Mission Digital Swarajya – 7 Days Program | फक्त एक Program नाही… माझ्यासाठी एक जबाबदारी

छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांच्या आयुष्यातील एक गोष्ट मला कायम शिकवून जाते… मोठं काम कधीच एका दिवसात होत नाही. त्यामागे असते वर्षानुवर्षांची मेहनत, योग्य नियोजन, योग्य माणसं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका ध्येयावर असलेला विश्वास.

कदाचित म्हणूनच माझ्या मनातही एक स्वप्न होतं. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मराठी मुला-मुलींनी Digital क्षेत्रात पुढे यावं. त्यांनी Freelancing, AI आणि Digital Skills शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. पण त्यासाठी फक्त Information देऊन उपयोग नव्हता… त्यांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि Action घ्यायची सवय लावणं गरजेचं होतं.

याच विचारातून Mission Digital Swarajya – 7 Days Program ची सुरुवात झाली.

खरं सांगायचं तर, हा माझ्यासाठी फक्त एक Program नव्हता. हा माझ्या महाराष्ट्रासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न होता. मी कोणालाही मोठमोठी स्वप्नं विकायला हा Program सुरू केला नव्हता. माझी एकच इच्छा होती… आपल्या मराठी Community मधून अशी माणसं तयार व्हावीत, जी Skills शिकतील, Action घेतील आणि पुढे जाऊन आणखी अनेकांना प्रेरणा देतील.

सुरुवात झाली… ११ अनोळखी लोकांपासून.

Program चा पहिला दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.

Google Meet सुरू झालं. एकामागोमाग एक Participants Join व्हायला लागले. कोणी Housewife, कोणी Job करत होत, तर कोणी स्वतःचा Business सांभाळत होता. प्रत्येकाचं वय वेगळं होतं, परिस्थिती वेगळी होती, स्वप्नं वेगळी होती… पण एक गोष्ट मात्र सारखी होती सगळ्यांना आयुष्यात काहीतरी बदलायचं होतं.

त्या दिवशी आम्ही सगळे एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होतो.

कोणालाच कल्पना नव्हती की पुढचे सात दिवस फक्त Skills शिकवणार नाहीत… तर आयुष्यभर लक्षात राहील असं एक नातं तयार करणार आहेत.

लोकांना दिसतो फक्त Result…

आज जेव्हा लोक Social Media वर Final Photos, Feedback Videos किंवा Google Meet चे Screenshots पाहतात, तेव्हा त्यांना Final Result दिसतो.

पण त्या Result मागे किती तयारी होती, किती Planning होती आणि किती मेहनत होती… हे फार कमी लोकांना दिसतं.

प्रत्येक Session संपल्यानंतर मी पुन्हा Laptop समोर बसायचे. दुसऱ्या दिवसाची PPT तयार करायची. Research करायचं. AI Prompts स्वतः Test करायचे. Homework Design करायचं. Google Forms तयार करायचे. Students चे Questions वाचायचे. Feedback समजून घ्यायचा.

एक Mentor म्हणून माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा नव्हता की “मी किती चांगलं शिकवलं?”

माझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न हा होता…

“समोरच्याला खरंच समजलं का?”

रात्री १२:३० नंतरच माझा दिवस सुरू व्हायचा.

रोज रात्री ९ वाजता Session सुरू व्हायचं.

Discussion व्हायची.

Practical व्हायचं.

Homework द्यायचा.

Questions घ्यायचे.

आणि अनेकदा रात्री १२ किंवा १२:३० वाजेपर्यंत Session चालायचं.

पण Participants साठी दिवस तिथे संपायचा…

माझ्यासाठी नाही.

Laptop पुन्हा उघडायचा.

Notebook पुन्हा समोर यायची.

कधी PPT मध्ये बदल…

कधी Homework…

कधी Notes…

कधी Planning…

कधी पुढच्या दिवसाचा Flow…

कधी Participants च्या Doubts…

कधी Winner Challenge…

कधी Feedback…

अनेकदा घड्याळात २ वाजायचे…

कधी ३…

पण मनात फक्त एकच विचार असायचा…

“उद्याचा Session… कालपेक्षा अजून चांगला झाला पाहिजे.”

मी फक्त Skills शिकवायला आले नव्हते…

या Program मध्ये मी फक्त Freelancing शिकवलं नाही.

मी फक्त AI Tools शिकवले नाहीत.

मी फक्त Content Creation शिकवलं नाही.

मी प्रत्येकाला Action घ्यायला शिकवलं.

कारण माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटं यश मला एका गोष्टीने मिळालं…

Action.

Notes लिहून आयुष्य बदलत नाही.

Videos Save करून आयुष्य बदलत नाही.

Course Complete करून आयुष्य बदलत नाही.

Action घेतल्यावरच बदल सुरू होतो.

म्हणूनच प्रत्येक Session मध्ये Homework होतं.

Live Challenges होते.

आणि प्रत्येकाने स्वतः काम करून दाखवायचं होतं.

हो… मी रागावलेही.

हा भाग मी कधी लपवणार नाही.

हो… मी काही वेळा रागावले.

कारण Homework Pending होता.

कारण वेळेची किंमत समजत नव्हती.

कारण मला त्यांच्यात Potential दिसत होतं.

माझं वय त्या Group मधल्या सगळ्यांपेक्षा कमी होतं.

पण Mentor म्हणून मला Popular व्हायचं नव्हतं…

Responsible राहायचं होतं.

जिथे कौतुक करायची गरज होती तिथे मनापासून केलं.

जिथे स्पष्ट बोलणं गरजेचं होतं तिथे तेही केलं.

कारण…

Sugarcoating काही दिवस Motivation देऊ शकतं…

पण Action आयुष्यभरासाठी Direction देतं.

प्रत्येक Student माझ्यासाठी वेगळा होता.

या Program मधले ११ Participants माझ्यासाठी फक्त Registration Numbers नव्हते.

प्रत्येकामागे एक वेगळी Story होती.

कोणी स्वतःवरचा विश्वास हरवला होता.

कोणी घर सांभाळत असूनही स्वतःसाठी वेळ काढत होतं.

कोणी Job सोबत शिकत होतं.

कोणी Business वाढवण्यासाठी Digital Skills शिकत होतं.

कोणी पहिल्यांदाच AI वापरत होतं.

कोणी Camera समोर बोलायलाही घाबरत होतं.

पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती…

ते शिकायला तयार होते.

Mentor म्हणून मला प्रत्येकाची Progress वेगळी दिसत होती.

कोणी Confidence मिळवत होता.

कोणी पहिल्यांदाच Homework वेळेवर पूर्ण करत होता.

कोणी पहिल्यांदाच स्वतःचा Portfolio तयार करत होता.

कोणी पहिल्यांदाच “मी हे करू शकतो” असं म्हणत होता.

आणि हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद होता.

११ अनोळखी लोक… Family कधी झाले समजलंच नाही.

पहिल्या दिवशी सगळे शांत होते.

थोडे संकोचलेले.

थोडे घाबरलेले.

पण दिवसागणिक…

Discussion वाढलं.

Homework वाढलं.

Action वाढला.

हसणं वाढलं.

एकमेकांना मदत करणं वाढलं.

आणि शेवटच्या दिवशी…

जेव्हा प्रत्येक जण Feedback देत होता…

तेव्हा जाणवलं…

हे Students राहिले नाहीत…

हे Family झाले आहेत.

तो क्षण आजही आठवला की मन भरून येतं.

शेवटी…

या संपूर्ण Mission Digital Swarajya – 7 Days Program कडे आज मागे वळून पाहताना मनात फक्त एकच भावना आहे… कृतज्ञता. या प्रवासावर विश्वास ठेवून स्वतःसाठी वेळ काढणाऱ्या, प्रत्येक Session मनापासून Attend करणाऱ्या, Homework पूर्ण करणाऱ्या, Questions विचारणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे Action घेणाऱ्या माझ्या प्रत्येक Action Taker चे मनापासून आभार. Mentor म्हणून यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच असू शकत नाही. तुमचा विश्वासच मला पुढे आणखी चांगलं करण्याची प्रेरणा देतो.

या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या Arfat Sir यांचे विशेष आभार. या Program च्या Planning पासून Technical Setup, Management, Coordination आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये त्यांनी दिलेलं सहकार्य खूप मोलाचं आहे. अनेक वेळा लोकांना फक्त Stage वर उभा असलेला व्यक्ती दिसतो, पण त्या Stage मागे शांतपणे मेहनत घेणारी माणसं दिसत नाहीत. या Program च्या यशामागे Arfat Sir यांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे. 🙏

आणि शेवटी… माझ्या महाराष्ट्रासाठी. हे फक्त Mission Digital Swarajya – 7 Days Program नव्हतं, तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात होती. अजून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचं आहे, अजून हजारो मराठी युवक-युवतींना Digital Skills च्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करायची आहे आणि अजून हजारो Digital Mavale घडवायचे आहेत. हा प्रवास माझा एकटीचा नाही… हा आपल्या सगळ्यांचा आहे. तुमच्या विश्वासामुळेच हे Mission आज इथपर्यंत पोहोचलं आहे, आणि पुढेही आपण सगळे मिळून ते आणखी मोठं करू, याची मला खात्री आहे.

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद! ❤️🚩

जय शिवराय! 🙏

कालच्या AI Freelancing Workshop मधून मी किती पैसे कमावले?

WhatsApp Channel Follow Me
Telegram Channel Follow Me
Instagram Page Follow Me

माझं नाव विनिता आहे, आणि मी एक Blogger आणि Content Writer आहे. मी 17 व्या वर्षी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव आहे. माझा ब्लॉग, Bloggervinita, मराठीत Blogging, WordPress, SEO Strategies, Content Writing आणि AI Tools यासारख्या विषयांवरील माहिती सोप्या भाषेत शेअर करते. मी Freelancing Services सुद्धा Provide करते.

Leave a Comment