Top 5 AI Tools For Content Writing in Marathi | मराठी कंटेंट रायटिंग सोपे करणारी 5 जबरदस्त AI Tools

Top 5 AI Tools For Content Writing in Marathi: मित्रांनो, सध्या सगळीकडे AI नुसता धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक क्षेत्रात AI आपला पराक्रम गाजवत आहे. ब्लॉगिंग मध्ये देखील तुम्ही या टूल्सचा वापर करून आपलं काम कमी वेळेत पूर्ण करू शकता. जे काम करायला आधी पूर्ण पूर्ण दिवस जायचा ते काम तुम्ही अगदी AI टूल्सच्या मदतीने काही तासात करू शकता. 

मी जेव्हा नव्याने ब्लॉगिंग शिकायला सुरुवात केली होती तेव्हा मला Proper रिसर्च करून 1 ब्लॉग पोस्ट लिहायला 2-3 दिवस आरामात लागायचे. कारण ब्लॉगिंग मध्ये सर्वात महत्वाचं काम हे कन्टेन्ट रायटिंगचे असते. बऱ्याच जणांना वाटत कि, ब्लॉगिंग म्हटलं म्हणजे कॉपी-पेस्ट. पण असं अजिबात नाही आहे. 

मान्य आहे कि, ब्लॉग पोस्ट लिहायला खूप वेळ लागतो. त्यात खूप साऱ्या गोष्टी या चेक कराव्या लागतात. पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. कारण आजच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला Top 5 AI Tools For Content Writing याविषयी सविस्तर पणे माहिती सांगणार आहे. त्यामुळे कृपया हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा. 

एका रिपोर्ट नुसार 2024 मध्ये AI वर Globally $200 Billion पेक्षा जास्त Invest हे केले जाणार आहे. आता तुमच्या मनात नेमका प्रश्न उद्भवला असेल कि, AI Tools काय आहे आणि कन्टेन्ट रायटिंग (AI Tools In Content Writing) मध्ये याची काय हेल्प होणार आहे?

आजच्या पोस्टमध्ये आपण AI Tools In Marathi विषयी जाणून घेणार आहोत त्यासोबतच Best AI Tools List पण पाहणार आहोत.

AI Tools काय आहे? – AI Tools Meaning In Marathi

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर AI Tools असे Softwares असतात जे स्वतः विचार करू शकता. इतकंच नाही तर ते शिकू पण शकता, Calculate पण करू शकता आणि User च्या Input च्या आधारावर ते Action घेतात.  

AI Tools चे सर्वात चांगले वैशिष्ट्ये असे कि, ते लवकर आणि योग्य काम करतात. AI च्या मदतीने आपण आपले काम छान पद्धतीने पूर्ण करू शकतो. 

आजच्या पोस्टमध्ये आपण AI Tools विषयी Discuss करणार आहोत जे Content Writing ला खूप सोपं करून देत. मला आशा आहे कि, तुम्हाला AI Tools म्हणजे काय ते समजले असेल. 

चला तर मग जाणून घेऊया 5 Best AI Tools For Content Writing विषयी.

Top 5 AI Tools For Content Writing in Marathi

1. Jasper.ai

Top 5 AI Tools For Content Writing in Marathi
Jasper.ai

Jasper.ai हे आर्टिफिशल इंटेलिजेंस क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय रायटिंग टूलपैकी एक आहे.

५०+ पेक्षा जास्त कन्टेन्ट टेम्पलेट्ससह, Jasper.ai हे मार्केटिंग क्षेत्रातील एक्सपर्टसला  लिहिण्याच्या अडथळ्यावर मात करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

या टूल्सला युज करणे अतिशय सोपे आहे. तुम्हाला फक्त एखादे टेम्पलेट सिलेक्ट करायचे आहे, Topics द्या आणि आपली Style आणि आवाजाचा टोन सेट करा. यानुसार हे Tool तुम्हाला Content शेअर करेल. 

महत्वाची वैशिष्टे:

  • आपल्या Writing style चा युज करून कन्टेन्ट तयार केला जातो. 
  • ”Stable Diffusion” चा युज करून इमेज तयार केली जाते. 
  • एखाद्या संक्षिप्त टेक्स्ट वरून मल्टी -चॅनेल मार्केटिंग campaign आयोजित केले जाते. 
Jasper युजरचा अनुभव कसा आहे?

Jasper आपल्याला ७ दिवसासाठी Free Trial उपलब्ध करून देते. 

ब्लॉग पोस्टचा Workflow हा जॅस्परचा सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक आहे. आम्ही त्यांना ‘How to decorate a room like an interior designer’ यावर ब्लॉग पोस्ट लिहिण्यास सांगून या टूलची Human Content तयार करण्याची क्षमता चेक करून पाहिली. 

सर्वप्रथम, पोस्ट तयार करण्यासाठी आपल्याला Topics संबंधित आवश्यक डेटा हा शेअर सविस्तरपणे द्यावा लंगर आहे.

उदाहरणार्थ, हे टूल आपल्याला Target Audience, Layout आणि Target Keywords Specify करण्यास सांगते.

आपल्याला हे AI Tool Suggestion पण देते.

Top 5 AI Tools For Content Writing in Marathi
Jasper

Jasper AI कन्टेन्ट लिहत असतांना बुलेट पॉइंट्सचा नक्की युज करतो. त्यामुळे कंटेन्टची गुणवत्ता वाढते.  

एकंदरीत मी स्वतः As a User Happy आहे Jasper AI च्या Results वरून. 

2. Copy.ai

Jasper AI सारखीच समानता आपल्याला Copy.ai या टूलमध्ये पाहावयास मिळते. हे दोन्ही AI-powered कन्टेन्ट क्रीएशनची वैशिष्ट्ये देतात.

मात्र, Copy.ai GPT3.5, GPT4 या विविध AI मॉडेल्ससह कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे उच्च-गुणवत्तेचे Results देण्यासाठी अधिक Flexible बनवते.

या टूलचा मुख्य उपयोग हा प्रामुख्याने विविध मार्केटिंग आणि विक्री वर्कफ्लो ऑटोमेटे करण्यासाठी होतो.

महत्वाची वैशिष्टे:

  • १००+ पेक्षा जास्त कॉपीरायटींग टेम्पलेट आणि टूल्स उपलब्ध असते. 
  • AI Powered भाषा अनुवादक जो २५+ भाषांमध्ये Support देतो. 
  • एका मजबूत AI मार्केटिंग आणि sales ऑटोमेशन प्लॅटफॉर्म
  • जर तुम्हाला स्वतःचे वर्कफ्लो डिझाइन करण्यासाठी आणि कार्ये लवकर पूर्ण करण्यासाठी या टूल्सचा तुम्ही नक्की युज करू शकता.
Copy.ai युजरचा अनुभव कसा आहे?

Copy.ai आपल्याला 14 दिवसासाठी Free Trial उपलब्ध करून देते.

डॅशबॉर्डवर तुम्ही AI Tools, ऑटोमेटेड फीचर्स आणि Assets लायब्ररीचा ॲक्सेस करू शकता.

चॅट Option निवडल्यावर तुम्हाला Search फील्ड दिसेल जिथे तुम्ही चॅट जीपीटीशी संवाद साधाल त्याप्रमाणे Copy.ai च्या चॅटबॉटशी देखील संवाद साधू शकता.

Copy.ai चा मुख्य उपयोग म्हणजे वर्कफ्लो तयार करणे होय.

3. Writesonic

Writesonic हे एक आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI) असिस्टेंट आहे. मार्केटर्स आणि व्यवसायांसाठी कन्टेन्ट क्रिएशनचे काम हे टूल सोपं करून देतो. या टूलचे चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत: AI आर्टिकल रायटर, Botsonic, Chatsonic आणि SEO सुट.

AI आर्टिकल रायटर हा लॉन्ग स्वरूपाचा टेक्स्ट तयार करतो.

Chatsonic हा एक संवादात्मक असिस्टेंट आहे ज्याच्याशी तुम्ही संवाद साधून कन्टेन्ट तयार करता. त्यामध्ये इमेज जनरेशन (Photosonic) वैशिष्ट्य देखील आहे जे टेक्स्ट चे इमेजमध्ये रूपांतर करते.

Botsonic हा एक चॅटबॉट-बिल्डिंग वैशिष्ट्य आहे.  जे युजरला टेकनिकल ज्ञानाशिवाय त्यांच्या वेबसाइटसाठी कस्टमाइझ चॅटबॉट्स बनविण्याची परवानगी देते.

SEO सुट हे SurferSEO शील संलग्नतेवर आधारित अनेक SEO वैशिष्ट्ये प्रदान करते.

महत्वाची वैशिष्टे:

  • या टूलच्या मदतीने आपण पोस्ट आणि इतर लॉन्ग स्वरूपाचे कन्टेन्ट तयार करू शकतो. 
  • ब्लॉग बिल्डर वैशिष्ट्यामुळे कस्टम कॉन्फिगरेशन शक्य आहे – उदाहरणार्थ, इंटर्नल लिकिंगसाठी पेजेस शोधणे, टायटल निवडणे इत्यादी.
  • SEO ऑप्टिमायझेशनसाठी देखील हे टूल मदत करते. 

4. ChatGPT

OpenAI द्वारे विकसित केलेले ChatGPT संवादात्मक टेक्स्ट तयार करण्यासाठी मोठ्या भाषा मॉडेल्सचा वापर करते. 

आतापर्यंत, या पोस्टमध्ये आपण ज्या अनेक टूल्स विषयी माहिती बघितली त्यापैकी अनेक OpenAI च्या मॉडेलवर आधारित आहे. 

थोडक्यात, ChatGPT रायटिंग, डेटा विश्लेषण, विचारमंथन आणि इतर संबंधित कार्ये प्रदान करते.

OpenAI ने अलीकडे ChatGPT-4o लाँच केले आहे, जे सर्व ChatGPT युजर साठी फ्री असलेले आणखी वेगवान मॉडेल आहे.

हे नवीन मॉडेल अधिक प्रगत आहे आणि त्याच्या पूर्ववर्ती मॉडेल्सपेक्षा अधिक क्षमता प्रदान करते.

हे “मल्टीमॉडल” देखील आहे, म्हणजे ते आवाज, टेक्स्ट आणि इमेजमध्ये कंटेन्ट तयार करू शकते आणि समजू शकते.

कल्पना अशी आहे की ChatGPT तुमचा वैयक्तिक डिजिटल असिस्टेंट बनत आहे ज्याच्याशी तुम्ही वास्तविक वेळेत संवाद साधू शकता, भावनिक सूचना समजू शकता आणि वास्तविक जगताशी सहभागी होऊ शकता.

तथापि, ते सर्व कन्टेन्ट मार्केटिंगच्या गरजा पूर्णपणे पूर्ण करत नाही. हे टूल SEO डेटा किंवा ब्लॉग एडिटर ऑफर करत नाही. आणि Proper Results मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक प्रयत्न हे करावे लागतील.

महत्वाची वैशिष्टे:

  • सर्व प्रकारचे कार्ये (टेक्स्ट, इमेज इ.) साठी सोपी चॅट कार्यक्षमता आहे.
  • brainstorming आणि visual तसेच टेक्स्ट कन्टेन्ट तयार करण्यासाठी उपयुक्त
  • CSV फायली अपलोड करण्यास आणि डेटा विश्लेषण करण्यास देते.
  • विविध कार्यांसाठी कस्टमाइझ GPT तयार करण्याची परवानगी देते.

5. Google Gemini

Top 5 AI Tools For Content Writing in Marathi
Google Gemini

गुगलने डेटा-प्रशिक्षित भाषा मॉडेल चॅटबॉट म्हणून Gemini या टूलला Develop केला आहे. जे मानव सारख्या पद्धतीने संवाद साधू शकतो. युजरच्या प्रश्नांना संवादात्मकपणे आणि अचूक उत्तर देण्यासाठी ते डिझाइन केलेले आहे.

ChatGPT सारखेच, जेमिनीचे अनेक युजेस आहेत आणि ते विविध प्रकारची कन्टेन्ट तयार करू शकते – फक्त मार्केटिंग मटेरियलच नाही. जेमिनी सर्व रायटिंग टूलपैकी वेगळे ठरते ते त्याच्या आउटपुटच्या गुणवत्तेत आणि इंटरनेट प्रवेशामध्ये, ज्याची ChatGPT मध्ये कमतरता आहे.

मला Personally Google ने डेव्हलप केलेले Gemini हे टूल खूप आवडते. कारण ते उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला हवे तसे Results हे शेअर करत असते. ChatGPT मध्ये ज्या उणिवा होत्या त्या आपल्याला Gemini मध्ये पाहावयास मिळत नाही. तुम्ही नक्कीच एकदा तरी या टूलचा युज करू शकता. 

निष्कर्ष

मित्रांनो, आज जरी हजारोच्या संख्येत AI Tools उपलब्ध असले तरी पण आपल्याला आपल्या ब्लॉगसाठी कन्टेन्ट हा Directly कॉपी-पेस्ट अजिबात करायचा नाही आहे. कारण किती पण काही झालं तर AI Writer आणि Human Writer द्वारे लिहल्या गेलेल्या कन्टेन्ट मध्ये जमीन आसामनाचा फरक हा असतो. AI ला Emotion नसतात. मानवाला त्या असतात त्यामुळे Human Writer ला नेहमी मागणी हि राहणारच आहे. 

या Top 5 AI Tools For Content Writing in Marathi पोस्टच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं होत कि, बदलत्या काळानुसार आपल्याला पण AI चा युज करता यायला हवा. ब्लॉग पोस्टचा रिसर्च करण्यासाठी, टायटल आयडियाजसाठी तुम्ही या टूलचा वापर करू शकता.

तसेच तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगसाठी कोणत्या AI Tools चा सर्वात जास्त युज करतात? त्या विषयी कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच महत्वपूर्ण ब्लॉगिंग संबंधित माहितीसाठी आपल्या Bloggervinita या ब्लॉगला नक्की फॉलो करा. धन्यवाद.

अधिक वाचा: Best 10 Ways Protect Your WordPress Blog in Marathi: वर्डप्रेस ब्लॉग वेबसाइटला Hack होण्यापासून कसे वाचवायचे?

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment