नमस्कार ब्लॉगिंग कम्युनिटी, प्रत्येक नवीन ब्लॉग्गरला ब्लॉगिंग करत असतांना नेहमी एका गोष्टीचा सामना करावा लागत असतो तो म्हणजे गुगल ॲडसेन्सच अप्रोवल साठी. प्रामुख्याने कधी विचार केला तर बऱ्याचदा प्रयन्त करून पण अनेक ब्लॉगर मित्रांना अप्रोवल मिळत नाही. बऱ्याचदा तर निराश होऊन ब्लॉगिंग सोडण्याचा निर्णय हा घेतला जातो. परंतु आजच्या लेखात मी तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कृपया हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला पण गुगल ॲडसेन्सच अप्रोवल लवकरात लवकर मिळण्यात मदत होऊ शकेल.
जर तुम्ही ब्लॉगिंगबद्दल सिरियस असाल तर तुम्ही स्वतः ऍडसेन्ससाठी अप्लाय करू शकता. प्रत्येक ब्लॉगरचे त्याच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवरून ऑनलाइन पैसे कमवण्याचे स्वप्न असते आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी AdSense Approval मिळणे खूप आवश्यक आहे कारण आपण त्यातून अधिक कमाई करू शकतो.
Google AdSense Account Approved न मिळण्याचे कारण
जेव्हा तुम्ही Google AdSense साठी अप्लाय करता, तेव्हा Google काही कारणे देऊन तुमचे AdSense अकाउंटला रिजेक्ट करत, त्यामुळे तुमचे Google AdSense अकाउंट का अपूवल होत नाही हे याचे कारणे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
- ब्लॉग किंवा वेबसाइटवर अपूर्ण कंटेन्ट
- ब्लॉगचा कन्टेन्ट AdSense अनुकूल नसणे
- ब्लॅक हॅट SEO वापरणे
- कॉपी पेस्ट कन्टेन्ट वापरण्यामुळे
- About us, Contact us, Privacy Policy, Disclaimer page नसण्याची कारणे
- Google AdSense कोड योग्यरित्या सबमिट न करणे
- आधीच Google AdSense खाते असल्यामुळे
- स्पष्ट नेव्हिगेशन सिस्टम नसल्यामुळे
- वेबसाइटवर मालवेअर संपर्कामुळे
मित्रांनो, जेव्हा तुमचे Google AdSense अकाउंट अँप्रोवल झालेले नसते, तेव्हा वर नमूद केलेल्या काही गोष्टीची तुमच्या वेबसाइटवर किंवा ब्लॉगवर उणीव असतात. या चुका शोधून त्या दूर केल्यानंतर तुम्ही पुन्हा Google AdSense साठी अप्लाय करू शकता.
How to get Google AdSense approved in Marathi?
Google AdSense अकाउंट अप्लाय करण्यासाठी, ब्लॉग हा कमीतकमी 6 महिन्यांचा किंवा स्पेसिफिक दिवसांचा असावा असं सांगितलं जात. परंतु मित्रांनो, ही फक्त एक अफवा आहे कारण मला माझ्या वेबसाइटसाठी फक्त 1 महिन्यानंतर AdSense अपृवल झाले. माझे अनेक असे विदयार्थी आहेत कि, त्यांना २ ते ३ महिन्यात अँप्रोवळ हे मिळालेलं आहे.
AdSense Approval घेण्यापूर्वी मी तुम्हाला काही टिप्स सांगत आहे. ज्या टिप्सला फॉलो करून तुम्ही तुमच्या ब्लॉगवर सहजरित्या AdSense Approval मिळवू शकता.
Remove Extra Link (अतिरिक्त लिंक काढा)
तुम्हाला माहित असेल की बहुतेक ब्लॉगर्स हे विनामूल्य थीम आणि टेम्पलेट वापरतात, ज्यामध्ये तुम्हाला काही अतिरिक्त लिंक्स मिळतात ज्याचा तुमच्या ब्लॉगवर नकारात्मक इफेक्ट पडतो, म्हणूनच तुम्ही ते काढून टाकल्यानंतरच AdSense Approval टाका.
Use Custom Domain (कस्टम डोमेन वापरा)
जर तुमचा ब्लॉग किंवा वेबसाइट BlogSpot वर असेल, तर सर्वप्रथम तुम्ही कस्टम डोमेन वापरावे कारण Google कस्टम डोमेन वापरून वेबसाइटला सर्वप्रथम प्राधान्य देते . जर तुमचं कस्टम डोमेन असेल तर तुम्हाला लवकर AdSense Approval मिळेल.
विशेष म्हणजे जेव्हा पण तुम्ही डोमेन विकत घेण्यासाठी जाल तेव्हा फक्त टॉप लेव्हल डोमेनच खरेदी करा कारण त्याला लवकर Approval मिळते.
तुम्ही GoDaddy, Name cheap, Bigrock इत्यादींकडून कस्टम डोमेन खरेदी करू शकता. जिथे डोमेन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत.
टॉप लेव्हल डोमेन वापरून, Google AdSense Approve सारखी समस्या थोडी लवकर सोडवली जाऊ शकते कारण Google कस्टम डोमेनला अधिक प्राधान्य देते.
Create Important Pages (महत्त्वाची पेजेस तयार करा)
ब्लॉग तयार केल्यानंतर, आमच्याबद्दल, आमच्याशी संपर्क साधा, डिस्क्लेमर आणि गोपनीयता धोरण पेजेस तयार करणे आवश्यक आहे.
ही चार पेजेस तयार केल्यावरच तुम्ही प्रोफेशनल आहात आणि गुगलच्या धोरणांनुसार काम करत आहात हे दिसून येते.
तुम्हाला गुगलमध्ये अशी अनेक टूल्स सापडतील. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी ही सर्व पेजेस तयार करू शकता आणि AdSense Approval मिळवू शकता.
Write Original Content (स्वतः कन्टेन्ट लिहा)
Google AdSense Approval लवकर मिळावं म्हणून नवीन ब्लॉगर लगेच इतरांच्या पोस्ट किंवा लेख कॉपी आणि पेस्ट करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे Google ते सहजपणे पकडते आणि समजते की हा कन्टेन्ट कॉपी केला गेला आहे. त्यामुळे कन्टेन्ट स्वतः लिहा. जर तुम्ही कॉपी पेस्ट केला तर तुम्हाला कधीच Google AdSense Approval मिळणार नाही.
अनेक ब्लॉगर वेगवेगळ्या वेबसाइटवरून काही कन्टेन्ट चोरतात आणि त्यांना असं वाटत कि आम्हाला AdSense ची मान्यता मिळेल.
पण हे अजिबात करू नका. कारण गुगल मशीन लर्निंग हे सहज ओळखते. अशीच इतकी मोठी कंपनी ती झाली नाही आहे.
ओरिजनल आणि युनिक पोस्ट लिहिण्याबरोबरच लेखाला योग्य टायटल आणि सब हेडींग असावीत आणि त्यासोबतच पोस्ट उपयुक्त आणि माहितीपूर्णही असावी.
जर तुम्हाला युनिक कंटेंट कसा लिहायचा हे माहित नसेल तर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये यश मिळू शकत नाही. मी तुम्हाला असं नाही म्हणणार कि तुम्ही ब्लॉगिंग करू नका. मात्र एक सल्ला नक्की देईल कि, तुम्हाला कंटेंट कसा लिहायचा याच्यासाठी दररोज २ तास तरी सराव हा करावा लागेल. कोणीतरी म्हटलेलं आहे कि, “Practice makes man perfect” ते उगाचच नाही म्हटलं आहे.
Write 30 Article Before AdSense Approval
Google AdSense कडून Approval मिळविण्यासाठी किती पोस्ट लिहिणे आवश्यक आहे? हा प्रत्येक ब्लॉगरचा प्रश्न असतो.
यासाठी कोणतेही निश्चित निकष नसले तरी, तरीही तुमच्याकडे किमान ३० पोस्ट असाव्यात आणि त्याही प्रत्येक पोस्ट किमान 1000 शब्दांची असावी.
तुमच्या ब्लॉगवर तुमच्याकडे जितका जास्त कन्टेन्ट असेल तितकी AdSense Approval मिळण्याची शक्यता वाढेल कारण असे बरेच ब्लॉगर आहेत ज्यांना अपूर्ण कन्टेन्टमुळे AdSense Approval नाकारले जाते.
Remove Templates Footer Credit (टेम्पलेट्स फूटर क्रेडिट काढा)
तुमच्या टेम्पलेटवर फूटर क्रेडिट असल्यास, ते काढून टाका आणि तुमचे स्वतःचे काही कॉपीराइट केलेले शब्द लिहा.
फूटर क्रेडिट काढून टाकण्यासाठी, 2023 मध्ये नमूद केलेल्या पद्धतीला फॉलो करा कारण आजकाल टेम्पलेट्स ऍडव्हान्स सुरक्षिततेसह येतात जिथून क्रेडिट काढणे कठीण आहे परंतु तुम्ही कोणत्याही टेम्पलेटमधून फूटर क्रेडिट काढू शकता.
आजच्या काळात, जर तुम्हाला Google AdSense ची मंजूरी हवी असेल तर फूटर क्रेडिट काढून टाकणे अनिवार्य आहे अन्यथा मान्यता मिळण्याची शक्यता खूप कमी असते.
Use Responsive Templates/Themes (रिस्पॉन्सिव्ह टेम्प्लेट्स/थीम्स वापरा)
AdSense Approval मिळवण्यासाठी, तुमच्या वेबसाइटची रचना सोपी असावी आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमच्या ब्लॉगवर रिस्पॉन्सिव्ह टेम्प्लेट्स/थीम इंस्टॉल केली असतील.
येथे रिस्पॉन्सिव्ह टेम्प्लेट्स/थीमचा अर्थ असा आहे की तुमची वेबसाइट मोबाइल आणि डेस्कटॉपच्या डिस्प्लेवर बसली पाहिजे.
बेस्ट टेम्पलेट्स इन्स्टॉल केल्यानंतर आपलं काम संपत नाही, त्यानंतर ते देखील कस्टमाइझ करावे लागत.
Customization करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्या
- नेव्हिगेशन चांगले असावे.
- टेम्प्लेट्स साधे आणि पांढऱ्या Background सह असावेत.
- विनाकारण विजेट्स वापरू नका.
- कोणतीही लिंक उघडताना त्रुटी Error दाखवू नका.
- ब्लॉगचा स्पीड लोड वेगवान असावा.
तुमच्या ब्लॉगमध्ये किंवा वेबसाइटमध्ये हे सर्व क्वालिटी असतील तर तुम्ही AdSense साठी Apply करू शकता.
Use Copyright Free Image (कॉपीराइट फ्री इमेज वापरा)
जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल आणि तुम्हाला त्यासाठी इमेजेस कशा तयार करायच्या हे माहित नसेल, तर तुम्ही कॉपीराइट फ्री इमेजेस वापरल्या पाहिजेत कारण तुम्ही कॉपीराइट केलेले फोटो वापरत असाल तर तुम्हाला पॉलिसीच्या उल्लंघनामुळे AdSense Approval मिळत नाही.
कॉपीराइट फ्री इमेजेस डाउनलोड करण्यासाठी, तुम्ही Pixel आणि Pixabay वेबसाइटवर जाऊन ती विनामूल्य डाउनलोड करू शकता.
Remove Other Ad Network (इतर Ad नेटवर्क काढा)
AdSense Approval न मिळाल्यामुळे, जर तुम्ही तुमच्या वेबसाइटवर इतर कोणत्याही नेटवर्कच्या जाहिराती ठेवल्या असतील, तर त्या काढून टाकल्यानंतरच AdSense Approval मिळवण्यासाठी जा कारण Google AdSense इतर अनेक नेटवर्कला सपोर्ट करत नाही.
Make Blog Favicon And Logo Professional (ब्लॉग फेविकॉन आणि लोगो व्यावसायिक बनवा)
जेव्हा तुमची वेबसाइट प्रोफेशनल असेल तेव्हाच Google AdSense ला Approval देते आणि वेबसाइटमधील LOGO आणि Favicon प्रोफेशनल नसल्यास वेबसाइट देखील प्रोफेशनल दिसणार नाही, म्हणून तुम्ही एक चांगला लोगो डिझाइन केला पाहिजे.
Google Search Console वापर करा
जेव्हा तुम्ही तुमच्या साइटवर 20 पोस्ट लिहिल्या असतील, तेव्हा तुम्ही तुमची वेबसाइट वेबमास्टर टूलमध्ये म्हणजेच Google Search Console मध्ये जोडली पाहिजे.
Submit Sitemap
जेव्हा तुम्ही तुमची वेबसाइट Google Search Console मध्ये जोडता, तेव्हा तुम्हाला एक Sitemap पर्याय मिळतो ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाइटचा Sitemap सबमिट करावा लागतो.
Create Social Media Account (सोशल मीडिया अकाउंट तयार करा)
तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक मिळवण्यासाठी आणि Google च्या दृष्टीने त्याचे मूल्य वाढवण्यासाठी, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे खाते तयार केल्यानंतर, तुम्ही त्याची लिंक तुमच्या वेबसाइटवर जोडली पाहिजे, यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढतील. तसेच. याशिवाय, तुमची वेबसाइट प्रोफेशनल दिसेल ज्यामुळे तुम्हाला AdSense Approval देखील पटकन मिळते.
सारांश
मित्रांनो, तुम्हाला आजचा Google AdSense Approval कसे मिळवायचा हा लेख कसा वाटला कृपया कमेंट मध्ये नक्की कळवा. आपल्या bloggarvinita.com वर मी अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आणि ब्लॉग्गिंगच्या टिप्स आणि ट्रिकस खास तुमच्यासाठी मराठीत आणायचा प्रयन्त करणार आहे. धन्यवाद.
Very meaningful information, thank you so much.