आज Bloggers Day आहे… आणि आजच्या दिवशी काही अशा लोकांबद्दल बोलावंसं वाटतं, ज्यांच्यामुळे या क्षेत्राकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला.
आज आपण खूप सारे Creators पाहतो. प्रत्येकाचा content वेगळा आहे, प्रत्येकाची journey वेगळी आहे. पण काही लोक असे असतात, ज्यांचं काम फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही.
त्यांच्या कामामुळे अनेक लोकांना एक नवीन मार्ग मिळतो.
सगळ्यात आधी बोलायचं झालं तर Akshay Raskar Sir… आज Blogging क्षेत्रात अनेक लोक आले, अनेकांनी सुरुवात केली. पण काही लोकांनी अशा वेळेला काम केलं, जेव्हा हे क्षेत्र इतकं popular नव्हतं.
आज जेव्हा Blogging, Content Creation आणि Digital Field बद्दल बोललं जातं. तेव्हा अनेकांना फक्त आजची growth दिसते. पण यामागे कित्येक वर्षांची मेहनत, consistency असते.
Akshay Sir यांनी फक्त स्वतःचा प्रवास केला नाही. तर अनेक मराठी लोकांना या क्षेत्राची ओळख करून दिली. अनेकांना Blogging कडे career म्हणून बघण्याची हिंमत दिली.
कारण खरं सांगायचं तर सुरुवातीच्या काळात कोणीतरी पुढे येऊन सांगणं गरजेचं होतं…
“हो, हे शक्य आहे.”
आणि काही लोकांनी ते काम केलं.
Nitin Sir यांनी जवळपास 9-10 वर्षांमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यामुळे ते जे बोलतात, त्यामागे फक्त theory नाही. तर actual experience आहे.
मी स्वतः गेल्या एक वर्षापासून थोड्याफार प्रमाणात त्यांच्या contact मध्ये आहे. आणि एक गोष्ट नक्की सांगू शकते की ते खूप grounded व्यक्ती आहेत.
थोडा त्यांचा बोलण्याचा style वेगळा आहे. कधी कधी ते खूप स्पष्ट बोलतात…पण त्या स्पष्टपणामागे अनुभव आहे.
Blogging community साठी काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम दिसतो.
आता थोडं reality बद्दल बोलायचं झालं तर…
आज प्रत्येक creator आपापल्या पद्धतीने काम करत आहे. मी कोणाच्याही विरोधात नाही.
पण एक गोष्ट आपण accept केली पाहिजे… आज ज्याला views मिळतात, तो प्रत्येक content नेहमीच तितका valuable किंवा real असेल असं नाही.
लोकांना अनेकदा glamorous lifestyle, मोठमोठ्या गोष्टी. आणि instant success stories बघायला आवडतात. पण ज्यांनी खरंच knowledge share केलं.
ज्यांनी लोकांना शिकवलं. अशा लोकांच्या मेहनतीकडे कधी कधी दुर्लक्ष होतं.
याच ठिकाणी मला Shubham Pawar Sir यांचा उल्लेख करावासा वाटतो.
काही वर्षांपूर्वी जेव्हा Marathi audience साठी Blogging बद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांनी त्यांच्या YouTube channel वर एक नाही तर पूर्ण playlist तयार करून Blogging ची detailed माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.
आणि हे सगळं त्यांनी फक्त views साठी केलं नव्हतं. कारण खरं सांगायचं झालं तर त्यांना माहिती होतं की इतकी informative आणि detailed माहिती दिल्यानंतरही कदाचित views जास्त येणार नाहीत.
आजही आपण पाहतो की तुम्ही कितीही चांगली माहिती द्या, कितीही value देण्याचा प्रयत्न करा…तरी लोकांना नेहमीच deep knowledge किंवा actual reality समजून घ्यायची इच्छा नसते.
त्यांना अनेकदा short, glamorous आणि instant success दाखवणारा content जास्त आवडतो. पण तरीसुद्धा views चा विचार न करता, फक्त कोणाला तरी मदत व्हावी, कोणाला तरी Blogging समजावं आणि एखाद्याचा प्रवास सुरू व्हावा या उद्देशाने त्यांनी काम केलं.
आणि ही गोष्ट खरंच कौतुक करण्यासारखी आहे. कारण त्यांच्या जागी दुसरा कोणताही creator असता, ज्याला आधीपासून माहित असतं की या content ला कदाचित अपेक्षित views मिळणार नाहीत…
तर कदाचित त्याने इतका वेळ, मेहनत आणि energy लावून हे काम केलं नसतं. पण काही लोक views, numbers आणि recognition पेक्षा value ला जास्त महत्त्व देतात. आणि म्हणूनच अशा लोकांची मेहनत appreciate करणं गरजेचं आहे.
आता थोडं माझ्याबद्दल…
मला स्वतःला काही खूप मोठी blogger, expert किंवा Marathi blogging ची queen वगैरे म्हणवून घ्यायचं नाही. मी फक्त एक साधी मुलगी आहे.
जिला लहानपणापासून लिहिण्याची आवड होती. माझं profession freelancing आहे. पण एका 17 वर्षांच्या गावातील सामान्य मुलीला कधीच माहित नव्हतं…
की एक दिवस ती या field मध्ये काहीतरी करू शकेल. पण एका छोट्याशा video मुळे माझा पूर्ण journey बदलला. हीच ताकद असते एका creator मध्ये.
एका व्यक्तीने केलेला एक छोटासा प्रयत्न.कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. म्हणून आज मी त्या प्रत्येक creator बद्दल grateful आहे. ज्यांनी मला काहीतरी शिकवलं, inspire केलं आणि नवीन विचार दिले.
आणि काही लोकांना प्रश्न पडेल…की मी फक्त काही लोकांचंच नाव का घेतलं?
तर माझं थोडं वेगळं आहे… मी आधी व्यक्तीला observe करते. त्यांचा प्रवास समजून घेते आणि मग माझे विचार share करते. या तिघांनाही मी आजपर्यंत कदाचित भेटले नाही. फारसा personal contact सुद्धा नाही.
पण त्यांच्या कामातून त्यांना ओळखता येतं. आणि शेवटी एकच सांगायचं आहे…
“मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो” हे आपण अनेकदा ऐकतो.
पण आता ही गोष्ट बदलण्याची वेळ आली आहे. कारण आज मदत करणारे, guide करणारे.
आणि एकमेकांना पुढे घेऊन जाणारे लोक खूप आहेत.
फक्त आपल्याला योग्य व्यक्तीकडून योग्य गोष्ट शिकण्याची तयारी ठेवावी लागेल.
प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. संघर्ष वेगळा आहे. आणि यशाची वेळही वेगळी आहे.
Happy Bloggers Day ❤️✨






