Blogging शिकता शिकता माणसं समजली – My Honest Blogger Story

“आजचा दिवस हा प्रत्येक ब्लॉगरसाठी खूप खास असतो – कारण आज आहे Blogger’s Day!” लिहायचं काम करणाऱ्यांसाठी, सतत Content तयार करणाऱ्यांसाठी, आणि विचार जगासमोर मांडणाऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे एक छोटंसं सेलिब्रेशन.

ब्लॉगिंग हा फक्त एक करिअर नसतो, तो एक स्वतःशी आणि जगाशी जोडलेला संवाद असतो.
आज मीही पहिल्यांदाच, BloggerVinita म्हणून, मनातलं खरं बोलते आहे – स्क्रिप्टेड नाही, निटस नाही, पण खऱ्या भावना.

या पोस्टमधून मी शेअर करणार आहे माझा प्रवास, ज्या माणसांनी मला inspire केलं, जे अनुभव मी घेतले आणि जे काही शिकले ते. हे फक्त माझं नाही, तर आपल्या सारख्या प्रत्येक ब्लॉगरचं Representation आहे, ज्यांनी मेहनतीने स्वतःचं काहीतरी तयार केलं आहे.

२. माझा ब्लॉगिंगचा प्रवास (My Blogging Journey)

२०२० मध्ये, दहावी झाल्यावर जेव्हा सगळे पुढच्या शिक्षणाच्या तयारीत होते, तेव्हा मी एक वेगळाच रस्ता निवडला – ब्लॉगिंग. तसं पाहायला गेलं, तर माझं सुरुवातीचं कारण अगदी साधं होतं – घरी बसून ऑनलाइन पैसे कमवायचे होते.

मला नेहमी Motivational Content लिहायला आवडायचं. सुरुवातीला Blogger या Platform वर लिहायला सुरुवात केली. २-३ ब्लॉग्स चालू केले, थोडंसं Traffic पण मिळालं, पण तरी काहीतरी कमी असण्याचं नेहमी वाटायचं. मनापासून वाटायचं की WordPress वर जावं, पण Technical Knowledge जवळपास शून्य होत.

पण एक गोष्ट होती — प्रामाणिक मेहनत आणि Consistency. त्यामुळे हळूहळू शिकत गेले. लिहित गेले. अडचणी आल्या, अनेकदा वाटलं सोडून द्यावं… पण प्रत्येक वेळेस नव्यानं सुरुवात केली.

या ५ वर्षांत खूप Ups and Downs आले, पण त्यातूनच शिकले. आज मी फक्त ब्लॉगर नाही, तर Content Writer म्हणून स्वतःला ओळखते. कारण मला कोणत्याच गोष्टीत लिमिट्स नको होत्या.

ब्लॉगिंगने मला Passion दिलं, आणि तेच Profession बनलं. आणि हीच माझ्यासाठी खरी कमाई आहे – जे फार कमी लोकांच्या नशिबी असत.  

https://bloggervinita.com/my-honest-blogger-story/

अक्षय रासकर सर – मनाने खऱ्या अर्थाने श्रीमंत

आज अक्षय रासकर सर हे महाराष्ट्रातील टॉप ब्लॉगर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. पण खरं सांगायचं झालं, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला खरा मोठेपणा त्यांच्या साधेपणात आणि माणुसकीत आहे.

आमची ओळख प्रत्यक्षात कधीच झाली नाही – ती पूर्णपणे ऑनलाइनच आहे. पण जेव्हा त्यांना माझ्याविषयी कळलं, की एक मुलगी ब्लॉगिंग करतेय, स्वतःचा मार्ग शोधतेय… तेव्हा त्यांनी स्वतःहून संपर्क साधून माझं कौतुक केलं. एका मोठ्या व्यक्तीकडून अशा पद्धतीनं ओळख आणि स्वीकार मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.

अक्षय सरांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली Quality म्हणजे – Simplicity आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती.

ते जितके पैशाने श्रीमंत आहेत, तितकेच मनानेही श्रीमंत आहेत. त्यांचं काम पाहिलं, की लक्षात येतं की प्रसिद्धी मिळूनही माणूसपण कसं टिकवावं, हे शिकायचं असेल तर अक्षय सरांकडून शिकावं.

त्यांनी अनेक मराठी तरुणांना ना फक्त मार्गदर्शन केलं, तर रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली. त्यांच्या Content मध्ये प्रामाणिकपणा असतो, त्यांच्या बोलण्यात नम्रता आणि त्यांच्या वागण्यात माणुसकी.

त्यांचं एक Vision आहे – मराठी ब्लॉगिंग कम्युनिटीला एक Platform मिळवून देण्याचं. आणि खरंच सांगायचं तर, ते केवळ प्रसिद्ध ब्लॉगर नाहीत… ते खऱ्या अर्थाने “महान” माणूस आहेत.

नितीन राठोड सर – Real लोक अजूनही अस्तित्वात आहेत

खरं सांगायचं तर, सुरुवातीला मला मराठी ब्लॉगिंग कम्युनिटीचा खूप वाईट अनुभव आला. अनेक लोक फक्त वरवर मदतीचं नाटक करत होते. त्यामुळे मी जेव्हा नितीन राठोड सरांचं नाव ऐकलं, तेव्हा मनात थोडीशी शंका होती. पण… आज मला पूर्ण एक वर्ष झालंय त्यांना ओळखून, आणि मनापासून असं वाटतं की – हा माणूस खरंच “Real” आहे.

ओळख झाली 2024 च्या Bloggers Day ला – जेव्हा मी त्यांची एक स्टोरी Instagram आणि ब्लॉगवर शेअर केली होती. त्यानंतर संवाद सुरू झाला, आणि हळूहळू एक Connection निर्माण झाला.

मला त्यांच्यातली सगळ्यात Inspiring Quality वाटते ती म्हणजे – ते जसे आहेत तसे सोशल मीडियावर प्रेसेंट करतात. आजकालच्या डिजिटल दुनियेत जेव्हा सगळे कसं “दिसावं” यावर काम करत असतात, तेव्हा नितीन सर मात्र “जे आहे तेच” जगतात. आणि त्यांचा हा स्वभाव मला कायम Inspire करतो. 

त्यांचं Knowledge, अनुभव, आणि विशेष म्हणजे मराठी Community साठी असलेली इच्छाशक्ती खरंच जबरदस्त आहे. ते केवळ स्वतःच्या Growth मध्ये अडकलेले नाहीत, तर मराठी ब्लॉगिंगला एक वेगळी ओळख मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

ते माझ्यासारख्या एका लहान आणि नवीन ब्लॉगरला नेहमीच Support करत आले – कधी वाट दिली, कधी Motivate केलं, आणि कधी फक्त एक Simple Reply देऊन Motivate  केलं.

नितीन सर म्हणजे – आजच्या स्वार्थी काळातला एक प्रामाणिक आणि Real माणूस, 

रवी गावित – शांततेत क्रांति करणारा एक मराठी माणूस 

रवी गावित सर, MN Naukri चे संस्थापक. नाव मोठं, काम मोठं… पण माणूस मात्र अतिशय शांत, साधा आणि प्रामाणिक.

मी त्यांच्या संपर्कात कामाच्या निमित्ताने आले. तसं पहायला गेलं, तर त्यांच्या प्रोफाइलवर किती काही Achievement दिसतात – पण प्रत्यक्षात हा माणूस कोणत्याच गोष्टीचा गाजावाजा करत नाही.

गेली ८–१० वर्षं, ते शांतपणे, Consistency ने, कुठलाही आवाज न करता काम करत आहेत. Blogging, Digital Field, Job Support यासारख्या क्षेत्रात त्यांचं खरं Knowledge आणि अनुभव अफाट आहे – पण ते त्याचा कधीच देखावा करत नाहीत.

याचं कारण एकच – त्यांच्याकडे आहे Simplicity, जी आज फार कमी लोकांमध्ये दिसते.

त्यांचं बोलणं असो, किंवा साधं मेसेजिंग… सगळीकडे एक Calmness असतो. कुठलीही घाई नाही, अहंकार नाही – आणि म्हणूनच मला वाटतं, त्यांच्यातली मोठेपणाची खरी खूण म्हणजे – नम्रता.

मी त्यांच्या कामातून आणि व्यक्तिमत्त्वातून एक गोष्ट शिकलिये –

“तुम्ही मोठं व्हा, पण गोंगाट करू नका… तुमचं कामच तुमचं ओळख ठरू दे.”

अरफात कादीरी – शांत स्वभावातल एक सशक्त व्यक्तिमत्व 

अरफात सरांशी ओळख झाली तेव्हा फक्त काम होतं डोळ्यासमोर. मी Content Writer म्हणून एक प्रोजेक्ट करत होते, आणि त्यांच्यासोबत संवाद सुरू झाला. पण हळूहळू समजलं – की हा माणूस केवळ कामापुरता नाही… खरंच “Connect” होणारा माणूस आहे.

ते प्रचंड Technically Strong आहेत, पण मला Technical Field मध्ये फारसा Interest नव्हता. पण… त्यांच्याकडून मी एक खूप मोठी गोष्ट शिकली – एक चांगला माणूस कसा असतो ते. ते कायम Calm असतात, कुठलाही गाजावाजा नाही, Attitude नाही – आणि तरीही त्यांची Presence नेहमी जाणवते.

माझ्यासाठी अरफात सर म्हणजे असा व्यक्ती जो प्रोफेशनल राहतो, पण माणुसकी विसरत नाही. ते नेहमी संवाद साधताना आदर ठेवतात, मत विचारतात, आणि गरज पडली की मदतही करतात – कुठलाही दिखावा न करता.

त्यांचा मागचा ७ वर्षांचा संघर्ष ऐकताना एक गोष्ट मनात ठसते – “यश हे वेळेनं मिळतं, पण सातत्याने मेहनत करावी लागते” आमचं आजही बोलणं होतं – नवनवीन Ideas वर, आणि “काही नवीन करता येईल का?”

एकदम Frankly सांगायचं तर – एका Client चा रूपात भेटलेला हा माणूस आज एक चांगला सहकारी आणि मित्र जास्त जवळचा वाटतो. अरफात सर म्हणजे तो मित्र, जो फार बोलत नाही, पण नेहमी पाठीशी उभा असतो.

मी काय शिकले? – ब्लॉगिंग सोडून मी या सर्वांकडून एक चांगला माणूस कसा होता येईल हे शिकले 

ब्लॉगिंग सुरू करताना वाटलं होतं की हे फक्त लिखाण, पैसे, आणि थोडंफार Fame मिळवण्याचं माध्यम आहे. पण जसजसा प्रवास चालत गेला, तसतशी माझी समज वाढत गेली – आणि मला कळालं की ब्लॉगिंग म्हणजे फक्त कंटेंट नाही, तर अनुभव, नाती, आणि माणसं जोडण्याची एक संधी आहे.

या ५ वर्षांत मी खूप काही शिकले – आणि ते केवळ लिखाणातून नाही, तर लोकांमधून.

हो, ही एक गोष्ट इथे स्पष्टपणे सांगावीशी वाटते – या सर्व व्यक्तींना मी प्रत्यक्ष कधीच भेटले नाही. ना आमच्यात काही वैयक्तिक संबंध आहेत. ना मी यांच्या कडून ब्लॉगिंग शिकली.  

पण सोशल मीडियावरून, कामातून, संवादातून… एक Connection तयार झालं.

आणि त्या अनुभवांवरून असं वाटलं की – हो, ही माणसं खरंच मोठी आहेत.

मी त्यांना एक Blogger म्हणून ओळखते, पण माझ्या ब्लॉगिंगचा कोणताही थेट शिक्षक कोणी नाही. त्यांच्याशी झालेली ओळख ही जणू हळूहळू Step-by-Step घडत गेली – आणि प्रत्येक जणाकडून मी एकच विचार घेतला: “या व्यक्तीकडून मला काय चांगलं घ्यायचं?”

आजचा हा ब्लॉग पोस्ट हा, केवळ एक ब्लॉग पोस्ट नाही…

तर नवीन ब्लॉगर्ससाठी एक इशारा, एक दिशा आहे – की तुमच्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांमधून शिकत रहा. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं असतं.

ते चांगलं घ्या, स्वतः पुढे जा, आणि दुसऱ्यालाही पुढे घेऊन जाण्याची तयारी ठेवा.

नवीन ब्लॉगर्ससाठी माझा एक छोटा मेसेज…

जर तुम्ही नुकतीच ब्लॉगिंगची वाट धरली असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा –
यश हे एका रात्रीत मिळत नाही… पण एकेक दिवस जपून जगलात, तर ते नक्कीच मिळतं.

सुरुवात करताना सगळं परफेक्ट असणं शक्य नाही. तुम्हाला criticism ही मिळेल, silence ही मिळेल… पण तरीही लिहित राहा. कारण तुम्ही लिहिता आहात, म्हणजे तुम्ही निर्माण करता आहात.

कंटेंट लिहा, पण मनापासून लिहा. लोकांशी जोडा, पण स्वतःला विसरू नका.
ब्लॉगर म्हणून नाही, तर माणूस म्हणून छाप पाडण्याचा प्रयत्न करा.

सतत Comparison न करता, स्वतःचा वेगळा रस्ता निवडा. लोकांच्या टाळ्यांपेक्षा, त्यांचं मन जिंकणं ही खरी कमाई आहे.

तुम्ही माझ्याकडून काही शिकला असाल, किंवा काही Positive Energy मिळाली असेल, तर ते मला खाली Comment मध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमचा Favourite Blogger कोण आहे? त्याचं नावही खाली आवर्जून Mention करा — एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ! 😊🙏

6 Best Laptops for Bloggers in 2025 (Tested & Reviewed by a Real Blogger)


WhatsApp Channel Follow Me
Telegram Channel Follow Me
Instagram Page Follow Me

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment