How to Improve SEO While Writing Blog Posts? | ब्लॉग पोस्ट लिहिताना SEO सुधारण्याचे 10 सोपे टिप्स – अधिक ट्राफिक मिळवा!

How to Improve SEO While Writing Blog Posts?: आजकाल इंटरनेटवर लाखो ब्लॉग्स आहेत, पण सगळेच पहिल्या पानावर दिसत नाहीत. तुमच्या ब्लॉगला योग्य वाचकवर्ग मिळावेत आणि गुगलच्या पहिल्या पानावर रँक करावा, यासाठी SEO (Search Engine Optimization) गरजेचे आहे.

Table of Contents

SEO म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?

सोप्या शब्दात सांगायचे तर, SEO म्हणजे तुमच्या ब्लॉगला Search इंजिनसाठी (Google, Bing, Yahoo) सुलभ करणे. जसं दुकानात एखाद्या वस्तूला लोक सहज पाहू शकतील अशा ठिकाणी ठेवले तर ती जास्त विकली जाते, तसंच योग्य SEO वापरल्यास तुमचा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.

SEO कसा मदत करतो?

समजा, तुम्ही “वजन कमी करण्याचे उपाय” यावर ब्लॉग लिहिला आहे, पण जर तुमचा ब्लॉग पाचव्या किंवा दहाव्या पानावर असेल, तर किती लोक त्यावर क्लिक करतील? बहुतेक लोक पहिल्या 3-4 Results वर क्लिक करतात. म्हणूनच, योग्य कीवर्ड्स, चांगली लेखनशैली, आणि SEO Techniques वापरून आपण पहिल्या पानावर येऊ शकतो.

ब्लॉगर करत असलेले सामान्य चुका

  1. कीवर्ड न वापरणे किंवा चुकीच्या पद्धतीने वापरणे – योग्य कीवर्ड्स नसतील, तर तुमचा ब्लॉग शोधण्यात अडचण येते.
  2. लांबट आणि गुंतागुंतीची भाषा वापरणे – सोपी आणि स्पष्ट भाषा वापरल्यास वाचक जास्त वेळ थांबतात.
  3. इमेजेस आणि लिंक न वापरणे – योग्य इमेजेस आणि इतर लेखांशी जोडलेल्या लिंक्स असल्यास ब्लॉग जास्त आकर्षक होतो.

यामुळे तुमच्या ब्लॉगला योग्य SEO वापरून जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे! 

कीवर्ड रिसर्च आणि त्याचा योग्य वापर

कीवर्ड रिसर्च का महत्त्वाचे आहे?

समजा, तुम्ही एक नवीन कपड्यांचे दुकान सुरू केले, पण कोणीही येत नाही. कारण काय? कारण लोकांना तुमच्या दुकानाबद्दल माहितीच नाही! तसेच, जर तुम्ही ब्लॉग लिहीत असाल आणि योग्य कीवर्ड्स (Keywords) वापरत नसाल, तर लोक तुमचा लेख वाचू शकणार नाहीत. कीवर्ड्स म्हणजे अशा शब्दांचा समूह, जे लोक गुगलवर शोधत असतात.

कीवर्ड शोधण्यासाठी महत्त्वाची टूल्स

योग्य कीवर्ड्स शोधण्यासाठी काही महत्त्वाची टूल्स आहेत:

  1. Google Keyword Planner – फ्री टूल आहे, जे तुम्हाला योग्य कीवर्ड्स शोधायला मदत करते.
  2. Ubersuggest – नवीन ब्लॉगर्ससाठी सोपी आणि उपयोगी टूल.
  3. Ahrefs आणि SEMrush – प्रोफेशनल ब्लॉगर्स आणि SEO एक्सपर्ट्स यांच्यासाठी उपयुक्त.

कीवर्ड्स योग्य ठिकाणी वापरणे का गरजेचे आहे?

कीवर्ड योग्य ठिकाणी नसतील, तर तुमचा लेख गूगलमध्ये दिसणार नाही. कीवर्ड्स खालील ठिकाणी असणे महत्त्वाचे आहे:

Title (शीर्षक) – आकर्षक आणि कीवर्डयुक्त असावा.
Meta Description – छोट्या परिच्छेदात कीवर्ड समाविष्ट करा.
URL (वेब पत्ता) – लहान आणि स्पष्ट असावा, ज्यामध्ये कीवर्ड असावा.
पहिल्या 100 शब्दांमध्ये – लेखाच्या सुरुवातीलाच कीवर्ड ठेवल्याने गूगलला लेखाचा विषय पटकन समजतो.
Subheadings (H2, H3) – वाचकांचा आणि सर्च इंजिनचा अनुभव सुधारण्यासाठी उपशीर्षकांमध्ये कीवर्ड वापरा.

योग्य कीवर्ड आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर केल्यास तुमचा ब्लॉग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल! 

SEO-ऑप्टिमाइझ्ड टायटल आणि मेटा डिस्क्रिप्शन कसे लिहावे?

1. आकर्षक आणि कीवर्डयुक्त टायटल का महत्त्वाचे आहे?

समजा, तुम्ही बाजारात नवीन दुकान उघडले आणि तुमच्या दुकानाच्या पाटीवर फक्त “दुकान” असे लिहिले, तर लोकांना काय विकते हे कसे कळेल? तसंच, ब्लॉगच्या शीर्षकात (Title) जर स्पष्टता आणि योग्य कीवर्ड नसेल, तर तो गूगल आणि वाचकांना समजणार नाही.

आकर्षक आणि SEO-फ्रेंडली टायटल कसे लिहावे?

  • टायटलमध्ये मुख्य कीवर्ड हवाच! उदा. “ब्लॉगिंगसाठी बेस्ट SEO टिप्स – ट्रॅफिक 3x वाढवा!”
  • संक्षिप्त (60-70 अक्षरे) आणि स्पष्ट ठेवा.
  • संख्या (10 टिप्स, 5 स्टेप्स), प्रश्न (“SEO कसे सुधारायचे?”), किंवा उत्सुकता वाढवणारे शब्द वापरा.

2. मेटा डिस्क्रिप्शन लिहिण्याचे सोपे नियम

मेटा डिस्क्रिप्शन म्हणजे तुमच्या लेखाचा छोटा सारांश, जो Google च्या Search Results मध्ये दिसतो.

उत्तम मेटा डिस्क्रिप्शनसाठी टिप्स:

  • 150-160 अक्षरे ठेवा.
  • मुख्य कीवर्ड नैसर्गिकरित्या जोडा.
  • उत्सुकता वाढवा. उदा. “ब्लॉगिंगसाठी SEO सुधारायचंय? हे 5 सोपे ट्रिक्स तुमचा ट्रॅफिक दुप्पट करतील!”

3. पॉवर वर्ड्स आणि इमोशनल ट्रिगर्स

लोक भावनिक कंटेंटला अधिक प्रतिसाद देतात. “बेस्ट,” “सिक्रेट,” “प्रोव्हन,” “गुपित,” “आश्चर्यकारक” यांसारखे पॉवर शब्द वापरा.

योग्य टायटल आणि मेटा डिस्क्रिप्शन असल्यास तुमच्या ब्लॉगला अधिक क्लिक मिळतील आणि ट्रॅफिक वाढेल! 

ब्लॉग पोस्टची Outline आणि SEO साठी तिचे महत्त्व

1. योग्य हेडिंग्ज (H1, H2, H3) वापरणे

ब्लॉग पोस्टला योग्य रचना देणे म्हणजे तुमच्या वाचकांना आणि गूगलला ते समजावणे सोपे करणे. H1 हे तुमच्या पोस्टचे मुख्य Title असते, आणि ह्याच्यावर मुख्य कीवर्ड असावा. H2 आणि H3 हेडिंग्ज तुम्हाला Subhedings म्हणून वापरता येतात, ज्यामुळे तुमच्या लेखाला चांगली संरचना मिळते.

उदाहरणार्थ:

  • H1: ब्लॉगिंग साठी SEO टिप्स
  • H2: SEO का महत्त्व आहे?
  • H3: कीवर्ड रिसर्च कसा करावा

हेडिंग्ज वापरणे ब्लॉगसाठी सोपे बनवते आणि गूगलला तुमचा लेख चांगल्या प्रकारे समजून रँक करायला मदत करते.

2. लहान आणि सोपे परिच्छेद

जास्त लांब आणि जटिल परिच्छेद वाचणे कठीण होते. लहान आणि सोपे परिच्छेद वाचकांना सहज समजतात आणि ते वाचायला प्रेरित करतात.

उदाहरणार्थ: 1-2 वाक्यांचे छोटे परिच्छेद वापरून माहिती साध्या भाषेत देणे अधिक प्रभावी ठरते.

3. बुलेट पॉइंट्स आणि लिस्ट्सचा वापर

जर तुम्हाला माहिती अधिक सोप्या आणि आकर्षक पद्धतीने द्यायची असेल, तर बुलेट पॉइंट्स आणि लिस्ट्स वापरा. हे वाचकांना माहिती त्वरीत आणि सहज मिळवण्यास मदत करतात.

उदाहरण:

  • SEO टिप्स:
    • योग्य कीवर्ड वापरा
    • लेखाची रचना चांगली ठेवा
    • इमेजेस ऑप्टिमाइझ करा

ब्लॉग पोस्टची चांगली रचना तुमचा SEO सुधारते आणि वाचकांची आकर्षण वाढवते!

Internal and External linking: SEO साठी महत्त्व

1. Internal लिंकिंगचे फायदे

Internal Linking म्हणजे तुमच्या ब्लॉगच्या एका पानावर दुसऱ्या पानाकडे लिंक देणे. उदाहरणार्थ, जर तुम्ही “ब्लॉगिंगसाठी SEO टिप्स” वर लेख लिहिला आणि त्यात “कीवर्ड रिसर्च” या विषयावर लिंक दिली, तर तुमच्या वाचकांना त्या विषयावर अधिक माहिती मिळू शकते.

फायदे:

  • सर्च इंजिनला तुमचा साइट संरचना समजून घेण्यास मदत होते.
  • वाचकांचा अनुभव सुधारतो कारण त्यांना संबंधित लेख मिळतात.
  • ब्लॉगच्या इंटर्नल पेजेसला अधिक ट्रॅफिक मिळतो.

2. External linking चा वापर (Authority Building)

External linking म्हणजे तुमच्या लेखात दुसऱ्या वेबसाइट्स कडे लिंक देणे. उदाहरणार्थ, जर तुमचा लेख “The best tools for SEO” यावर असेल आणि तुम्ही “Google Analytics” च्या अधिकृत वेबसाइटकडे लिंक दिली, तर तुमचा ब्लॉग अधिक विश्वासार्ह बनतो.

फायदे:

  • गूगल आणि वाचकांसाठी तुमचा ब्लॉग अधिक विश्वसनीय ठरतो.
  • तुमच्या ब्लॉगची रँक सुधारते.

3. ब्रोकन लिंकपासून बचाव कसा करावा?

ब्रोकन लिंक म्हणजे लिंक केलेली Page किंवा वेबसाइट अस्तित्वात नसते. यामुळे वाचक आणि गूगल दोघेही निराश होतात. ब्रोकन लिंक टाळण्यासाठी नियमितपणे लिंक तपासा आणि अपडेट करा.

Interanl आणि External लिंकिंगच्या योग्य वापरामुळे तुमचा SEO सुधारतो आणि वाचकांना अधिक चांगला अनुभव मिळतो. 

SEO साठी इमेज ऑप्टिमायझेशन

1. इमेजेस मध्ये Alt Text चे महत्त्व

कल्पना करा की तुम्ही ब्लॉग पोस्टमध्ये एक सुंदर फोटो टाकला, पण गूगल त्याला “पाहू शकत नाही.” इथे Alt Text कामी येते. Alt Text म्हणजे इमेजचा एक छोटा वर्णन, जो गूगलला त्या इमेजचा विषय सांगतो. जर इमेजवर “SEO Tips” लिहिलेलं असेल, तर Alt Text मध्ये “The best tools for SEO” असा वर्णन लिहा. हे गूगलला इमेजचा विषय समजावून, त्याच्या रँकिंगला मदत करते.

2. इमेजेस कॉम्प्रेस करणे (Page Speed साठी)

Image जर जास्त मोठी असतील, तर तुमचा ब्लॉग लोड होण्यास वेळ घेतो, आणि वाचक थांबून नाही वाचत. इमेजेस कॉम्प्रेस करून त्यांचा आकार कमी करा, ज्यामुळे पेज स्पीड सुधारतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही मोबाईलवर वेबसाईट ओपन करता, तेव्हा जितके वेगाने ती लोड होते, तितके चांगले!

3. वेब इमेजेस साठी सर्वोत्तम फॉरमॅट्स (JPEG, PNG, WebP)

  • JPEG – फोटोंसाठी उत्तम, आणि आकारही कमी.
  • PNG – पारदर्शक Background साठी उत्तम, पण आकार मोठा असतो.
  • WebP – सर्वोत्तम गुणवत्ता आणि लहान आकार.

इमेज ऑप्टिमायझेशन केल्याने तुमचा ब्लॉग अधिक वेगाने लोड होतो, आणि गूगलमध्ये चांगले रँक होण्यास मदत होते! 

