Best 10 Ways Protect Your WordPress Blog in Marathi: वर्डप्रेस ब्लॉग वेबसाइटला Hack होण्यापासून कसे वाचवायचे?

मित्रांनो एक ब्लॉग एका ब्लॉगर साठी नेहमी Property स्वरूपात असतो. जे नविन ब्लॉगर असतात त्यांना नेहमी भीति असते की, त्यांचा ब्लॉग किंवा वेबसाइट चुकून तर Hack नाही व्हायला हवी. कारण आपल्या एका चुकीच्या गोष्टीमुळे आपला संपूर्ण ब्लॉग Hack होऊ शकतो. तुम्ही विचार पण नाही करू शकत तो तुमचा एक Blog तुम्हाला लाखों रुपये कमावून देऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ब्लॉगरची जबाबदारी असते कि, आपला ब्लॉग व्यवस्थित पणे Secure करावा.

तुम्हाला WordPress Content Management System विषयी काही सांगण्याची गरज नाही आहे. कारण तुम्हाला पण माहित आहे, कि WordPress जगातील सर्वात जास्त लोकप्रिय CMS आहे. विशेष म्हणजे ज्यांना कोडींग नाही येत त्यांच्यासाठी WordPress एक बेस्ट ऑप्शन आहे. सर्वाधिक लोक Wordpres चा वापर करत असल्यामुळे Hacker नेहमीच वर्डप्रेस वेबसाईटला Hack करण्याचे नवनवीन मार्ग हे शोधत असतात. त्यामुळे प्रत्येक ब्लॉगरला आपल्या WordPress Blog Website ला Hack होण्यापासून कसे वाचवावे, याविषयी सविस्तर माहिती असायला हवी. 

आजच्या लेखात मी तुम्हाला Best 10 Ways Protect your WordPress Blog विषयी सांगणार आहे. कृपया शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा. महत्वाचं म्हणजे या लेखाच्या शेवटी मी तुम्हाला माझे काही वैयक्तिक अनुभव देखील शेअर करणार आहे.

Best 10 Ways Protect Your WordPress Blog

WordPress Blog Website ला Hack होण्यापासून कसे वाचवायचे? याचे 10 बेस्ट मार्ग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. या मार्गांना फॉलो करून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरक्षित करू शकता. जर तुमच्या ब्लॉगवर सर्वात जास्त ट्रॅफिक येत असेल तर तुमच्या साठी देखील आजचा लेख महत्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही देखील शेवट्पर्यंत वाचा. कारण भविष्यात कधीच तुमचा ब्लॉग Hack नाही व्हावा. 

#1.Strong Password चा युज करा 

मित्रांनो एक Strong Password (मजबूत पासवर्ड) तुमच्या ब्लॉगला सर्वांत जास्त सुरक्षित करण्याचा पहिला सरळ आणि सोपा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही तुमचा ब्लॉग किंवा वेबसाइटसाठी Username तयार करतात त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड सेट करण्याचा ऑप्शन असतो.

समजा, तुम्ही चुकून तुमच्या Blog Website चा Password असा ठेवता जो कोणी पण Guess करू शकतो. अशा परिस्तिथीत Hacker आपकी वेबसाइट काही कालावधीत Hack करू शकतो. त्यांच्यासाठी ते अगदी सोपं काम होऊन जात. त्यामुळे शक्य होईल तितकं Strong Password ठेवण्याचा प्रयन्त करा. म्हणजे कोणीच तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइट च्या डैशबोर्डला कधीच ओपन नाही करू शकणार. 

Strong Password युज करण्यासाठी तुम्ही Alphabet आणि Number, Special Character चा वापर करू शकता. 

#2.Blog वेबसाईटचा नेहमी Backup ठेवा

असं अजिबात नाही आहे कि, फक्त Strong Password मुळे वेबसाईट Secure होऊन जाईल. हे खरं आहे कि, Strong Password चा युज केल्यामुळे Website हॅक होण्याचे प्रमाण कमी होऊन जाते. वेबसाईट सुरक्षित ठेवण्यासाठी वेबसाईटचा नेहमी Backup ठेवणे गरजेचा आहे. 

जेव्हा तुम्ही एक ब्लॉग चालू करता तेव्हा तुम्हाला अनेक Problem ला सामोरे जावे लागेल. जसे कधी पण तुमची वेबसाईट Crash होऊ शकते, Data Lost होणे.  

या सर्व Problem चे सोलुशन म्हणजे बऱ्याचशा web होस्टिंग कंपनी Hosting कंपन्या बैकअप वेबसाइट ची सुविधा उपलब्ध करून देतात. जसे Hostinger आपल्या होस्टिंग मध्ये Daily & Weekly Backup ची सुविधा उपलब्ध करून देतात.

#3. सुरक्षित नेटवर्क

सुरक्षित नेटवर्कचा अर्थ असा आहे कि, तुम्ही अशे नेटवर्क युज करा ज्याच्यामुळे तुमची वेबसाईट कोणीही Hack करू शकणार नाही. बऱ्याचदा असं होत कि, तुम्ही Public wifi चा युज करून Blog वर काम करतात. जे कि अतिशय चुकीचे आहे. जर तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीचे इंटरनेटचा युज करत असाल तर समोरचा व्यक्ति तुमची माहिती आरामात चोरू शकतो. त्यामुळे तुम्ही कधी पण तुमच्या किंवा Clients च्या ब्लॉगवर काम करत असाल तेव्हा Public wifi चा युज करणे बंद करा. 

#4.नेहमी Two Factor Authentication ऑन ठेवा 

WordPress Blog Website ला Hack होण्यापासून वाचवण्याचा बेस्ट मार्ग म्हणजे, Two Factor Authentication ऑन ठेवणे. यामुळे तुमच्या ब्लॉगची सुरक्षितता दुप्पट होते. 

Two Factor Authentication आपल्या ब्लॉगला दुपट्ट सेक्युरिटी शेअर करते. याचा फायदा असा कि, जेव्हा पण तुम्ही Username आणि Password Type कराल म्हणजे Login कराल तेव्हा पुन्हा एकदा तुम्हीच आहात हे व्हेरिफाय केले जाईल. Two Factor Authentication मध्ये तुम्हाला Code, Phone Call, One Time Password सेट करायचा असतो.  या एका सेटिंगला युज केल्यामुळे हॅकरला आपली वेबसाईट हॅक करणे अशक्य होऊन जाते. 

महत्वाचं म्हणजे हॅकरला जरी तुमच्या ब्लॉगचा पासवर्ड माहित झाला तरी त्याला Website डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज असेल. 

#5. Login Attempts Limit Set करा 

मित्रांनो WordPress मध्ये Default सेटिंग असते Unlimited Login करण्याची, म्हणजे तुम्ही किती पण वेळेस प्रयन्त करू शकता. या एका गोष्टीचा फायदा हॅकर घेतात. जोपर्यंत तुमची वेबसाइट पूर्णपणे Hack नाही होत, तोपर्यंत तो तुमच्या वेबसाइटला हैक करण्याचा प्रयन्त करतो.

तुम्ही यावर उपाय म्हणून Wp Limit Login या प्लगइन चा युज करू शकता. या प्लगिनचा युज करून तुम्ही तुमच्या वेबसाइट वर लिमिट लावू शकता. Login करण्यासाठी जेव्हा पण हॅकर या प्लगिनचा युज करेल तेव्हा तुमची वेबसाईट ऑटोमेटिक Lockmode मध्ये चालली जाईल. इतकंच नाही तर Hacker चा जो काही User IP Address असेल त्याला हे प्लगिन Block करून देईल. आपल्या वर्डप्रेस ब्लॉग वेबसाइटला Hack होण्यापासून वाचवण्याचा हा पण खूप चांगला ऑप्शन आहे.

#6. काही कालावधी नंतर Password Change करणे

तुम्ही जो काही पासवर्ड सेट केला असेल त्याला नियमितपणे वेळोवेळी Change करत राहा. तुम्ही एकच पासवर्ड ठेवला तर हॅक होण्याचे चान्सेस वाढून जातात. ते कसे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 

समजा तुम्ही तुमचा ब्लॉग दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या लॅपटॉप मध्ये लॉगिन केला किंवा तुम्ही काम करण्यासाठी तुमच्या ब्लॉगचा पासवर्ड समोरील व्यक्तीला शेअर केला तर तो पासवर्ड समोरच्या व्यक्तीच्या लॅपटॉप मध्ये सेव्ह होऊन जातो. यामुळे पण मोठ्या प्रमाणात आपला ब्लॉग हॅक होतो. 

त्यामुळे नियमितपणे Password Change करणे गरजेचे आहे. 

#7 फक्त सुरक्षित थीमचा युज करा 

सर्वात महत्वाचं गोष्ट अशी ज्या कडे नवीन ब्लॉगर Ignore करतात ती म्हणजे Cracked Theme आणि Cracked Plugin चा युज करणे. मित्रांनो, तुमच्या कधीच चुकून पण Cracked Theme आणि Cracked Theme चा युज करू नका. कारण जेव्हा पण तुम्ही या प्लगिन किंवा थीमचा युज कराल तेव्हा तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक यायला सुरुवात होईल.

त्या वेळेस तुमच्या वेबसाइट वर अनेक वायरस येथील. Cracked Theme ला हैकर लोक अशा पद्धतीने डिजाइन करता कि, सुरुवातीच्या काळात समजतच नाही कि कोणी हैक केलं आहे? Cracked Theme चा युज केल्यामुळे तुमची पूर्ण वेबसाइट हैकर जवळ चालली जाते. त्यामुळे तुम्हाला थीम आणि प्लगिन युज करायचेच असेल तर WordPress मधीलच युज करा. 

#8 WordPress ला अधून मधून Update करत रहा 

तुम्हाला एका गोष्टीवर नेहमी लक्ष केंद्रित करायचे आहे कि, आपल्या WordPress ला Updated Versions चाच युज करायचा. कारण वर्डप्रेसच्या अपडेटेड वर्जनला डेवलपर नेहमी Improve करत असतात. ज्यामुळे वर्डप्रेस वेबसाईटला हॅक करणे कठीण होते.

#9 WordPress Security Plugin चा युज करा 

परंतु तुम्ही WordPress च्या जुन्या वर्जनचा युज करत असाल तर त्यात अनेक प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे Hacker त्या वर्डप्रेसला सोप्या पद्धतीने Hack करू शकता. यासाठी तुम्ही नेहमी वर्डप्रेसच्या लेटेस्ट वर्जनचा युज करा आणि नियमितपणे अपडेट करत रहा. 

#10 Secure Website Hosting चा युज करा

जेव्हा पण तुम्ही कोणत्याही वेब होस्टिंग कंपनी मध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा तुम्हाला एका गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करायचं आहे ते म्हणजे वेब होस्टिंगच्या आतील  सेक्युरिटीचे फीचर्स. कारण कोणत्याही ब्लॉगसाठी होस्टिंग हि अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असते.

जर तुमच्या कडे Hosting Secure नाही आहे तर हैकर तुमच्या होस्टिंग किंवा तुमच्या वेबसाइटला हॅक करू शकता. 

त्यामुळे कोणत्याही होस्टिंग प्लॅनला Buy करत असताना एकदा हे फिचर नक्की चेक करून घ्या.

मित्रांनो, मी पण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला पण आपल्या वेबसाईटला कशा पद्धतीने हॅकर्स पासून वाचवायचं किंवा काय काळजी घ्यावी याविषयी अजिबात माहिती नव्हती. परंतु हळूहळू जेव्हा अनुभव येत गेला तेव्हा या सर्व गोष्टी समजल्या. मी पण अनेक चुका केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे ज्या चुका मी माझ्या ब्लॉगिंग प्रवासात केल्या आहेत त्या तुम्ही नको पुन्हा करायला हा एकच प्रयन्त असतो माझा नेहमी. 

एकंदरीत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कृपया कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच हेल्पफुल ब्लॉगिंग संबंधित माहिती मराठीमध्ये मिळवण्यासाठी Bloggervinita ब्लॉगला नक्की फॉलो करा. धन्यवाद. 

अधिक वाचा: Top 7 Best Blogging Tools in Marathi | प्रत्येक ब्लॉगरने युज करावे असे महत्वपूर्ण ब्लॉगिंग टूल्स

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment