Blogging Dead in 2026: “2026 मध्ये Blogging सुरू करा आणि लाखों–करोडों रुपये कमवा” असे Videos सध्या Social Media वर प्रचंड प्रमाणात Viral होत आहेत.
त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून मला सतत Messages आणि Comments येत आहेत “Blogging Dead झाली का?” “2026 मध्ये Blogging करावी का?” “Earning होत असेल तर किती दिवसात होते?”
खरं सांगायचं तर, काही दिवस मी या विषयावर बोलणं टाळत होते. कारण मला हवेत बोलायचं नव्हतं. आज Blogging बद्दल निर्णय घेताना Emotion पेक्षा Data आणि Ground Reality जास्त महत्त्वाची आहे.
Proper Research करून, स्वतःच्या Experience वरून तुमच्यासमोर खरं चित्र मांडायचं होतं. थोडा उशीर झाला, पण आज ते मी Clear शब्दांत मांडतेय.
चला तर मग समजून घेऊया 2026 मध्ये Blogging करणाऱ्या लोकांचं खरं Future काय आहे?
हा Blog Post कोणासाठी आहे?
हा Blog Post कोणालाही Discourage करण्यासाठी नाही. तर तुमचा Time, Money आणि Effort वाया जाऊ नये, यासाठी आहे.
कारण मी स्वतः:
- 2020 पासून Blogging मध्ये आहे
- Multiple Websites तयार केल्या आहेत
- Dollars मध्ये Earning केली आहे
- आणि Google Updates मुळे सगळं हळूहळू Downfall होताना स्वतः अनुभवलं आहे
म्हणून हा लेख Theoretical नाही, तो पूर्णपणे Real Experience वर आधारित आहे.
Blogging चा Golden Phase आणि आजची Reality
2020–2021 हा काळ Blogging साठी खरंच Golden Phase होता.
त्या वेळी:
- Simple Seo ने Websites Rank व्हायच्या
- New Bloggers सुद्धा Traffic मिळवू शकायचे
- Adsense Revenue बर्यापैकी Stable होता
पण आज Scenario पूर्ण बदलले आहे.
आज Google वर:
- Big Brands
- High Domain Authority असलेल्या Websites
- Forums (Quora, Reddit)
हेच जास्त Dominant आहेत.
New किंवा Individual Bloggers साठी आज Organic Space खूपच कमी उरली आहे.
यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे User Intent पूर्णपणे बदलले आहे.
Google Updates आणि Ai: Blogging साठी Silent Killer
Generative Ai आल्यानंतर Blogging Ecosystem पूर्ण बदलून गेला.
आज Google ला:
- प्रचंड प्रमाणात Ai Generated Content Index करावे लागते
- त्यामुळे Indexing Process खूप Slow झाली आहे
- New Websites ला Visibility मिळणं फारच Difficult झालं आहे
आणि समजा एखादी Website Rank झालीच, तरी Google चा Ai Overview User ला Direct Answer देतो.
Result?
- Ctr Down
- Adsense Revenue Down
गेल्या 2 Years मध्ये 15–20 Years पासून Blogging करणाऱ्या लोकांच्या Websites
एका Update मध्ये Complete Wipe Out झालेल्या मी स्वतः पाहिल्या आहेत.
इतकंच नाही, जेव्हा मी Blogging Start केली होती तेव्हा ज्या Bloggers चे Videos मी बघायचे, आज Reality अशी आहे की ते लोक Blogging सोडून इतर Niches मध्ये Videos बनवत आहेत. यामागचं कारण वेगळं सांगायची गरज नाही.
Branding शिवाय Blogging आता Possible नाही
आज Blogging म्हणजे फक्त Articles लिहिणं राहिलेलं नाही. तो पूर्णपणे Branding चा Game झाला आहे.
जोपर्यंत:
- लोक तुमचं Website Name Search करत नाहीत
- तुमचं Brand Recall तयार होत नाही
तोपर्यंत Google तुमच्यावर Trust ठेवत नाही.
पूर्वी म्हणायचो: Content Is King
आज Reality आहे: Brand Is King
माझा Personal Journey: Success ते Burnout
मी 2020–2021 मध्ये Blogging Start केली.
5 Years मध्ये:
- 25+ Websites Create केल्या
- Stable Adsense Income (10+ Adsense Approval Own)
- Freelancing आणि Blogging चा Strong Combination
पण 2025 नंतर:
- Traffic Unstable झाला
- Updates Unpredictable झाले
- Mental Pressure प्रचंड वाढला
Ethical Seo वापरून Website Grow करणं आज Years चं काम झालं आहे.
हो, Shortcuts आहेत:
- Pbn
- Arbitrage
- Spam Strategies
पण त्या Long Term मध्ये कधीच टिकत नाहीत.
बदललेला User Behaviour: जे लोक सांगत नाहीत ते सत्य
आजचा User:
- Blogs वाचत नाही
- Chatgpt कडून Direct Answer घेतो
- Short Form Videos जास्त Prefer करतो
आपल्याला हे Accept करावंच लागेल की Attention Economy पूर्ण बदलली आहे.
Digital Marketing ही:
- Highly Volatile
- Rapidly Changing Industry आहे
Blogging आणि Seo मधला फरक समजून घ्या
इथेच सगळ्यात जास्त Confusion होते.
Blogging:
- एक Business Model
- पूर्णपणे Adsense Dependent
- 2026 मध्ये Extremely Tough
Seo:
- एक Skill
- Services, Jobs, Consulting साठी उपयोगी
- Evergreen Value असलेली
Seo शिकणं आजही Smart Decision आहे. पण Blogging Business Start करणं सगळ्यांसाठी योग्य नाही.
2026 मध्ये Better Alternatives कोणते?
माझ्या Experience नुसार, आज हे Skills जास्त Practical आहेत:
- Performance Marketing
- Video Editing आणि Graphic Designing
- Content Creation (Video First Approach)
या Skills मध्ये:
- Faster Results मिळतात
- Personal Brand Build करता येतो
- Platform Dependency कमी असते
Reality Check: Relationship Example
Blogging म्हणजे Relationship सारखंच आहे.
प्रेम आंधळं असतं, हे खरं आहे. पण त्या प्रेमाचे Pro & Cons माहीत नसतील तर नंतर फक्त Regret उरतो. Blog Start करणं काही मोठी गोष्ट नाही. 3–4 हजार रुपये सुरुवातीला कोणीही खर्च करू शकतो.
पण जसं:
- GF सुंदर आहे
- सुरुवातीला सगळं Perfect वाटतं
पण जसं-जसं Time जातो:
- Demands वाढतात
- Expectations वाढतात
- जबाबदाऱ्या वाढतात
तेव्हा तेच प्रेम डोकेदुखीचं कारण बनू लागतं.
Blogging सुद्धा तसंच आहे.
Renewal Time ला:
- Hosting
- Domain
- Tools
- Content Cost
हे सगळं Manage करायचं असेल तर Emotional Decision चालत नाही, Practical Mindset लागतो.
Blogging पण तसंच आहे. Start सगळे करतात, Sustain फार थोडे करतात.
Final Thoughts: Emotion नाही, Clarity घ्या
हा Blog Post Blogging विरोधात नाही. तो Blind Blogging विरोधात आहे.
जर तुमच्याकडे:
- Long Term Vision असेल
- Brand Build करण्याची तयारी असेल
- Multiple Income Sources तयार करण्याची इच्छा असेल
तर Blogging अजूनही Possible आहे.
पण जर:
- Quick Money हवा असेल
- 6 Months मध्ये Result अपेक्षित असतील
तर 2026 मध्ये Blogging तुमच्यासाठी योग्य नाही.
Decision तुमचा आहे. माझं काम फक्त तुम्हाला Honest Clarity देणं आहे.
आजचा Blog कसा वाटला ते नक्की सांगा. हा लेख थोडा मनातला पण पूर्णपणे Practical पद्धतीने सगळ्यांना समजेल, या उद्देशाने लिहिलेला आहे.
धन्यवाद 🙏
Freelancing म्हणजे काय? 2026 मध्ये Freelancing कसं सुरू करायचं? | What is Freelancing in Marathi