Readability आणि User Experience सुधारणा

1. सोपी आणि समजायला सोपी भाषा वापरणे

जसं तुम्ही मित्राशी साध्या भाषेत बोलता, तसं तुमच्या ब्लॉगमधून वाचकांशी संवाद साधा. जास्त जटिल शब्द वापरून वाचकांची उत्सुकता कमी होईल. वाचकांसाठी तुमच्या लेखाचं उद्दिष्ट स्पष्ट करा आणि ते सहज समजून घेण्यास मदत करा. उदाहरणार्थ, “ब्लॉग पोस्ट लिहिणे” ऐवजी “आपल्या विचारांची मांडणी कशी करावी” असं साधं लिहा.

2. मोबाइल-फ्रेंडली फॉरमॅटिंग

आजकाल, बहुतेक लोक मोबाईलवर वेबपृष्ठ पाहतात. जर तुमचा ब्लॉग मोबाईलवर योग्य प्रकारे दिसत नसेल, तर तुम्ही चुकत आहात. मोबाइल-फ्रेंडली फॉरमॅटिंग म्हणजे तुमचा ब्लॉग मोबाईलवर सहज वाचता येईल अशा प्रकारे दिसावा. उदा., लहान वाक्य, साध्या शब्दांमध्ये लेख, आणि इमेजेसची लहान आकारातील फॉरमॅट्स वापरणे.

3. कीवर्ड स्टफिंग टाळणे

कीवर्ड स्टफिंग म्हणजे एका लेखात खूप जास्त कीवर्ड वापरणे. हे वाचक आणि गूगल दोघांसाठीही चांगले नाही. आपल्या लेखात कीवर्ड्स नैसर्गिकरीत्या वापरा आणि ते वाचकांना खूप त्रास देणारे बनवू नका. उदाहरणार्थ, “Blog Writing” शब्द 10 वेळा वापरण्याऐवजी, “Blog Post” आणि “Writing” असे विविध शब्द वापरा.

वाचकांसाठी चांगला अनुभव देऊन तुम्ही त्यांना आकर्षित करू शकता आणि गूगलमध्ये चांगले रँक होऊ शकता! 

Technical SEO Factors

वेबसाईटसाठी Tehnical SEO खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये काही घटक असतात, ज्यामुळे तुमच्या साइटला सर्च इंजिन्समध्ये चांगली रँकिंग मिळवता येते आणि वाचकांचा अनुभव सुधारतो.

1. लोडिंग स्पीड:

आजकाल आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला झटपट माहिती पाहिजे. जर तुमची वेबसाइट खूप वेळ घेत असेल तर Users साइट सोडून जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या शॉपिंग साइटवर जाऊ इच्छिता, जर ती साइट लोड होण्यासाठी खूप वेळ घेत असेल, तर तुम्ही दुसरी साइट निवडाल. म्हणून, साइटचे लोडिंग स्पीड महत्त्वाचे आहे, जेणेकरून वाचक त्यातच थांबतील.

2. मोबाइल रिस्पॉन्सिवनेस:

आजकल लोक मोबाइलवर जास्त वेळ घालवतात. जर तुमची साइट मोबाइल-friendly नसेल, तर त्याचे नुकसान होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही मोबाइलवर एखादी वेबसाइट पाहत असाल आणि त्याची टेक्स्ट वाचा जाऊ नये, तर तुम्ही दुसरी साइट निवडाल. मोबाइल रिस्पॉन्सिवनेस म्हणजे तुमची साइट मोबाइलवर चांगली दिसली पाहिजे आणि वापरण्यास सोपी असावी.

3. SSL प्रमाणपत्र:

SSL प्रमाणपत्र असलेली वेबसाइट सुरक्षित असते. जर तुमच्या वेबसाइटवर SSL प्रमाणपत्र नसेल, तर वाचकांना एक “Not Secure” असा संदेश दिसू शकतो. तुम्ही बँकिंग साईटवर पैसे ट्रान्सफर करत असताना, जर ती साइट सुरक्षित नसेल, तर तुम्ही त्या साइटवर विश्वास ठेवणार नाही. SSL प्रमाणपत्र वेबसाइटच्या सुरक्षिततेला महत्त्व देते.

अशा प्रकारे, या Techincal घटकांमुळे तुमची साइटUsers साठी विश्वासार्ह आणि सोयीची बनते.

स्कीमा मार्कअप म्हणजे काय?

स्कीमा मार्कअप म्हणजे आपल्या ब्लॉगवरील माहिती Google सारख्या सर्च इंजिनला समजण्यास सोपी करणारा कोड. यामुळे तुमच्या ब्लॉगची माहिती विशेष प्रकारे सर्च रिजल्टमध्ये दिसते, ज्याला रिच स्निपेट्स म्हणतात.

स्कीमा मार्कअपचे प्रकार

  1. FAQ स्कीमा – विचारलेले प्रश्न आणि उत्तरे (उदा. “प्रधानमंत्री आवास योजना कशी मिळवायची?”)
  2. How-to स्कीमा – टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन (उदा. “ब्लॉग कसा सुरू करावा?”)
  3. Review स्कीमा – Product किंवा Service Rating (उदा. “Best smartphones 2025”)

स्कीमा कसा जोडावा?

जर तुम्ही वडापाव विक्रेता असाल आणि तुमच्याकडे Google वर “The best vada pav in Mumbai” असे शोधल्यावर तुमचे दुकान पहिल्या क्रमांकावर यावे, तर तुम्ही Review स्कीमा वापरू शकता.

ब्लॉगवर स्कीमा जोडण्यासाठी Rank Math किंवा Yoast SEO प्लगइनचा वापर करा. तसेच, Google च्या Structured Data Markup Helper च्या मदतीने स्कीमा HTML मध्ये मॅन्युअली जोडू शकता.

फायदे

✅ ब्लॉगचा ट्रॅफिक वाढतो
✅ गुगलमध्ये टॉप रँक मिळतो
✅ युजरला माहिती पटकन समजते

ब्लॉग पोस्टला प्रमोट करून SEO सुधारण्याचे सोपे मार्ग

1. सोशल मीडियावर शेअरिंग

जर तुम्ही तुमच्या ब्लॉगची लिंक Facebook, Instagram, Twitter वर शेअर केली, तर जास्त लोक ती बघतील आणि तुमच्या ब्लॉगला ट्रॅफिक मिळेल. तसेच, लोक त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या वेबसाइटला भेट देतील, त्यामुळे बॅकलिंक्स तयार होतात, जे SEO साठी उपयुक्त असते.

2. गेस्ट ब्लॉगिंग आणि कोलॅबोरेशन

जर तुम्ही दुसऱ्या ब्लॉगवर तुमचा लेख प्रकाशित केला किंवा इतरांसोबत कोलॅबोरेशन केले, तर नवीन Reader तुमच्या ब्लॉगपर्यंत पोहोचू शकतात. उदाहरणार्थ, जर एखादा फूड ब्लॉगर तुमच्या रेसिपी ब्लॉगचा उल्लेख केला, तर त्याच्या वाचकांना तुमचा ब्लॉग सापडेल.

3. फोरम आणि Q&A साईट्स वापरणे

Quora आणि Reddit सारख्या साईट्सवर लोक प्रश्न विचारतात. जर तुम्ही तिथे तुमच्या ब्लॉगशी संबंधित उत्तरे दिली आणि लिंक दिली, तर अधिक वाचक मिळू शकतात.

SEO परफॉर्मन्स ट्रॅक करणे आणि सुधारणा करणे

1. Google Analytics आणि Search Console वापरणे

हे टूल्स तुम्हाला सांगतात की कोणते लेख जास्त वाचले जात आहेत आणि कोणत्या कीवर्ड्ससाठी रँक मिळतो.

2. कीवर्ड रँकिंग तपासणे

SEO सुधारण्यासाठी तुमचे लेख कोणत्या कीवर्डसाठी रँक करत आहेत ते नियमित तपासा.

3. जुने कंटेंट अपडेट करणे

गेल्या वर्षी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये नवीन माहिती जोडा. उदाहरणार्थ, जर तुम्ही “2024 मधील बेस्ट स्मार्टफोन” लिहिले असेल, तर 2025 मध्ये ते अपडेट करा.

निष्कर्ष

SEO सुधारण्यासाठी योग्य कीवर्ड वापरा, ब्लॉग प्रमोट करा, आणि जुने लेख अपडेट करा. या ट्रिक्स वापरून तुमचा ब्लॉग गुगलमध्ये वर येईल आणि अधिक वाचक मिळतील.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर कमेंट करा आणि शेअर करा!

Google March 2025 Core Update: तुमच्या वेबसाईटवर याचा काय परिणाम होणार?

WhatsApp Channel Follow Me
Telegram Channel Follow Me
Instagram Page Follow Me

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment