नमस्कार आपल्या Bloggervinita.com या ब्लॉगवर स्वागत आहे. माझं नाव विनिता माळी पण तुम्ही सर्व मला ब्लॉगर विनिता नावानी ओळखतात. ब्लॉगर विनिता हे आता एक नाव न राहता आपली मराठी ब्लॉगिंग कम्युनिटी तयार झाली आहे. ब्लॉगर विनिता कम्युनिटी मधील प्रत्येक जण हा ऑनलाईन क्षेत्रात काहीतरी नवीन करायचा विचार करत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस हा पुढे गेला आहे आणि अजून पुढे जाण्याचा प्रयन्त करत आहे.
Vinita Mali
Blogger | Content Writer | SEO Specialist
मी एक Blogger आणि Freelancer आहे. मला ब्लॉगिंग क्षेत्रात ३+ वर्षांचा अनुभव आहे. तसेच मी आतापर्यंत संपूर्ण भारतात फ्रीलांसिंग सर्विसेस यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. फ्रीलान्सिंग मध्ये कन्टेन्ट रायटिंग, वेबसाईट डिजाईन, वेबस्टोरी या सर्व्हिसेस आम्ही देतो.
त्यासोबतच तुमच्या सर्वांच्या प्रेमपूर्वक आग्रहास्तव ब्लॉगिंग शिकवण्याचा निर्णय आम्ही घेतला. इतकंच नव्हे तर यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये इंटरनॅशनल Clients सोबत पण काम करण्याची संधी मला मिळाली.
Blogger Vinita चा हा प्रवास महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील छोटयाश्या खेडे गावातून सुरु झालेला तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इथपर्यंत पोहचला. या मागे तुम्हा सर्वांचं खरोखर खूप वाटा आहे. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला, जी साथ तुम्ही मला कायम दिली ते शब्दात व्यक्त करता येणं अशक्य आहे. फार कमी लोकांना अशी साथ आणि जिवाभावाची माणसे मिळतात.
Bloggervinita.com च्या निर्मितीमागील मुख्य उद्दिष्ट काय आहे?
मित्रांनो, प्रत्येक गोष्ट करण्यामागे आपला काहीतरी उद्देश हा असतोच आणि तो असायला पण हवा. जेणेकरून आपल्याला आपला मार्ग हा स्पष्ट असेल. आपण शेवटपर्यंत त्याच जोशाने ते काम मन लावून तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला त्या कामाविषयी असलेली पूर्वकल्पना ही माहिती असते.
माझा वैयक्तिक bloggervinita.com या ब्लॉगला सुरु करण्यामागचं महत्वाचं उद्दिष्ट्य असं कि, जे मी स्वतः माझ्या ब्लॉगिंग प्रवासात अनुभवलंय आहे. मराठी तरुणांना खूप काही गोष्टी या शिकायच्या असतात पण कुठेतरी एक प्रॉपर अशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते.
जरी आज ऑनलाईन क्षेत्राविषयी हवी तितकी जागरूकता झालेली असली तरी बऱ्याच लोकांना एक प्रॉपर अश्या सपोर्ट आणि मेन्टॉरची गरज असते. हल्लीच्या काळात ब्लॉगिंग करून किंवा ऑनलाईन काम करून आपण खूप पैसे हे कमवू शकतो हे आपल्याला इंटरनेटवर बऱ्या पैकी या विषयावर कन्टेन्ट उपलब्ध आहे. मात्र ते पैसे कसे कमवायचे त्यासाठी कोणत्या स्टेप्स या फॉलो कराव्या काय रणनीती या आखाव्या हे एका ठिकाणी उपलब्ध नाही आहे. मी जितका रिसर्च केला त्यानुसार ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती आजपर्यंत आपल्या मराठी भाषेत कुठेच उपलब्ध नाही आहे. जी काही इंटरनेटवर काही ब्लॉगिंग विषयी माहिती उपलब्ध आहे ती हिंदी आणि इंग्लिश मधेच आहे.
bloggervinita.com या ब्लॉग वर तुम्हांला ब्लॉगिंग विषयी संपूर्ण माहिती आपल्या मातृ भाषेत म्हणजेच मराठी मध्ये आता मिळणार आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे कि, जितकं आपण आपल्या मातृ भाषेत मराठी मध्ये एखादी गोष्ट समजून घेतो ती आपण तितक्या चांगल्या पद्धतीत इतर भाषेमध्ये नाही समजू शकत. त्यामुळे आता तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही आहे. या ब्लॉगवर मी अतिशय सोप्या भाषेत माहिती शेअर करण्याचा प्रयन्त हा करणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या संत तुकाराम महाराजांच्या अनुसार “एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ”
Bloggervinita.com विषयी
ब्लॉगर विनिता या ब्लॉगची स्थापना 18 ऑगस्ट 2023 ला करण्यात आली. या ब्लॉग वर मी माझ्या ३ वर्षाचा ब्लॉगिंग अनुभव शेअर करणार आहे. सुरुवातीच्या ब्लॉगर चे Problem लक्षात घेऊन संपूर्ण ब्लॉगिंग संबंधित माहिती मराठी मध्ये शेअर करण्यात येईल.
Blogger Vinita कोण आहे?
मी विनिता माळी गेल्या ३ वर्षांपासून ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत आहे. माझा ब्लॉगिंग प्रवास हा खरोखरच प्रत्येक नवीन ब्लॉगर्स साठी एक प्रेरणादायी आहे. मी माझ्या या ३ वर्षात खूप काही चुका केल्या ज्यातून मी स्वतः खूप काही शिकली. कोणत्याच प्रकारचं ब्लॉगिंग विषयी वातावरण नसतांना मी २०२० मध्ये ब्लॉगिंगला करिअर म्हणून निवडलं.
ब्लॉगिंग सोबतच माझ्या फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस आहेत. लहानपणापासून लिहण्याची आवड असल्यामुळे मला ब्लॉगिंग विषयी YouTube वरून माहिती मिळाली. YouTube वर जरी मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असली तरी एका जागेवर आपल्याला संपूर्ण माहिती नसते.
मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असल्यामुळे नेमकं कोणत्या व्यक्तीला फॉलो करावं हा सर्वसामान्य नवीन ब्लॉगरला प्रश्न पडतो. त्यामुळे नको तिथे मोठ्या प्रमाणात वेळ आणि इंटरनेट खर्च करून योग्य ते माहिती मिळत नाही. शेवटी इतकं करून योग्य ते रिजल्ट्स नाही दिसल्यामुळे मोठ्या प्रमाणात निराशा येते. या सर्व गोष्टी मी स्वतः फेस केल्या आहेत त्यामुळे मी bloggervinita.com या ब्लॉगवर मराठी मध्ये ज्या काही ब्लॉगिंग संबंधित माहिती आहे त्या शेअर केल्या जातील.
माझी A to Z ब्लॉगिंग ईबुक आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना ब्लॉगिंग शिकवण्यासाठी ऑनलाईन सेमिनार आणि सत्रे आयोजित केली आहेत. आतापर्यंत, मी 7००+ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ब्लॉगिंग प्रशिक्षण दिले आहे जे आता या क्षेत्रात यश मिळवत आहेत.
तुम्हाला जे काही ब्लॉगिंग संबंधित माहिती हवी असल्यास तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करू शकतात आणि तुमचे प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद.