आपल्या Blog वर ट्रॅफिक कशी वाढवायची? | How to Increase Blog Traffic in Marathi

How to Increase Blog Traffic in Marathi: नमस्कार ब्लॉगर्स तुम्ही आमच्या bloggervinita या ब्लॉगवर आला आहेत याचा अर्थ तुमचा स्वतः चा देखील एक ब्लॉग आहे. जर तुमचा ब्लॉग तयार झाला असेल, तर आता “Blog Traffic कसे वाढवायचे” याबद्दल मनात खूप सारे प्रश्न पडतात. आजच्या लेखात आपण जाणून घेऊ कि, तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक कशी आणायची. 

त्यासोबतच मी तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्यासाठी विविध सोपे आणि महत्वाचे टिप्स शेअर करणार आहे. जर तुमची ब्लॉग वेबसाइट आहे आणि तुम्ही Google AdSense द्वारे पैसे कमवू इच्छित असाल, तर हा आजचा लेख  तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. कृपया शेवट्पर्यंत हा लेख काळजीपूर्वक वाचा.

How to Increase Blog Traffic in Marathi

सर्वात महत्वाचं म्हणजे मी या लेखात वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्याचे कोणतेही “टिप्स किंवा ट्रिक्स” सांगितलेले नाहीत, तर ऑर्गेनिक पद्धतींनी ट्रॅफिक वाढवण्याचे मार्ग सांगितले आहेत. जर तुम्ही आमच्या सांगितलेल्या स्टेप्सला फॉलो केले, तर तुम्ही नक्कीच तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्यात यशस्वी व्हाल.

तुम्ही ब्लॉगवर रोज नवीन आणि फ्रेश कंटेंट लिहा आणि पब्लिश करा. तुमच्या ब्लॉगचा डिझाइन आकर्षक असावा, लोडिंग स्पीड फास्ट ठेवा आणि प्रत्येक लेखाला Google Search Console मध्ये इंडेक्स करा. हे केल्यानंतर, तुमच्या वेबसाइटवर हळूहळू का होईना मात्र Google वरून ऑर्गेनिक ट्रॅफिक येऊ लागेल.

सर्वप्रथम, एक (Niche) आणि तुमची ऑडियन्स निवडा

कुठल्याही ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ऑडियन्स टार्गेटेड असायला हवी. तुम्हाला नेमकी कोणती ऑडियन्स हवी आहे, याचा तुमच्याकडे स्पष्ट अंदाज असावा.

जर तुम्ही नवीन ब्लॉग तयार केला असेल, तर सुरुवातीला तुमच्या ब्लॉगची एक निच (Niche) किंवा कॅटेगरी निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही न्यूज ब्लॉग बनवत असाल, तर न्यूजसंबंधी माहिती द्याल. किंवा तुम्ही सरकारी योजना, फायनान्स, टेक्नोलॉजी किंवा शेअर मार्केट यासंबंधी माहिती देऊ शकता.

एकदा कॅटेगरी निवडल्यानंतर, तुमची ऑडियन्स कोण असेल हे ठरवा. उदाहरणार्थ, तुमची ऑडियन्स पुरुष आहे की महिला, किंवा त्यांच्या वयाच्या गटात कोण येतं?

हे ठरवल्यावर, तुमची वेबसाइट आकर्षक डिझाइन करा, आणि वेबसाइटची लोडिंग स्पीड वाढवा. नंतर खालील स्टेप्स फॉलो करा.

निच आणि ऑडियन्स निवडल्यानंतर, नियमितपणे लेख प्रकाशित करा

जेव्हा तुम्ही तुमच्या कॅटेगरीशी संबंधित कंटेंट लिहून ब्लॉगवर नियमितपणे पोस्ट करता, तेव्हा वाचकांपर्यंत ते पोहचते.

कंटेंट उच्च दर्जाचा असावा

तुमच्या कंटेंटने वाचकांना हेल्प व्हायला हवा. लेख 800 ते 1000 शब्दांमध्ये विस्तृत, रिअल माहिती आणि रिसर्च सह लिहावा.

Google Search Console मध्ये इंडेक्सिंग करा

तुमच्या लेखांना गूगलमध्ये इंडेक्स करून घ्या. असं केल्यावर तुमची वेबसाइट गूगल सर्चमध्ये येईल आणि तुम्हाला ट्रॅफिक मिळू लागेल.

सोशल मीडियाचा वापर करा

जर गूगल सर्चमधून ट्रॅफिक मिळत नसेल, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुमचा लेख शेअर करा आणि तिथून ट्रॅफिक वाढवा.

या पद्धतींनी तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ऑर्गेनिक ट्रॅफिक आणू शकता.

सोशल मीडियाचा युज  करून वेबसाइटवर ट्रॅफिक आणा

आजच्या काळात सोशल मीडियाचा युज करून ट्रॅफिक आणणे खूप सोपं आहे, कारण प्रत्येक व्यक्ती दररोज 2-3 तास Instagram किंवा Facebook वर वेळ घालवतो. तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या ब्लॉगशी संबंधित नियमित व्हिडिओज बनवा आणि त्या Instagram किंवा Facebook पेजवर अपलोड करा. लोक तुमचे व्हिडिओ पाहतील, त्यांना माहिती आवडली, तर ते तुमच्या ब्लॉगवर येतील. व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर आमच्या ब्लॉगला भेट द्या. जर तुम्ही आजच ब्लॉग तयार केला असेल आणि सोशल मीडियावर योग्य पद्धतीने काम केले, तर तुम्ही आजपासूनच सोशल मीडियावरून ट्रॅफिक आणू शकता.

Facebook वर Ads चालवून ट्रॅफिक आणा

जर तुमची ई-कॉमर्स वेबसाइट आहे आणि तुम्ही तुमच्या वेबसाइटवर कोणताही प्रोडक्ट विकत असाल, तर तुम्ही Facebook Ads चा युज करून तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणू शकता. फेसबुकवर ऍड्स चालवणे खूप सोपं आहे. जर तुम्हाला ऍड्स चालवता येत नसतील, तर तुम्ही यूट्यूबवरून शिकू शकता आणि ऍड्स चालवून तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणू शकता.

स्पॉन्सरशिपद्वारे ट्रॅफिक आणा

जर तुम्हाला त्वरित ट्रॅफिक आणायचा असेल, तर तुम्ही पैसे गुंतवून स्पॉन्सरशिपद्वारे ट्रॅफिक आणू शकता. त्यासाठी तुम्ही YouTuber किंवा ज्यांचे Instagram वर जास्त फॉलोअर्स आहेत अशा लोकांशी संपर्क साधा. त्यांना पैसे देऊन तुमची वेबसाइट प्रमोट करून घ्या. यामुळे तुम्ही तुमच्या वेबसाइटवर पटकन ट्रॅफिक आणू शकता.

Telegram किंवा WhatsApp ग्रुपद्वारे ट्रॅफिक आणा

जर तुमच्याकडे Telegram किंवा WhatsApp ग्रुप असेल, तर तुम्ही तुमची वेबसाइट त्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या वेबसाइटवर ट्रॅफिक आणू शकता.

सारांश 

जर तुम्ही ब्लॉग वेबसाइटमधून पैसे कमवू इच्छित असाल, तर तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक आणणं खूप गरजेचं आहे. तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक आलं, तरच तुम्ही पैसे कमवू शकता, अन्यथा नाही. म्हणूनच, या लेखात मी वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्याचे काही मार्ग सांगितले आहेत. आशा आहे की, हा लेख वाचून तुम्हाला ब्लॉगवर ट्रॅफिक कसे आणावे हे समजलं असेल.

आमच्या या वेबसाइटवर तुम्हाला वर्डप्रेस आणि ब्लॉगिंग संबंधित माहिती मराठी मध्ये वाचावयास मिळते. जर तुम्हाला ब्लॉगिंग शिकायचं असेल, तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या. धन्यवाद. 

अधिक वाचा: Technical SEO Checklist in Marathi | Technical SEO च्या मदतीने अधिक ऑर्गेनिक ट्रॅफिक मिळवा

WhatsApp Channel Follow Me
Telegram Channel Follow Me
Instagram Page Follow Me

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment