Instagram Viral Tips in Marathi: आजच्या जगात Content Creation हे फक्त Timepass राहिलेलं नाही खूप जण याला Full-Time Career म्हणून बघतात. पण बरेच Creators असे आहेत जे रोज Content टाकतात मेहनत करतात आणि मग विचार करतात की “माझं Content Viral का होत नाही? Views का येत नाहीत?” तर आज आपण अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत की कोणते Metrics Track करायचे Marketing Funnel कसा काम करतो आणि Content मधून पैसे कसे कमवायचे.
Shares आणि Saves या दोन गोष्टी सगळ्यात आधी बघा
तुम्ही Video Post केल्यावर Likes किती आले यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की Shares आणि Saves किती आले. कारण एखाद्याने तुमची Video Share केली म्हणजे त्याला ती इतकी आवडली की त्याने दुसऱ्याला पण दाखवली. आणि Save म्हणजे त्याला ती Video नंतर परत बघायची आहे. जितके जास्त Shares आणि Saves तितका जास्त Instagram तुमचा Content नवीन लोकांपर्यंत पोहोचवतो. हेच Virality चं खरं Secret आहे.
Hook Rate पहिल्या 3 Seconds मध्येच सगळं ठरतं
Hook Rate म्हणजे तुमचा Content सुरू झाल्यावर 3 Seconds नंतर किती लोक अजूनही बघत आहेत. हा Rate साधारण 50 ते 70% असायला हवा. म्हणजे जर 100 लोकांनी Video सुरू केली तर किमान 50 ते 70 जणांनी ती 3 Seconds नंतरही बघायला हवी.
जर तुम्ही पहिल्या 3 Seconds मध्ये Audience ला थांबवू शकला नाहीत तर ते Scroll करतात आणि तुमचा Content तिथेच संपतो. Instagram लवकरच Auto Scrolling Feature आणणार आहे म्हणजे Audience स्वतःहून Scroll करायची गरज नाही Instagram आपोआप पुढचा Content दाखवेल. त्यामुळे आता तुमच्याकडे 3 Seconds पण नसतील Audience ला थांबवायला. म्हणूनच Hook जितका Strong असेल तितका चांगला. Carousels साठी पहिला Page हाच तुमचा Hook असतो त्यामुळे तो नेहमी Eye-Catching ठेवा.
Niche Audience की Broad Audience कोण जास्त Important?
हा प्रश्न खूप जणांना पडतो. तर उत्तर आहे तुमचं Goal काय आहे यावर अवलंबून आहे.
जर तुम्ही Business चालवत असाल तर Virality तुमच्यासाठी तितकी Important नाही. समजा तुम्ही Crypto बद्दल Content बनवता आणि 20,000 Views येतात पण ते सगळे तुमच्या Topic मध्ये Interested आहेत तर हीच तुमची Valuable Audience आहे. तुम्हाला Viral व्हायची गरज नाही कारण तुमचं Business तर मिळतंच आहे.
पण जर तुम्ही Content Creator आहात आणि Brand Deals Sponsorships यातून पैसे कमवायचे आहेत तर Reach आणि Virality तुमच्यासाठी थोडी जास्त Important आहे. एकूण Business आणि Content Creator यांचा Perspective वेगळा असतो हे लक्षात ठेवा.
Marketing Funnel Content बनवण्यापासून ते Sales पर्यंतचा प्रवास
Marketing Funnel म्हणजे एखाद्या अनोळखी माणसाला तुमच्याबद्दल माहिती करून देणे आणि हळूहळू त्याला Customer बनवणे. Content Creation मध्ये हे तीन टप्प्यात होतं.
पहिला टप्पा म्हणजे Top Of The Funnel इथे तुम्ही नवीन लोकांपर्यंत पोहोचता Awareness Create होते. दुसरा टप्पा म्हणजे Middle Of The Funnel इथे Audience तुमच्याशी Engage होते Trust Build होतो. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे Bottom Of The Funnel इथे तुम्ही Community बनवता आणि त्यातून Monetization होतं.
Bear Biceps चं उदाहरण बघा तो Broad Audience साठी मजेदार Content बनवतो पण ज्यांना Content Creation शिकायचं आहे त्यांना तो त्याच्या Skill House Platform वर Convert करतो. हाच असतो एक Perfect Funnel.
Community Building Platform गेला तरी Audience सोबत राहील
समजा उद्या तुमचा Instagram Account Ban झाला तर तुमचं सगळं काम वाया जाईल का? जर तुम्ही Community Build केली असेल तर नाही!
Audience चा Data Collect करणं खूप Important आहे. त्यांचे Emails घ्या WhatsApp Numbers घ्या Newsletter सुरू करा WhatsApp Broadcast Channel बनवा. हा Data नेहमी तुमच्याकडे राहतो. कोणताही Platform बंद झाला तरी तुम्ही परत नव्याने सुरुवात करू शकता कारण तुमची Audience तुमच्यासोबत आहे.
Monetization चे 4 सोपे मार्ग
Brand Deals या येतात आणि जातात कधी 6 महिने नसतील. त्यामुळे याला Side Income म्हणूनच बघा Main Income नाही.
Adsense Revenue YouTube वर Consistent राहिलात तर दर महिन्याला पैसे मिळत राहतात. YouTube वर Grow व्हायला वेळ लागतो पण तिथली Audience जास्त Loyal असते.
Affiliate Marketing Fashion किंवा Tech Content बनवत असाल तर Amazon Flipkart चे Affiliate Accounts बनवा. तुम्ही एखादी Product Recommend केली आणि कोणी विकत घेतली तर तुम्हाला Commission मिळतो.
UGC म्हणजे User Generated Content हे आत्ता खूप Trending आहे. Brands ना Natural आणि Raw वाटणारं Content हवं असतं जे Creators बनवतात. जर तुमचा UGC Video एखाद्या Brand साठी चांगला Perform केला तर ते तुम्हाला दर महिन्याला Content बनवायला सांगतात. Brand Deals पेक्षा UGC जास्त Stable आणि Recurring असतो.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट
Consistency हाच खरा Key आहे. आज Marketing उद्या Tech परवा Random Lifestyle असं केलं तर Audience Connect होणार नाही आणि Brands पण तुमच्याशी Associate होणार नाहीत. एका Creator कडे फक्त 1.3 लाख Followers होते पण ती Zoho आणि Adobe सारख्या मोठ्या Brands सोबत काम करते फक्त कारण तिने एका Niche मध्ये Consistent Presence ठेवली.
Content Creation हे फक्त Views साठी नाही ते तुमचं Brand तुमचा Trust आणि Long-Term Business Build करण्यासाठी आहे. उशीर कशाला? आत्तापासूनच सुरुवात करा!
Pinterest वरून पैसे कसे मिळवायचे? | How to Make Money on Pinterest in Marathi (Step-by-Step Guide)





