How to get Google AdSense Approval in Marathi | Google AdSense Approval कसे करायचे – 2024 मध्ये 

How to get Google AdSense Approval in Marathi: मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉगिंगमधून पैसे कमवायचे असतील, तर तुमच्या ब्लॉगला Google AdSense कडून अप्रूवल मिळणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी, तुम्हाला सर्वात आधी समजून घ्यावं लागेल की Google AdSense Approval नेमकं कसं घ्यायचं?

नवीन ब्लॉगरना नेहमी हा प्रश्न पडतो की, आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर AdSense अकाउंट कसं अप्रूव करायचं? अनेक वेळा नवीन ब्लॉगरना पहिल्यांदाच AdSense अप्रूवल मिळत नाही. माझ्या सोबत पण असच झालं होत सुरुवातीला. यामुळे काही लोक निराश होतात आणि ते ब्लॉगिंग सोडून देतात किंवा ब्लॉगिंगमधून पैसे कमवणं शक्यच नाही असा गैरसमज आपल्या डोक्यात करून घेतात. 

प्रत्येक नवीन ब्लॉगरचं स्वप्न असतं की, त्यांनी त्यांच्या ब्लॉगवरून पैसे कमवावेत. कारण आजच युग हे डिजिटली आहे. यासाठी, त्यांना Google AdSense हा बेस्ट आणि सोपा मार्ग वाटतो. पण, Google AdSense कडून अप्रूवल मिळणं इतकं पण सोपं नाही, कारण बहुतेक नवीन ब्लॉगरना Google AdSense Policy बद्दल हवी तितकी पुरेशी माहिती नसते, ज्यामुळे त्यांना Rejection चा सामना करावा लागतो. 

ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे AdSense. याचा वापर करणं अतिशय सोपं आहे आणि यामध्ये चांगली कमाईही करता येते.

Google AdSense Approval मिळवणं तितकं अवघड नाही, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आजच्या आर्टिकल मध्ये दिलेल्या AdSense Approval Tips फॉलो करून तुम्ही सहज Google AdSense Approval पहिल्या प्रयन्तात मिळवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत त्या तुमच्या ब्लॉगवर Implement करावे लागतील.

जर तुम्हाला खरोखर ब्लॉगिंगमधून पैसे कमवायचे असतील, तर तुमच्या ब्लॉगसाठी Google AdSense Approval मिळणं आवश्यक आहे. या आर्टिकल मध्ये तुम्हाला Google AdSense Approval Tips विषयी तर माहिती मिळेल, ज्याचा युज करून तुम्ही सहजपणे तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर AdSense Account अप्रूव करू शकता.

How to get Google AdSense Approval in Marathi

1. एक Category किंवा Niche निवडा

सुरुवातीला, तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी एक Category किंवा Niche निवडायची आहे. उदाहरणार्थ, Tech, Health, Food, Lifestyle, Fashion and Beauty, Business, इत्यादी या Category आहेत.

Niche म्हणजे एखाद्या मोठ्या Category चा छोटा भाग. उदाहरणार्थ, Tech Category मध्ये Mobile Phones, Computers, इत्यादी हे Niche आहेत.

Category किंवा Niche निवडल्यामुळे Google ला तुमच्या ब्लॉगची माहिती मिळते, आणि त्यामुळे तुम्हाला AdSense Approval लवकर मिळण्याची शक्यता वाढते.

2. Supported Language निवडा

Google AdSense सर्व भाषांना सपोर्ट करत नाही. जर तुम्ही भारतात आहात, तर तुम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली, पंजाबी, इत्यादी भाषांमध्ये ब्लॉग तयार करून AdSense Approval मिळवू शकता.

3. Custom Domain वापरा

Custom Domain
Custom Domain

Custom Domain म्हणजे तुमच्या ब्लॉगचा स्वतःचा नाव. उदाहरणार्थ, bloggervinita.com हा एक Custom Domain आहे.

जर तुमचा ब्लॉग Blogspot वर असेल, तर त्यात .blogspot.com लागतो. उदाहरणार्थ, bloggervinita.blogspot.com. त्यामुळे, Blogspot ब्लॉगसाठी Custom Domain जोडून मग AdSense साठी Apply करा.

Top Level Domain (.com, .in, .org) वापरल्याने AdSense Approval लवकर मिळण्याची शक्यता वाढते.

