आज मी तुम्हाला माझी Story सांगणार आहे. कोणाची Fictional Story नाही, कोणाचा Made Up Example नाही. ही माझी स्वतःची Story आहे जी मी स्वतः Live केली, Feel केली, Suffer केली आणि शेवटी त्यातून बाहेर पडले. आणि आज बरेच Clients म्हणतात की मला खूप जास्त Attitude आहे. पण हे ऐकल्यावर मला एकच प्रश्न पडतो Attitude म्हणजे नक्की काय? स्वतःच्या कामाची किंमत ओळखणं Attitude आहे का? स्वतःच्या वेळाचा, मेहनतीचा, Knowledge चा Respect मागणं Attitude आहे का? जर हे Attitude असेल, तर हो मला Attitude आहे. आणि प्रत्येक Freelancer ला हा Attitude यायलाच हवा.
जुनी विनिता Vs आजची विनिता काय बदललं खरंच?
माझी सुरुवात अगदी साध्या, प्रामाणिक Mindset ने झाली होती. लहानपणापासून शिकवण होती की सगळ्यांचा आदर करायचा, विनम्रपणे वागायचं, दुसऱ्यांना मदत करायची. हे Values चुकीचे नाहीत उलट हे Values आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. पण Freelancing च्या जगात जेव्हा मी आले, तेव्हा या Values चा गैरफायदा घेतला गेला. आणि हे एकदा नाही, वारंवार झालं.
माझी सुरुवात अशी होती की Client ने सांगितलेलं काम करायचं, त्यांनी सांगितलेले Charges Accept करायचे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे Deadline पाळायची. Payment मागायला मला कमीपणा वाटायचा. मनात विचार यायचा की देईल आपोआप, चांगला माणूस आहे, Trust ठेवूया. Agreement नाही, Invoice नाही, Terms नाही फक्त काम आणि त्यावरचा Trust. आणि हा Trust वारंवार तुटला. प्रत्येक वेळी एक नवीन धक्का, एक नवीन Lesson.
हळूहळू मी बदलले नाईलाजाने नाही, तर Consciously. मी ठरवलं की आपण Professionally वागायला हवं. Agreement आधी, काम नंतर. Invoice Clear, Terms Clear, Payment Schedule Clear. Deal तेव्हाच Close होईल जेव्हा सगळं Written मध्ये असेल.
आणि हाच बदल लोकांना Attitude वाटतो. पण मी सांगते हा Attitude नाही, ही माझी Survival आहे.
The Real Scams ज्या गोष्टी बोलणं Uncomfortable आहे, पण गरजेचं आहे
आता येतो खऱ्या गोष्टींवर. कारण हे फक्त माझी Personal Frustration नाही हे माझे Documented Experiences आहेत जे मी Live केले आहेत. आणि हे मी इथे Share करतेय कारण प्रत्येक नवीन Freelancer ला हे माहीत असणं गरजेचं आहे.
पहिला धक्का Hindi Tech Brand 1 Million+ Subscribers. एक Hindi Tech YouTube Channel होत. Subscribers होते 1 Million पेक्षा जास्त. मोठं नाव, मोठी Reach, Social Media वर चांगलीच Presence. असा Client मिळाला म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटली होती मला. माझ्या Team ने त्यांच्यासाठी काम केलं, 100% Deliverables दिले, वेळेत सगळं Complete केलं. आणि मग Payment चा वेळ आला आणि इथेच सगळं बदललं.
एकएक Excuse येत राहिले. काम 100% झालं होतं, Deliverables Perfect होते तरीही Payment साठी Nautanki. 1 Million Subscribers असलेला Brand Payment Avoid करतो हे ऐकायला जड वाटतं, पण हे सत्य आहे. आणि यातून मला कळलं की Subscriber Count किंवा Brand Size हे Trustworthiness चं Measure नाही.
दुसरा धक्का Marathi Content Creator आपलाच माणूस? हा धक्का जास्त लागला कारण हा आपला माणूस होता. Marathi Content Creator, Marathi Audience, Marathi Connection. वाटलं की इथे तरी Trust असेल, इथे तरी माणुसकी असेल. पण Scam साठी भाषा किंवा प्रदेश बघत नाहीत लोक हे मला कळलं.
तेच झालं काम झालं, Payment आली नाही. तेच Excuses, तीच टाळाटाळ. आणि हे मी इथे Clearly सांगतेय कारण नवीन Freelancers ना हे माहीत असणं गरजेचं आहे Up Bihar चे Clients Scam करतात असं नाही आणि Maharashtra मधले Clients Honest असतात असंही नाही. आपले Marathi Clients पण यात मागे नाहीत. हे Uncomfortable Truth आहे पण सत्य आहे. Scam करणारे सगळीकडे आहेत भाषा बघून नाही.
तिसरा आणि सगळ्यात Brutal धक्का Competitive Exam Education Client. हा Case सांगताना मला आजही खूप वाईट वाटतं. Client होता Competitive Exam Education Niche मधला. त्याचे 10-12 Pages होते प्रत्येक Page वर 8 ते 10 Lakh Followers. म्हणजे Education Field मधला एक Established Serious Player. असा Client Trust करणं Completely Natural वाटतं आणि मी केला.
माझ्या Team ने त्याची Website Design केली. हे काम छोटं नसतं Website Design म्हणजे Research, Planning, Design, Development, Revisions, Testing सगळं करावं लागतं. माझ्या Team ने रात्र जागून काम केलं, प्रत्येक Detail वर मेहनत केली, Website Completely Ready केली, Deliver केली. आणि मग जे झालं ते सांगते Website Deliver झाल्याबरोबर त्याने Password Change केला आणि मला Block केलं. एक Rupee Payment नाही. एक Message नाही. फक्त Block.
हे वाचताना वाईट वाटतंय ना? मी हे Live केलं. आणि हे फक्त Financial Loss नव्हतं हे Mentally पण माझ्यासाठी खूप जास्त त्रासदायक होत खूप जड होतं. रात्री झोप नाही, सकाळी Anxiety, प्रत्येक नवीन Client वर Distrust हे सगळं त्या Experiences नंतर आलं माझ्या आयुष्यात.
Emotional असणं Strength की Weakness
मी खूप Emotional Person आहे हे मी Openly सांगते. आणि मला वाटतं Emotional असणं हे Weakness नाही. Empathy असणं, दुसऱ्यांची काळजी वाटणं, Genuinely मदत करायची इच्छा असणं या सगळ्या Qualities आहेत. पण Freelancing हा Business आहे. आणि Business मध्ये एक Line असते Emotions आणि Transactions यांच्यामधली Line. ती Line Maintain करणं शिकणं खूप कठीण होतं माझ्यासाठी, पण ते Necessary होतं.
जेव्हा मी Emotionally खूप जास्त Invest व्हायचे Client मध्ये, तेव्हा मी Automatically Agreement शिवाय काम सुरू करायचे कारण Trust आहे त्याच्यावर. Payment Follow Up करताना Uncomfortable वाटायचं कारण वाईट वाटेल त्याला. Client च्या Pressure ला Yes म्हणायचे कारण नाही म्हटलं तर Relation बिघडेल. 100% काम झाल्यावरही Negotiate करत राहायचे कारण समोरचा खुश असेल तर पुढे Referral मिळेल. आणि या सगळ्याचा Result एकच होता Financial Loss आणि Mental Exhaustion दोन्ही एकत्र.
माझा Financial Loss झाला हे मी Openly सांगते. पण त्याहून जड होतं Mentally Stable नसणं. आणि हे Reality आहे Freelancing च्या Dark Side ची जे कोणी सांगत नाही.
So Called Content Creators आणि त्यांचे Negotiations
एक Specific Category आहे जिच्याबद्दल मला बोलणं खूप गरजेचं वाटतं Self Proclaimed Content Creators. छोटे छोटे Following असलेले, स्वतःला Influencer म्हणवून घेणारे आणि Service घेताना प्रत्येक गोष्टीवर Negotiation करणारे.
हे Clients सगळ्यात जास्त Time Drain करतात माझा. Rate Card बघितल्यावर लगेच थोडं कमी होईल का. Scope Of Work ऐकल्यावर हे जास्त वाटतंय Reduce करता येईल का. Terms And Conditions वाचल्यावर इतक्या Formalities कशाला आपण Direct करूया. आणि Agreement Invoice Terms यांचा उल्लेख केला की हे तुम्ही आधी Mention नव्हतं केलं.
पण मी Observe केलं आहे की जे Clients Terms वाचून Uncomfortable होतात, जे Agreement ला जास्त Formality म्हणतात तेच Clients Future मध्ये Payment Avoid करतात. Terms And Conditions हे Actually एक Filter आहे. Serious Professional Client कधीच Clearly Written Terms वर Objection करत नाही कारण त्यालाही Clarity हवी असते. जो Client Terms ला Attitude म्हणतो त्याला Actually Problem आहे Accountability शी आणि हे मला आता Clearly दिसतं.
The Turning Point जेव्हा माझं Yes बंद झालं
4-5 वर्षांचा Experience फार जास्त वाटत नाही, पण जेव्हा त्या वर्षांत तुम्ही हे सगळं Live केलं असेल तेव्हा ते Experience तुम्हाला Decades ची Maturity देतात. मी प्रत्येक चुकीतून, प्रत्येक Scam मधून, प्रत्येक Painful Experience मधून एक एक गोष्ट शिकले.
आणि एक दिवस मी ठरवलं बस. आजपासून Rules बदलतात. माझा Time Valuable आहे. माझं Knowledge Valuable आहे. माझ्या Team ची मेहनत Valuable आहे. आम्हाला Office चं Rent नाही लागत पण Survival साठी पैसे लागतात हे Basic Reality आहे. मग Payment साठी Entitled Feel करण्यात काय चूक आहे. काम केल्याचे पैसे मागणं Charity मागणं नाही तो माझा हक्क आहे.
आज मी हक्काने पैसे मागते. Agreement शिवाय एक Line काम होत नाही माझ्याकडून. Invoice Proper असतो. Terms And Conditions पहिल्याच Conversation मध्ये Clear होतात. Due Date आहे तर त्या दिवशी Payment हे Professional Commitment आहे हे मी Clearly Communicate करते. आणि जे Clients येतात जेव्हा ते म्हणतात तुमच्या Terms खूप जास्त आहेत तेव्हा माझं उत्तर Simple आहे No Hard Feelings Service घ्यायची नसेल तर घेऊ नका.
हे Arrogance नाही. हे Confidence आहे स्वतःच्या Worth वरचा.
प्रत्येक Beginner Freelancer साठी हे Day 1 पासून करा
हे वाचतोयस तू कारण तू Freelancing करतोयस किंवा करायचा विचार आहे. आणि मला तुला एक गोष्ट Clearly सांगायची आहे माझ्या चुका तुला Repeat करायची गरज नाही. मी जे Experience करून शिकले, ते तू आत्ताच शिकू शकतोस.
Day 1 पासून Agreement Mandatory आहे. तोंडी बोलणं, WhatsApp वरचं हो, Phone वरची Conversation यांना Legally काहीही Value नाही. Written Agreement Scope Of Work, Timeline, Payment Terms, Revision Policy सगळं Clearly लिहिलेलं हे तुमचं Protection आहे. हे करायला Awkward वाटतं सुरुवातीला, पण हीच Professional Standard आहे. मला पण Awkward वाटायचं आणि त्याची किंमत मी चुकवली.
Invoice हे तुमचं Professional Identity Card आहे. प्रत्येक Service साठी Proper Invoice Service Description, Amount, Due Date, Payment Method हे Clearly असणं म्हणजे तुम्ही Serious आहात तुमच्या Business बद्दल. Invoice नाही म्हणजे तुम्हाला Payment साठी Legally कुठेही जाता येत नाही.
Payment Terms Non Negotiable असाव्यात. Standard Practice आहे 50% Advance घ्यायचं, उरलेले 50% Delivery आधी. Delivery नंतर Payment मागणं म्हणजे तुम्ही स्वतःला Vulnerable Position मध्ये ठेवत आहात. Advance घेणं म्हणजे Client वर Trust नाही असं नाही हे Mutual Commitment आहे. मी हे उशिरा शिकले तू आत्ताच शीक.
Scope Of Work Document बनवा. हे Mention नव्हतं हे Excuse Client ला वापरायची संधी तुम्ही स्वतः देता जेव्हा Deliverables Clearly Written नसतात. काय करणार, किती Revisions, काय Included नाही सगळं लिहा. हे Document तुमचं सगळ्यात मोठं Weapon आहे Disagreement च्या वेळी.
Emotional Investment आणि Professional Commitment वेगळं ठेवा. Client ला Genuine Service द्या, काम मन लावून करा पण त्याच्यासाठी Rules तोडू नका. Boundaries असणं म्हणजे तुम्ही Cold आहात असं नाही Boundaries असणं म्हणजे तुम्ही Professional आहात. हे मला कळायला वेळ लागला तुला लागू नये.
एक Rule जी मी बनवली
मी एक Simple Rule बनवली आहे आणि ती मी आता Strictly Follow करते जो Client माझ्या Terms वाचून Uncomfortable होतो तो Client होण्यासाठी Eligible नाही.
हे Harsh वाटतं, पण Think करा Serious Business Owner कधीही Professional Terms वर आक्षेप घेत नाही. तो स्वतः Professionally Operate करतो, त्याला माहीत असतं की Agreement, Invoice, Terms हे Business चा Basic भाग आहे. जो Client यावर Objection करतो त्याला Accountability नको आहे. आणि Accountability नको असलेला Client म्हणजे Future मधला Scammer हे माझा Experience आहे.
Conclusion हा Attitude नाही, ही माझी Evolution आहे
जुनी मी Trust केलं, काम केलं, Scam झालं, Financially आणि Mentally तुटले. आजची मी Lessons घेतले, Rules बनवले, Professionally उभी राहिले, Confidently काम करतेय.
जे Clients म्हणतात हिला Attitude आहे त्यांना Actually Problem आहे माझ्या Self Awareness शी. कारण जुनी मी त्यांच्यासाठी Convenient होते Agreement नाही, Terms नाही, Payment मागायला Awkward वाटतं हे सगळं Exploit करायला Easy होतं. आजची मी तशी नाही आणि हेच माझं सगळ्यात मोठं Achievement आहे.
Freelancing हा Charity नाही. हा Business आहे. आणि Business मध्ये Respect दोन्ही बाजूंनी असतो Client ने Freelancer चा आणि Freelancer ने Client चा. जिथे हे Mutual नाही, तिथे Deal नाही Simple.
तुमचं काम Valuable आहे. तुमचा Time Valuable आहे. तुमच्या Team ची मेहनत Valuable आहे. हे ओळखा, Communicate करा आणि त्यावर ठाम राहा. माझ्यासारखी चुका करण्याची वाट बघू नका आजच तुमची Rules तुम्ही बनवा.
बाकी आज तर खूप जास्त Reality Share केलीये… पण Don’t Worry अजून खूप काही Share करायचं बाकी आहे 😊 तुम्हाला आजची Case Study कशी वाटली ते Comment मध्ये नक्की सांगा.
Meesho वर Ecommerce Business कसा सुरू करावा? | Step-by-Step Guide in Marathi





