हा प्रश्न मला काल रात्री अनेकदा पडला. पण गंमत म्हणजे Workshop संपल्यानंतर मी Revenue, Profit किंवा किती Tickets विकल्या गेल्या याचा विचारच करत नव्हते. माझ्या डोक्यात सतत एकच गोष्ट फिरत होती – काल Google Meet वर माझ्यासोबत जवळपास 3 तास बसलेली ती 30 माणसं.
त्यात 80-90% मुली होत्या. Housewives होत्या. College Students होत्या. काही जणी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या Workshop ला आल्या होत्या. काहींना Freelancing बद्दल थोडीफार माहिती होती. पण सगळ्यांच्या डोळ्यात एक गोष्ट स्पष्ट दिसत होती – स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा.
खरं सांगायचं तर हा AI Freelancing Workshop माझ्यासाठी एखादा Business Experiment नव्हता. मी तो Course विकण्यासाठी केला नव्हता. माझ्या डोक्यात कोणताही Funnel नव्हता, कोणतीही Upselling Strategy नव्हती आणि शेवटी मोठा Program विकायचा प्लॅनही नव्हता.
मला फक्त एक गोष्ट बघायची होती – Marathi Community ला खरंच AI आणि Freelancing शिकायचं आहे का? Social Media वर Comment करणारे लोक आणि खरंच Action घेणारे लोक यामध्ये किती फरक आहे हे मला समजून घ्यायचं होतं.
गेल्या एक वर्षात माझ्या DM मध्ये हजारो Messages आले होते.
“दीदी Workshop घ्या.”
“Guide करा.”
“Freelancing शिकवा.”
“आम्हालाही Online काहीतरी करायचं आहे.”
सुरुवातीला मी हे Messages वाचायचे आणि पुढे जायचे. पण जेव्हा रोज तेच Messages दिसायला लागले, तेव्हा वाटलं की कदाचित लोकांना खरंच शिकायचं आहे.
म्हणूनच हा ₹199 चा Workshop झाला.
पण लोकांना दिसत नाही ती गोष्ट म्हणजे या Workshop मागे जवळपास 6 महिन्यांची तयारी होती. काय शिकवायचं, काय नाही शिकवायचं, कोणत्या गोष्टी New Peoples साठी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या चुका आधीच टाळता येतील आणि लोकांचा वेळ व पैसा खरंच वसूल कसा होईल यावर सतत विचार चालू होता.
मी आणि माझी टीम अनेक रात्री 2-3 तास बसून Planning करत होतो. PPT Slide पासून Structure पर्यंत, Examples पासून Resources पर्यंत प्रत्येक गोष्ट विचार करून तयार केली होती.
कारण मला फक्त Workshop घ्यायचा नव्हता.
मला लोकांना असं वाटायला हवं होतं की “हो, आपण काहीतरी नवीन शिकलो. आता Action घ्यायला सुरुवात करू शकतो.”
Workshop मध्ये मी AI Tools, Freelancing, Client Hunting, Profile Building, First Client Closing आणि Online Work च्या Reality बद्दल मनापासून Share केलं.
अनेक गोष्टी अशा होत्या ज्या सहसा कोणी सांगत नाही.
कारण मला लोकांना Impress करायचं नव्हतं.
मला त्यांना Help करायचं होतं.
कदाचित याच कारणामुळे Workshop मध्ये कोणताही Upsell नव्हता. कोणताही Force Selling चा प्रयत्न नव्हता. कोणतेही Fake Income Screenshots नव्हते. कोणत्याही प्रकारची “30 दिवसात लाखपती” किंवा “Guaranteed Income” सारखी वाक्य नव्हती.
कारण Reality वेगळी असते.
Skill शिकायला वेळ लागतो.
Confidence यायला वेळ लागतो.
पहिला Client मिळायला वेळ लागतो.
आणि मेहनतीला पर्याय नसतो.
खरं सांगायचं तर जर मला फक्त Coaching मधून पैसे कमवायचे असते, तर मी हा प्रवास खूप आधी सुरू केला असता.
आज मी पहिल्यांदाच एक गोष्ट Publicly Share करते आहे.
गेल्या दोन वर्षांत 2-3 मोठ्या Institutes कडून मला लाखोंच्या Offers आल्या होत्या.
त्यांनी मला एकच सांगितलं होतं…
“तुम्ही फक्त शिकवा.”
बाकी Marketing आम्ही करू.
Sales आम्ही करू.
Backend आम्ही सांभाळू.
तुम्ही फक्त Camera समोर या.
एका छोट्या गावातून आलेल्या मुलीसाठी त्या Offers नक्कीच मोठ्या होत्या.
आणि हो, मी असं म्हणणार नाही की मला पैशांची गरज नव्हती.
कारण प्रत्येकाला असते.
मलाही आहे.
आजही आहे.
उद्याही असेल.
पण तरीही मी त्या Offers Accept केल्या नाहीत.
कारण मी या Industry ची एक बाजू खूप जवळून पाहिली आहे.
Social Media वर दिसणाऱ्या Success Stories च्या मागे काही अशा गोष्टी असतात ज्या लोकांना कधीच सांगितल्या जात नाहीत.
खूप कमी वयात मला या Digital World च्या दोन्ही बाजू पाहायला मिळाल्या आहेत.
चांगल्या सुद्धा.
वाईट सुद्धा.
Marketing कसं चालतं, Psychology कशी वापरली जाते, Scarcity कशी तयार केली जाते, Sales कसे वाढवले जातात, Funnels कसे बनवले जातात, लोकांना Decision घ्यायला कसं भाग पाडलं जातं – हे सगळं मला माहिती नाही असं नाही.
उलट हे सगळं मी खूप जवळून पाहिलं आहे.
पण प्रत्येक Strategy वापरता येते म्हणून ती वापरावीच लागते असं मला कधी वाटलं नाही.
माझ्यासाठी आजही Ethics आणि Sanskar खूप महत्त्वाचे आहेत.
इतरांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे.
लहानपणापासून आई-बाबांनी काही मूल्यं आणि संस्कार दिले आहेत. आणि या Digital प्रवासात मी स्वतःसाठीही काही Ethics ठरवले आहेत. पैसा, Fame किंवा Shortcuts यांच्यापेक्षा ती तत्त्वं माझ्यासाठी नेहमीच मोठी राहतील.
म्हणून मला कधीच कोणाला खोटी Hope विकायची नव्हती.
मला कोणाला Fake Dream विकायचं नव्हतं.
कारण कोणाचं Future, कोणाचा विश्वास आणि कोणाची मेहनत ही माझ्यासाठी Marketing Material नाही.
माझा नेहमी एकच विचार होता…
जर खरंच माझ्यामध्ये Talent असेल…
जर खरंच माझ्याकडे लोकांना देण्यासारखी Value असेल…
तर लोक स्वतःहून येतील.
मला कोणालाही Convince करायची गरज पडणार नाही.
आणि काल पहिल्यांदाच मला वाटलं की कदाचित मी चुकीची नव्हते.
Workshop संपत आली होती.
मी Thank You बोलणार होते.
Session Close करणार होते.
आणि अचानक Chat Messages ने भरायला लागली.
लोक Next Program बद्दल विचारत होते.
काही जण म्हणत होते की अजून शिकायचं आहे.
काही जण म्हणत होते की आम्हाला मध्येच सोडून जाऊ नका.
एक मुलगी तर Emotionally बोलली…
“Madam, तुम्ही Program काढा. पण आम्हाला इथेच सोडून जाऊ नका.”
त्या क्षणी मी काही सेकंद शांत झाले.
कारण तिथे Revenue नव्हता.
तिथे Trust होता.
आणि कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच मला जाणवलं की लोक Course विकत घेत नाहीत.
लोक विश्वास विकत घेतात.
लोक Direction विकत घेतात.
लोक आशा विकत घेतात.
आणि ती आशा तुटू नये…
ही जबाबदारी आता माझी आहे.
कालच्या आधीपर्यंत माझं Coaching किंवा Mentorship बद्दल कोणतंही मोठं Mission किंवा Vision नव्हतं.
खरं सांगायचं तर Coaching मधून पैसे कमवायचे असा विचारही नव्हता.
पण काल मिळालेला Response खरोखरच डोळे उघडणारा होता.
पहिल्याच Workshop मध्ये लोकांनी ज्या प्रकारे प्रेम दिलं, विश्वास दाखवला आणि पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर माझा विचार बदलला.
म्हणून आज मी एक नवीन निर्णय घेत आहे.
हो, मी आता Mentorship Program तयार करणार आहे.
हो, मी आता Coaching करणार आहे.
पण फक्त पैसे कमावण्यासाठी नाही.
कारण जर फक्त पैसे कमवायचे असते, तर लाखोंच्या Offers मी खूप आधी Accept केल्या असत्या.
हा निर्णय आज घेत आहे कारण आता जबाबदारी आली आहे.
आणि जर ₹199 च्या Workshop साठी मी 6 महिने मेहनत घेऊ शकते, तर पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यापेक्षा जास्त मेहनत घ्यायलाही तयार आहे.
मी आणि माझी टीम आजही रोज विचार करत आहोत की अजून कसं Help करता येईल.
अजून कोणत्या Resources देता येतील.
अजून कोणत्या चुका लोकांना टाळायला मदत करता येईल.
कारण माझ्यासाठी हा Program फक्त Product नाही.
हा एक Commitment आहे.
आणि कदाचित एका नवीन Marathi Digital Community ची सुरुवात आहे.
मला एक गोष्ट सिद्ध करायची आहे.
बर्याच वर्षांपासून आपण एक वाक्य ऐकत आलो आहोत…
“मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो.”
पण काल Google Meet वर मला काहीतरी वेगळंच दिसलं.
मला Support दिसला.
मला प्रेम दिसलं.
मला एकमेकांना पुढे घेऊन जाण्याची इच्छा दिसली.
आणि म्हणूनच मला वाटतं की आता वेळ आली आहे एक नवीन Marathi Digital Community उभी करण्याची.
जिथे लोक एकमेकांना खाली खेचणार नाहीत.
तर एकमेकांना वर घेऊन जातील.
कालच्या Workshop मधून मी किती पैसे कमावले?
खरंच सांगायचं तर…
आजही तो आकडा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही.
पण काल मी जे कमावलं…
तो विश्वास होता.
आणि माझ्यासाठी त्याची किंमत कोणत्याही आकड्यापेक्षा मोठी आहे.
हा Blog लिहिण्यामागचा उद्देश कोणालाही Impress करणं नव्हता, तर माझ्या मनात जे होतं ते प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडणं हा होता.
आणि जर हा Blog वाचताना तुम्हाला असं वाटलं असेल की “मलाही AI, Freelancing आणि Digital Skills शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे”, तर खाली दिलेल्या Link वर क्लिक करून तुमचं Registration नक्की करा.
हा प्रवास सोपा नसेल, पण योग्य Direction, योग्य Community आणि सातत्यपूर्ण Action असेल तर खूप काही शक्य आहे.
बाकी Promise फक्त एकच…
मी जे काही शिकले आहे आणि पुढे शिकेन, ते शक्य तितकं प्रामाणिकपणे तुमच्यासोबत Share करत राहीन. ❤️🚩
AI Freelancing Workshop Registration Link
तुम्ही हा Blog इथपर्यंत वाचला असेल तर Comment मध्ये नक्की सांगा तुमचं याबद्दल मत काय आहे?
FAQ 1: हा Mentorship Program नेमका कोणासाठी आहे?
हा Program त्यांच्यासाठी आहे ज्यांना Freelancing, AI Tools आणि Online Skills वापरून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. विशेषतः Students, Housewives आणि Working Professionals जे खरंच Action घ्यायला तयार आहेत.
FAQ 2: हा Program घेतला म्हणजे Income ची Guarantee आहे का?
नाही. मी कधीच Income, Clients किंवा Success ची Guarantee देणार नाही. मी Direction, Support, Systems आणि Practical Knowledge देऊ शकते. पण Result तुमच्या Action वर अवलंबून असेल.
FAQ 3: माझ्याकडे Experience नाही. तरी मी Join करू शकतो/शकते का?
नक्की. खरं तर हा Program अशा लोकांसाठीच Design केला जात आहे जे Zero पासून सुरुवात करत आहेत. Freelancing बद्दल काहीच माहिती नसली तरी चालेल, पण शिकायची आणि Action घ्यायची तयारी हवी.
FAQ 4: मी Full-Time Job / College करत असेन तर हे शक्य आहे का?
हो. कारण बहुतेक लोकांकडे दिवसाचे 8-10 तास नसतात. त्यामुळे Practical आणि Realistic Roadmap वर भर असेल, जो Job, College किंवा घरच्या जबाबदाऱ्यांसोबत Follow करता येईल.