4. Responsive आणि SEO Friendly Theme वापरा

तुमचा ब्लॉग लवकर लोड व्हावा आणि मोबाईल व लॅपटॉपवर सहज दिसावा यासाठी Responsive आणि SEO Friendly Theme वापरणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या ब्लॉगचा अनुभव युजर्स साठी उत्तम होतो, ज्यामुळे Google AdSense Approval लवकर मिळतो.

5. Copyright Content वापरू नका

बरेच नवीन ब्लॉगर Copyright Content वापरतात, ज्यामुळे त्यांचा AdSense Approval Reject केलं जात. दुसऱ्या वेबसाइटवरील टेक्स्ट, इमेजेस किंवा व्हिडीओ वापरणं चुकीचं आहे. 

तुमचा कंटेंट ओरिजिनल असावा आणि तुम्ही स्वतः लिहिलेला असावा, ज्यामुळे AdSense Approval मिळण्याचे चान्सेस वाढतात. 

6. Posts ची संख्या

AdSense Approval साठी ब्लॉगवर किती आर्टिकल असावेत याचं ठराविक उत्तर नाही. पण साधारण ५0-१०० पोस्ट (500-700 शब्दांचे) लिहिल्यानंतर तुम्ही Apply करू शकता.

7. तुमच्या ब्लॉगला 1-2 महिने होऊ द्या

AdSense साठी Apply करण्यापूर्वी तुमच्या ब्लॉगला कमीतकमी 1-2 महिने होऊ द्या. यामुळे Google ला तुमच्या ब्लॉगची Test घेण्यासाठी वेळ मिळतो आणि Approval मिळण्याची शक्यता वाढते.

8. Regular पोस्ट करा

तुमच्या ब्लॉगवर नियमित पोस्ट करत राहा. नियमित पोस्ट केल्याने Google ला तुमच्या ब्लॉगची विश्वासार्हता दिसून येते, ज्यामुळे AdSense Approval लवकर मिळू शकतो.

9. इतर Ad Networks वापरू नका

AdSense साठी Apply करत असाल, तर इतर Ad Networks काढून टाका. कारण Google AdSense इतर Ad Networks चा वापर असणाऱ्या ब्लॉग्सना रिजेक्ट करू शकतो.

AdSense साठी Apply केल्यानंतर, काही दिवस (2-15) वाट पाहा आणि Google कडून मेल आल्यानंतरच पुढील प्रोसेस पूर्ण करा.

आशा आहे कि, हे टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला Google AdSense Approval मिळवणं खूप सोपं जाईल!

10. Important Pages आणि Social Accounts बनवा

Important Pages
Important Pages

Blog च्या About Us, Contact Us, Privacy Policy, Disclaimer pages तयार करा. हे पेजेस तुमच्या ब्लॉगला प्रोफेशनल लुक देतात आणि गूगलला देखील  विश्वास देतात.

11. Navigation Bar बनवा

Navigation Bar
Navigation Bar

ब्लॉगचा Header मध्ये Navigation bar योग्य पद्धतीने बनवा. कॅटेगरीज कमी ठेवा आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये किमान 8-10 पोस्ट्स असतील याची काळजी घ्या.

12. Google Search Console मध्ये सबमिट करा

Google Search Console
Google Search Console

ब्लॉग पूर्ण झाल्यानंतर Google Search Console मध्ये submit करा. XML Sitemap तयार करा आणि सर्च कंसोलमध्ये सबमिट केल्यावर AdSense साठी apply करा.

13. AdSense Request नंतर थीम चेंज करू नका

Request पाठवल्यानंतर ब्लॉगची थीम बदलणे टाळा. अन्यथा Site Under Construction चा error येऊ शकतो.

14. SSL Certificate Activate ठेवा

तुमच्या ब्लॉगवर SSL certificate (https://) लावा. यामुळे तुमच्या वेबसाइटला secure ranking मिळेल.

15. Traffic

ब्लॉगवर किमान 200-300 visitors रोज येणे फायदेशीर आहे. Traffic चा एक महत्त्वाचा भाग organic असणे गरजेचे आहे. बरेच जन सोशल ट्रैफिक पण देतात सुरुवातीला मात्र organic ट्रफिक असणे गरजेचे आहे. 

निष्कर्ष

वरील सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी Google AdSense approval मिळवणे सोपे होईल. 

अधिक वाचा: How to Increase WordPress Website Speed in Marathi

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment