचकांसाठीही अर्थपूर्ण ठरते.
2. तुमचा वाचक वर्ग निश्चित करा
एकदा तुम्ही योग्य विषय निवडला, की आता विचार करा – तुमचं लेखन कोणासाठी आहे?
हे लगेच कळणार नाही, वेळ लागतो. एकेका पोस्टच्या माध्यमातून तुमच्या खऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.
उदाहरणार्थ –
उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख लिहा.
वाचकांची समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक कंटेंट तयार करा.
वाचकांचा प्रतिसाद लक्षात घ्या. (कॉमेंट्स वाचा, लोकप्रिय पोस्ट्स पाहा, सोशल मीडियावर शेअर्स आणि मेंशन चेक करा)
हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा वापरा.
हळूहळू तुम्हाला वाचकांच्या आवडी-निवडी समजायला लागतील. कुठल्या प्रकारचं लेखन त्यांना आवडतं आणि उपयोगी वाटतं यावरून तुम्ही तुमचं वाचक वर्ग अधिक चांगल्या प्रकारे निश्चित करू शकता.
3. तुमचं युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन (UVP) सुधारित करा
ब्लॉगिंगचं मुख्य उद्दिष्ट नेहमीच वाचकांना काहीतरी मूल्यवान देणं असतं. प्रत्येक पोस्टमधून तुमच्या वाचकांना काहीतरी उपयुक्त मिळालं पाहिजे.
पण याचा अर्थ सगळं फ्री मध्ये द्यायचं असं नाही. कधी कधी तुम्ही प्रीमियम कंटेंट तयार करू शकता, जसं की ई-बुक, ऑनलाइन कोर्स इत्यादी. हे तुमचं युनिक व्हॅल्यू प्रपोजिशन होऊ शकतं. जसे कि, माझं “A To Z Blogging Ebook“
तुम्हाला तुमच्या वाचकांच्या गरजा, आवडीनिवडी, आणि समस्या जितक्या चांगल्या प्रकारे समजतील, तितकं तुमचं UVP अधिक प्रभावी होईल. त्यामुळे तुमच्या ब्लॉगला वाचकांमध्ये विशेष स्थान मिळेल.
4. तुमची कंटेंट स्ट्रॅटेजी तयार करा
काही चांगल्या ब्लॉग पोस्ट्स लिहिल्या असतील, त्यावर कॉमेंट्स आणि शेअर्सही मिळाले असतील. आता वेळ आहे, तुमच्या कंटेंटची एक प्रभावी योजना तयार करण्याची.
कशी कराल?
कॉमेंट्स आणि सोशल मीडियावरच्या चर्चांमधून लोकांच्या प्रश्न आणि समस्यांचा अभ्यास करा.
त्यावरून भविष्यातील लेखांच्या विषयांची यादी तयार करा.
पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी किती पोस्ट लिहायच्या आहेत, हे ठरवा.
विषय आधीच ठरवल्यास कंटेंट आयडीयाज संपण्याचा प्रश्नच येत नाही.
महत्व का?
एकसंध आणि उपयुक्त कन्टेन्टचा नियोजन हे तुमचा ब्लॉग अर्थपूर्ण बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
तुमचं लेखन वाचकांच्या मनाला भिडणारं, माहितीपूर्ण आणि संस्मरणीय असायला हवं. साधं-सुधं किंवा कंटाळवाणं लेखन लक्षात राहत नाही.
5. वाचकांसोबत संवाद साधण्यासाठी योजना तयार करा
तुमच्या पोस्ट्सवर कॉमेंट्स आणि सोशल शेअर्स मिळायला लागले असतील, याचा अर्थ तुमचा ब्लॉग चांगल्या मार्गावर आहे.
पण इथे थांबू नका. वाचकांसोबत संवाद साधण्यासाठी ठोस योजना तयार करा.
उदाहरणार्थ –
कॉमेंट्सला कधी उत्तर द्यायचं?
सोशल मीडियावरच्या शेअर्सना कधी Acknowledgment द्यायचं?
महत्त्वाची गोष्ट
तुमच्या वाचकांना कधीही दुर्लक्षित करू नका. प्रत्येक कॉमेंट, प्रत्येक शेअर, प्रत्येक मेंशनला उत्तर द्या. सुरुवातीला तरी हे नक्की करा.
6. तुमची यशस्वी स्ट्रॅटेजी ठरवा
तुमच्याच मनात प्रश्न आला असेल – यशस्वी स्ट्रॅटेजी म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं तर, हे उद्दिष्ट ठरवण्याचं एक पाऊल आहे.
यासाठी काय कराल?
तुमचं लिखाण, सोशल मीडिया, गेस्ट ब्लॉगिंग, ब्लॉगवरील प्रतिक्रिया, आणि ट्रॅफिक वाढवण्याची योजना तयार करा.
तुमच्या योजनेत शिस्त आणा. शिस्तीशिवाय तुम्ही सातत्य टिकवू शकत नाही.
सातत्याशिवाय ब्लॉग यशस्वी होणं कठीण आहे.
7. ओरिजनल रहा
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
तुमचा ब्लॉग स्वतःच्या शैलीत लिहा.
इतरांचे अनुकरण करणं टाळा.
हे का महत्त्वाचं आहे?
इतर ब्लॉगर्सच्या Success Stories शिकायला हरकत नाही, पण तुमची स्वतःची स्टोरी आणि शैली असावी.
तुमच्या वाचकांसाठी तुम्हीच खास आहात.
इतरांच्या शैलीची कॉपी केली तर त्यांच्यासारखं यश मिळेलच असं नाही. लोकांना ओरिजनॅलिटी आवडते.
तुमचं लिखाण अर्थपूर्ण, उपयुक्त, आणि वाचकांना मूल्य देणारं ठेवा. असं केल्यास, तुम्ही गर्दीतही वेगळे दिसाल.
तर हे आहेत 2025 आणि त्यापुढील काळात तुमचा ब्लॉग अर्थपूर्ण बनवण्यासाठी 7 महत्त्वाचे टिप्स मी शेअर करेल.
लक्षात ठेवा:
ब्लॉग तयार करणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही, ही लॉन्ग टर्मची प्रोसेस आहे.
आजच सुरुवात करा! आणि लक्षात ठेवा, तुमचा ब्लॉग नेहमीच तुमच्या वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुमच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा!
अधिक वाचा: How to Create Content Calendar For Your Blog